AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis : भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांचं मुंबईत जोरदार स्वागत करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले…

Devendra Fadnavis : "महाराष्ट्राच्या पवित्र भूमीवर अध्यक्ष म्हणून माझे हे पहिले आगमन आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात गणेशोत्सव साजरा केला जात आहे, माझ्यासाठी हा सौभाग्याचा क्षण आहे"

Devendra Fadnavis : भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांचं मुंबईत जोरदार स्वागत करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले...
Nitin Nabin-Fadnavis
| Updated on: Sep 16, 2026 | 11:13 AM
Share

“विकसित भारताकडे आपल्या भारताला नेणारा आपला पक्ष म्हणजे भाजपं, जो जगातल्या सगळ्यात मोठा पक्ष आहे. जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाचे अध्यक्ष नितीन नबीन जे नव्या पिढीच, नवीन जनरेशनचं प्रतिनिधीत्व करतात. एकप्रकारे भाजपने या ठिकाणी ज्या प्रकारे नव चैतन्य, नवीन रक्त आणलय संघटनेत. त्याचं प्रतीक नबीन जी आहेत” अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांचं कौतुक केलं. नितीन नबीन आज मुंबई दौऱ्यावर आहेत.

“चारवेळा बिहारमधून सातत्याने ते आमदार म्हणून निवडून आले. महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून अनेक वर्ष महाराष्ट्रात येत होते. महाराष्ट्राच्या अनेक कार्यकर्त्यांना ते जवळून ओळखतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांचा परिचय आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने निमंत्रण दिलं होतं. आम्ही तुमचे आभारी आहोत, तुम्ही निमंत्रण स्वीकारलं. गणेशोत्सव महाराष्ट्राचा मोठा उत्सव आहे. महाराष्ट्रात गणेशोत्सव आणि शिवजंयती उत्साहात साजरी केली जाते. आज तुमच्या मुंबईत येण्याने कार्यकर्त्यांचा, गणेशभक्तांचा उत्साह वाढला आहे” असं फडणवीस म्हणाले.

माझ्यासाठी हा सौभाग्याचा क्षण

“महाराष्ट्राच्या पवित्र भूमीवर अध्यक्ष म्हणून माझे हे पहिले आगमन आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात गणेशोत्सव साजरा केला जात आहे, माझ्यासाठी हा सौभाग्याचा क्षण आहे. देवेंद्र जी हे युवकांचे आणि बहिणींचे मोठे भाऊ म्हणून प्रतिनिधित्व करतात. उत्सव आणि पूजेच्या या वातावरणात आपण सर्व उपस्थित आहात, सर्वांना मी शुभेच्छा देतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आपण सर्वजण पुढे वाटचाल करत आहोत. पंतप्रधानांच्या नेतृत्वात भारत योग्य दिशेने मजबुतीने पुढे जात आहे” अशी प्रतिक्रिया भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी दिली. नितीन नबीन आज वर्षावर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतील. त्यानंतर ते एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या निवासस्थानी जाऊन सुद्धा दर्शन घेतील.

Follow Us
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था