‘OTT प्लॅटफॉर्मवर सेक्स, हिंसा आणि द्वेष’, भाजप खासदाराची सेंसरशीपची मागणी

| Updated on: Feb 14, 2021 | 2:50 AM

भाजप खासदार मनोज कोटक यांनी OTT प्लेटफॉर्मला सेंसरशिप आणि रेग्युलेटरी बॉडीच्या अंतर्गत आणून त्यावर नियंत्रण ठेवण्याची मागणी केलीय.

OTT प्लॅटफॉर्मवर सेक्स, हिंसा आणि द्वेष, भाजप खासदाराची सेंसरशीपची मागणी
Follow us on

मुंबई : भाजप खासदार मनोज कोटक यांनी OTT प्लॅटफॉर्मला सेंसरशिप आणि रेग्युलेटरी बॉडीच्या अंतर्गत आणून त्यावर नियंत्रण ठेवण्याची मागणी केलीय. OTT प्लॅटफॉर्मवर कुठल्याही प्रकारची सेंसरशिप नसल्याकारणाने अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या नावाखाली सर्रास गैरफायदा घेतला जात असल्याच आरोप मनोज कोटक यांनी केलाय. याबाबत त्यांनी लोकसभेतच हा प्रश्न उपस्थित करुन सरकारकडे यावर नियंत्रक मंडळ नेमण्याची मागणी केलीय (BJP MP demand censorship on OTT platform in Loksabha).

मनोज कोटक म्हणाले, “देशात मागील काही दिवसांमध्ये OTT प्लॅटफॉर्म प्रचलित झालेत. या प्लॅटफॉर्मवर कोणतंही नियंत्रण नाहीये. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर OTT प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये अनावश्यक गोष्टी दाखवल्या जातात. त्यात Sex, Violance, Drugs, Abuse, Hate and Vulgarity मोठ्या प्रमाणात दाखवली जाते. विशेष करून देशातील बहुसंख्याक हिंदू धर्मांच्या देवीदेवतांवर टीका करत भावना दुखवणारा कंटेट दाखवला जातो. त्यांचं अभद्र चित्रण दाखवलं जातं. माझी सरकारकडे मागणी आहे की या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सेंसरशीपसारखी प्रक्रिया निश्चित करावी आणि एक नियंत्रक मंडळ गठित करावं.”

यापूर्वी खासदार मनोज कोटक यांनी सूचना प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना याबाबत पत्र देखील लिहिले होते.

या पत्रात मनोज कोटक यांनी सूचना आणि प्रसारण मंत्रालयाकडे OTT प्लॅटफॉर्मसाठी एक रेग्युलेटरी अथॉरिटी बनवण्यात यावी, अशी मागणी केली होती. याचबरोबर “तांडव” या वेबसीरिजवर बंदी घालण्याची मागणी केली होती. मनोज कोटक यांनी आपल्या पत्रात म्हटलं, “OTT प्लॅटफॉर्म तरुणांमध्ये खुप लोकप्रिय आहे. शिवाय OTT प्लेटफार्म पाहणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. असं असलं तरी यावर अद्याप कोणताही कायदा आणि स्वतंत्र बॉडी बनवण्यात आलेली नाही. त्यामुळे भारतात OTT प्लॅटफॉर्म आणि त्यांचे डिजीटल कंटेटवर नियंत्रण ठेवता येईल.”

आता या OTT प्लॅटफॉर्मवर नियंत्रणाची गरज आहे, असं म्हणत मनोज कोटक यांनी प्रकाश जावडेकर यांचीही भेट घेऊन चर्चा केली आहे.

हेही वाचा :

‘तांडव’ला भाजपचा विरोध, हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप

मुंबईची लोकल सेवा पूर्ववत सुरू करा; भाजप खासदार मनोज कोटक यांची मागणी

मनोज कोटक पहाटेपासून प्रचाराच्या रिंगणात, सेना नेते चार हात लांबच!

व्हिडीओ पाहा :

BJP MP demand censorship on OTT platform in Loksabha