भाजपच्या गांधीगिरीची चर्चा, मुंबईतील खड्ड्यांचे फोटो प्रदर्शन भरवून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न

| Updated on: Sep 29, 2021 | 4:07 PM

भाजपने नागरिकांना रस्त्यांवरील खड्ड्यांचे फोटो तसेच व्हिडीओ काढून पाठवण्याचे आवाहन केले आहे. तसेच नागरिकांनी पाठवलेल्या फोटोंचे महापालिकेने निर्माण केलेल्या सेल्फी पॉईन्टसमोरच प्रदर्शन भरवण्याचेदेखील भाजपने ठरवले आहे.

भाजपच्या गांधीगिरीची चर्चा, मुंबईतील खड्ड्यांचे फोटो प्रदर्शन भरवून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न
bhp mumbai road
Follow us on

मुंबई : मुंबईच्या रस्त्यावरील खड्ड्यारुन भाजप पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. भाजपने नागरिकांना खड्ड्यांचे फोटो तसेच व्हिडीओ काढून पाठवण्याचे आवाहन केले आहे. तसेच नागरिकांनी पाठवलेल्या फोटोंचे महापालिकेने निर्माण केलेल्या सेल्फी पॉईन्टसमोरच प्रदर्शन भरवले जाणार आहे. या अनोख्या आंदोलनाद्वारे शिवसेनेला डिवचण्याचा चंग भाजपने बांधला आहे. भाजपचे दक्षिण मध्यचे जिल्हाध्यक्ष राजेश शिरवाडकर यांच्या संकल्पनेतून हे खड्ड्यांचे प्रदर्शन भरवले जाणार आहे. (BJP protest against bad condition of road and potholes in mumbai will will organise exhibition of potholes)

खड्ड्याचे फोटो, व्हिडीओ काढून पाठवण्याचे आवाहन

मुंबई, पाऊस आणि खड्डे हे समिकरण नेहमीच पाहायला मिळतं. मागील काही दिवसांपासून मुंबईत चांगलाच पाऊस बरसतोय. मुसळधार पावसामुळे मुंबबईतील खड्ड्यांची समस्या नागरिकांसाठी पुन्हा एकदा डोकेदुखी ठरत आहे. याच कारणामुळे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पालिका कर्मचाऱ्यांना काल चांगलंच खडसावलं. महापौर यांनी अधिकाऱ्यांची घेतलेली शाळा मुंबईत चर्चेचा विषय ठरली. मात्र, आता याच मुद्द्यावरुन भाजप आक्रमक झाली आहे. भाजपने नागरिकांना रस्त्यावरील खड्ड्याचे फोटो तसेच व्हिडीओ काढून पाठवण्याचे आवाहन केले आहे. तसेच महापालिकेने निर्माण केलेल्या सेल्फी पॉईन्टसमोरच या फोटोंचे प्रदर्शन भरवले जाणार आहे. भाजप नेते राजेश शिरवाडकर यांच्या संकल्पनेतून हे आंदोलन केले जात आहे. यावेळी भाजपने नागरिकांना फोटो काढून पाठवण्याचे आवहान जरी केले असले तरी यामागे शिवसेनेला लक्ष करण्याचा मुख्य हेतू आहे.

नौटंकी बंद करुन रस्त्यांकडे लक्ष द्यावे

रस्त्यांवरील खड्यांचे प्रदर्शन भरवून भाजपतर्फे ही अनोखी गांधीगिरी दाखवली जाणार आहे. तसेच खड्ड्यांच्या मुद्द्यावरुन भाजपने शिवसेना तसेच मुंबई महापालिका यांच्यावर गंभीर टीका केली आहे. महापौर यांनी नौटंकी बंद करावी. त्याऐवजी त्यांनी रस्त्यांकडे लक्ष द्यावे. सध्या खड्ड्यांमुळ मुंबईकरांना जो त्रास होत आहे, त्याला पालिका जबाबदार आहे, असा आरोप भाजपने केला आहे.

किशोरी पेडणेकर यांनी अधिकाऱ्यांची घेतली शाळा

दरम्यान, मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कधी मुसळधार तर कधी हलक्या स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. त्यातच मुंबईतल्या खड्ड्यांमुळे रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. त्यामुळेच मुंबईतील खड्ड्यांची परिस्थिती पाहण्यासाठी सोमवार (दि.27) रोजी महापौर किशोरी पेडणेकर पहाटेच घराबाहेर पडल्या होत्या. त्यांच्यासोबत काही वॉर्ड अधिकारीही होते. महापौर चेंबुरच्या रस्त्यांवर गेल्यानंतर तिथे मनपा अधिकारी आधीच हजर होते. महापौरांनी या रस्त्याची पाहणी केली होती, आणि एका ठिकाणी जास्त खड्डे दिसल्याने महापौर संतापल्या होत्या. त्यांनी थेट अधिकाऱ्याची फाईल फेकण्याचा प्रयत्न केला आणि अधिकाऱ्यांची शाळा घेतली होती.

इतर बातम्या :

धीर सोडू नका, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आपत्तीतून बाहेर काढणार, मुख्यमंत्र्यांचा शब्द

सेमीकंडक्टर फॅबसाठी नाशिकची निवड करा, सत्यजीत तांबेंचे पियुष गोयल यांना पत्र

साकीनाका बलात्कार प्रकरण, 18 दिवसात 77 जणांचे जबाब, 346 पानांचे आरोपपत्र, त्याने अमानुष अत्याचार का केला ?

(BJP protest against bad condition of road and potholes in mumbai will will organise exhibition of potholes)