मुंबईची लोकल सेवा पूर्ववत सुरू करा; भाजप खासदार मनोज कोटक यांची मागणी

नवी दिल्ली: मुंबईतील लोकल सुरू करण्यासाठी मनसेने सविनय कायदेभंग आंदोलन केलेलं असतानाच आता भाजपने हा मुद्दा संसदेतही उपस्थित सुरू केला आहे. भाजपचे खासदार मनोज कोटक यांनी मुंबईची लोकल सेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी आज संसदेत केली आहे. (Manoj Kotak raises the issue of restarting local trains service) संपूर्ण देशात अनलॉक-४ ची प्रक्रिया सुरू झाली आहे. …

मुंबईची लोकल सेवा पूर्ववत सुरू करा; भाजप खासदार मनोज कोटक यांची मागणी

नवी दिल्ली: मुंबईतील लोकल सुरू करण्यासाठी मनसेने सविनय कायदेभंग आंदोलन केलेलं असतानाच आता भाजपने हा मुद्दा संसदेतही उपस्थित सुरू केला आहे. भाजपचे खासदार मनोज कोटक यांनी मुंबईची लोकल सेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी आज संसदेत केली आहे. (Manoj Kotak raises the issue of restarting local trains service)

संपूर्ण देशात अनलॉक-४ ची प्रक्रिया सुरू झाली आहे. मुंबईत हजारो लोक लोकलनेच प्रवास करतात. जूनमध्ये मुंबईची लोकल सुरू झाली आहे. पण सरकारी कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी आणि इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे हजारो मुंबईकरांची कोंडी झाली आहे. त्यामुळे मुंबईची लोकल सेवा पूर्ववत करून संपूर्ण मुंबईकरांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात यावी. जेणेकरून कामावर जाणाऱ्या हजारो चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळेल, अशी मागणी मनोज कोटक यांनी लोकसभेत केली.

यावेळी कोटक यांनी त्यांच्या मतदारसंघातील भांडूप आणि विक्रोळी मतदारसंघाकडेही सभागृहाचं लक्ष वेधलं. विक्रोळी आणि भांडूपमध्ये मोठ्या प्रमाणावर सरकारी कर्मचारी राहतात. मात्र या दोन्ही स्थानकांवर लोकल थांबत नाहीत. त्यामुळे अत्यावश्यक सेवेत कार्यरत असूनही येथील कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करता येत नाही. परिणामी या कर्मचाऱ्यांना बसेस किंवा खासगी वाहनाने प्रवास करावा लागत असून त्याचा खर्च या कर्मचाऱ्यांना परवडेनासा झाला आहे. त्यामुळे या दोन्ही स्थानकांवर लोकल थांबविण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार मुंबईतील लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या असून खासगी आणि सहकारी बँकातील कर्मचाऱ्यांनाही प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. तसेच सामान्य मुंबईकरांना लोकलमधून प्रवास मिळावा म्हणून मनसेने लोकलमधून विना तिकिट प्रवास करून सविनय कायदेभंग आंदोलन केलं होतं. यावेळी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी बसमधील गर्दीचा एक व्हिडिओ ट्विट करून लोकलमधील गर्दीमुळे करोना होतो, मग बसमधील गर्दीमुळे करोना होत नाही का?, असा सवाल देशपांडे यांनी केला होता. मनसेपाठोपाठ आता भाजपनेही मुंबईच्या लोकलचा मुद्दा हाती घेतल्याने राज्यसरकार त्यावर काय निर्णय घेते? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Manoj Kotak raises the issue of restarting local trains service)

संबंधित बातम्या :

लोकशाहीत चर्चा करुन मार्ग काढले जातात, डोक्यावर बंदुका ठेवून नाही, संदीप देशपांडेंची टीका

MNS Protest | मनसे सरचिटणीस संदीप देशपांडेंसह तीन नेत्यांवर गुन्हा दाखल, अटकेची शक्यता

MNS Protest LIVE | पाच मिनिटं द्या, लोकल प्रवास करतो, मग गुन्हा दाखल करा : अविनाश जाधव

(Manoj Kotak raises the issue of restarting local trains service)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *