AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईतील खड्ड्यांवरुन किशोरी पेडणेकरांनी अधिकाऱ्यांना झापलं, निलेश राणे म्हणतात, महापौरांना 2021 चा बेस्ट ड्रामा अवॉर्ड द्यायला हवा!

सोमवारी महापौर किशोरी पेडणेकर यांनी थेट मुंबईच्या रस्त्यावर उतरुन अधिकाऱ्यांची शाळा घेतली आणि खड्डे का पडले याचा जाब अधिकाऱ्यांना विचारला.

मुंबईतील खड्ड्यांवरुन किशोरी पेडणेकरांनी अधिकाऱ्यांना झापलं, निलेश राणे म्हणतात, महापौरांना 2021 चा बेस्ट ड्रामा अवॉर्ड द्यायला हवा!
महापौर किशोरी पेडणेकरांच्या पाहणी अभियानावर निलेश राणेंनी टीका केली
| Edited By: | Updated on: Sep 28, 2021 | 3:08 PM
Share

मुंबई आणि खड्डे हे समीकरण प्रत्येक पावसाळ्यात पाहायला मिळतं. खड्ड्यांचं खापर दरवर्षी मुंबई महानगर पालिकेवर फोडलं जातं, आणि महापालिकेत शिवसेनेची सत्ता असल्यामुळे थेट शिवसेनेवर टीका होते. हे चित्र यंदाही पाहायला मिळतं आहे. मात्र, सोमवारी महापौर किशोरी पेडणेकर यांनी थेट मुंबईच्या रस्त्यावर उतरुन अधिकाऱ्यांची शाळा घेतली. आणि खड्डे का पडले याचा जाब अधिकाऱ्यांना विचारला. हे सगळं माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर झालं, आणि ही व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली. मात्र, आता या क्लिपवरुन राजकारण सुरु झालं आहे, कारण, निलेश राणेंनी ट्विट करुन याला महापौरांचा ड्रामा म्हटलं आहे. ( Mumbai Mayor Kishori Pednekar shouted at BMC officials from the potholes in Road. BJP leader Nilesh Rane says, this is the acting of the mayor )

महापौरांना बेस्ट ड्रामा अवॉर्ड द्या- निलेश राणे

दरम्यान, महापौरांकडून अधिकाऱ्यांची शाळा घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला. हा व्हिडीओ भाजप नेते निलेश राणे यांनीही ट्विट केला आणि महापौर किती सहज अभिनय करतात असा टोला लगावला. ते म्हणाले की, आम्ही मराठी सिनेसृष्टीत हा व्हिडीओ पाठवणार आहोत, जेणेकरून 2021 वर्षाचा बेस्ट ड्रामा अवॉर्ड हा आमच्या महापौर मॅडम ना मिळालाच पाहिजे. इतकी सहज एक्टिंग करणे अशक्य आहे, दिग्गज कलाकारांना सुद्धा अशी एक्टिंग जमणार नाही. एकूणच, महापौर किशोरी पेडणेकर यांच्या या पाहणी अभियानाला निलेश राणेंनी पाहणी अभिनय ठरवलं आणि त्यांना अभिनयाचा अवॉर्ड देण्याची मागणी केली.

काय आहे प्रकरण?

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कधी मुसळधार तर कधी हलक्या स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. त्यातच मुंबईतल्या खड्ड्यांमुळे रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. त्यामुळेच मुंबईतील खड्ड्यांची परिस्थिती पाहण्यासाठी सोमवार (दि.27) रोजी महापौर किशोरी पेडणेकर पहाटेच घराबाहेर पडल्या. त्यांच्यासोबत काही वॉर्ड अधिकारीही होते. महापौर सरळ पोहचल्या चेंबरच्या रस्त्यांवर. तिथं मनपा अधिकारी आधीच हजर होते. महापौरांनी या रस्त्याची पाहणी केली, आणि एका ठिकाणी जास्त खड्डे दिसल्याने महापौर संतापल्या. त्यांनी थेट अधिकाऱ्याची फाईल फेकण्याचा प्रयत्न केला आणि सध्या अधिकाऱ्यांची शाळा घेतली.

अधिकाऱ्यांनी महापौरांना काय सांगितले?

मनपा अभियंत्यांनी महापौरांना खड्डे भरण्याचं काम सुरु असल्याचं सांगितलं. या कामासाठी प्रत्येक ठिकाणी एक प्रभाग अधिकारी आणि एक अभियंता नियुक्त करण्यात आला आहे. पाऊस सतत सुरु असल्याने, खड्डा पुन्हा तयार होत आहेत, मात्र लवकरच सगळे खड्डे भरली जातील असं आश्वासन मनपा अभियंत्यांनी महापौरांना दिलं.

हेही वाचा:

अतिवृष्टीनं प्रचंड नुकसान; महाराष्ट्राला 7 हजार कोटी मदत द्या, विजय वडेट्टीवारांची मागणी

Rain and Weather update Live : ‘गुलाब’चं धुमशान, 5 जिल्ह्यांना रेड तर 12 जिल्ह्यांना यलो अलर्ट

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.