Maharashtra Rain and Weather Live update : पावसाचा हाहा:कार, 48 तासांत तब्बल 10 जणांचा मृृत्यू

| Updated on: Sep 29, 2021 | 12:33 AM

Maharashtra (Mumbai) Rains and Weather Latest Updates : गुलाब चक्रीवादळामुळे (Gulab cyclone ) मराठवाडा (Marathwada rain) आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचं (Rain in Maharashtra) धुमशान पाहायला मिळत आहे. मराठवाड्यात कालपासून तुफान पाऊस बरसत आहे. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

Maharashtra Rain and Weather Live update : पावसाचा हाहा:कार, 48 तासांत तब्बल 10 जणांचा मृृत्यू
weather alert

मुंबई : गुलाब चक्रीवादळामुळे (Gulab cyclone ) मराठवाडा (Marathwada rain) आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचं (Rain in Maharashtra) धुमशान पाहायला मिळत आहे. मराठवाड्यात कालपासून तुफान पाऊस बरसत आहे. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. गुलाब चक्रीवादळामुळे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. त्याचा प्रभाव पुढील 48 तास राज्यावर पाहायला मिळणार आहे. इकडे मुंबईसह ठाणे आणि उपनगरात जोरदार पाऊस बरसत आहे.

येत्या 24 तासात,मराठवाडा ,मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार आणि अतीवृष्टीची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, विदर्भात पावसाचा प्रभाव कमी जाणवेल. तर उद्या उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात प्रभाव राहील, असा अंदाज आहे.

पुढील 3 ते 4 तासात मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा आहे. धुळे , पालघर , ठाणे , मुंबई , रायगड , नाशिक , अहमदनगर , पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना पावसाचा इशारा आहे.

रेड अलर्ट (Red alert)

पालघर, नाशिक, जळगाव, औरंगाबाद आणि जालना या 5 जिल्ह्यांना आज रेड अलर्ट देण्यात आला आहे.

यलो अलर्ट (Yellow Alert)

बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे.

ऑरेंज अलर्ट (Orange Alert)

मुंबई, रायगड, ठाणे, रत्नागिरी, पुणे, सातारा, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धुळे, नंदूरबार

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 28 Sep 2021 09:36 PM (IST)

    Hingoli Rain | पैनगंगा नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतरित होण्याचे आवाहन

    हिंगोली- कन्हेरगाव नाका येथील पैनगंगा नदी काठच्या नागरिकांना स्थलांतरित होण्याचे आवाहन

    बुलडाणा जिल्ह्यातील पेनटाकळी प्रकल्पाचे 25 सेमी.09 गेट उघडल्याने स्थलांतरित होण्याचे  आवाहन

    ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाचे आवाहन

  • 28 Sep 2021 09:35 PM (IST)

    Osmanabad Rain | उस्मानाबेदत पुरात अडकलेल्या 459 लोकांना सुरक्षित बाहेर काढले

    उस्मानाबाद – जिल्ह्यात पुरात अडकलेल्या 459 लोकांना सुरक्षित बाहेर काढले

    जिल्ह्यात आजपर्यंत सरासरीच्या 136.78 टक्के पाऊस

    जिल्ह्यातील बारा मंडळात अतिवृष्टी झाली तर तेरणा आणि मांजरा ही धरणं शंभर टक्के

    अतिवृष्टीत 20 लहान आणि 17 मोठ्या जनावरांचा मृत्यू तर 180 झोपड्या-घरांची अंशत: पडझड

  • 28 Sep 2021 08:12 PM (IST)

    Jalgaon Rain | पुराच्या पाण्यात वाहून जाणार्‍या नीलगायीला जामनेरमधील ग्रामस्थांनी वाचवले

    जळगाव : जामनेर येथे पुराच्या पाण्यात वाहून जाणार्‍या वनविभागातील नीलगायीला ग्रामस्थांनी वाचवले

    मांडवे बुद्रुक येथे आलेल्या पुरात निलगाई वाहून जात असताना ग्रामस्थांनी कौतुकास्पद कामगिरी करत नीलगायीला वाचवले

    ग्रामस्थांनी उपचारार्थ निघायला वन विभागाच्या स्वाधीन केल्याची प्राथमिक माहिती

    पोलीस पाटलासह ग्रामस्थांनी पुरात जीव संकटात टाकून नील गाईला वाचवले

  • 28 Sep 2021 07:18 PM (IST)

    Nandurbar Rain | नंदुरबार शहरामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात

    नंदूरबार : नंदुरबार शहरामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असं सध्यातरी दिसून येत आहे. मात्र मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अनेक पिकांचे नुकसान होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.

  • 28 Sep 2021 07:10 PM (IST)

    बुलडाणा जिल्ह्यातील पेनटाकळी प्रकल्पाची 9 वक्रद्वारं 25 सेंटी मीटरने उघडली 

    वाशिम : बुलडाणा जिल्ह्यातील पेनटाकळी प्रकल्पाची 9 वक्रद्वारं 25 सेंटी मीटरने उघडली

    पैनगंगा नदीपात्रात होत आहे 8280 क्यूसेक प्रति सेकंदने पाण्याचा विसर्ग

    वाशिम जिल्ह्यातील पैनगंगा नदीला मोठा पूर येऊन नदी काठच्या शेतात पाणी घुसून नुकसान होण्याची शक्यता आहे

  • 28 Sep 2021 07:07 PM (IST)

    Jalgaon rain | पावसामुळे कुऱ्हा काकोडा गोरक्ष गंगा नदीला आला पूर

    जळगाव : पावसामुळे कुऱ्हा काकोडा गोरक्ष गंगा नदीला आला पूर

    मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा वनविभागात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर

    कु-हा काकोडा गोरक्ष गंगा नदीला आला पूर

  • 28 Sep 2021 05:52 PM (IST)

    rains in Marathwada | पावसाचा हाहा:कार, 48 तासांत तब्बल 10 जणांचा मृृत्यू

    औरंगाबाद : मराठवाड्यात पावसाना अक्षरश: धुंमाकळू घातला आहे.  मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. या भागातील सर्व नद्या दुथडी भरून वाहत असून फक्त  48 तासांत तब्बल दहा नागरिकांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे या पावसामध्ये 200 जनावरे वाहून गेले आहेत.

  • 28 Sep 2021 05:24 PM (IST)

    Yavatmal Rain | उमरखेड बस दुर्घटना, 8 तासानंतर सापडले 2 मृतदेह, 1 जण बेपत्ता

    यवतमाळ- उमरखेड बस दुर्घटना

    तब्बल 8 तासानंतर सापडले 2 मृतदेह

    आणखी 1 जण बेपत्ता

    एकूण मृतांची संख्या 3

    तर 2 जणांना वाचविण्यात यश आले होते

    अजूनही रेस्क्यू ऑपरेशन सुरूच

  • 28 Sep 2021 05:16 PM (IST)

    Nashik | रामकुंड परिसरात वाहून जाणाऱ्या पर्यटकाला जीवरक्षक दलाच्या तरुणांनी वाचवलं 

    नाशिक - रामकुंड परिसरात वाहून जाणाऱ्या पर्यटकाला जीवरक्षक दलाच्या तरुणांनी वाचवलं

    पाणी वाढल्याने पर्यटक जात होता वाहून

    पर्यटक आणि रहिवाशांनी पाण्याजवळ न जाण्याचे प्रशासनाकडून आवाहन

  • 28 Sep 2021 05:15 PM (IST)

    Aurangabad Rain | पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या दोघांना वाचवण्यात यश, औरंगाबादेतील कापुसवाडी नदीच्या पुलावरील प्रकार

    औरंगाबाद : नदीवरून दुचाकी घेऊन जाणाऱ्या नागरिक जात होते पुराच्या पाण्यात वाहून

    गावकऱ्यांनी वेळेतच धाव घेऊन वाचवले 2 जणांचे जीव

    ढोरकीन बालानगर रोडवरील कापुसवाडी नदीच्या पुलावरील प्रकार

    वाहत असताना स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना वाचविण्यात आले यश

    पुराच्या पाण्यात जीव मुठीत धरुन करतायेत नागरिक प्रवास

  • 28 Sep 2021 04:45 PM (IST)

    Buldana Rain | बुलडाण्यात पेठच्या पुलावर अजूनही 3 ते 4 फुटापर्यंत पाणी

    बुलडाणा : पेठच्या पुलावर अजूनही 3 ते 4 फूट पाणी

    सकाळी 4 वाजेपासून वाहतूक अद्यापही बंद

    12 तासानंतरही पुलावरून वाहत आहे पाणी

    दोन्ही बाजूला ट्रॅफिक जाम

    तर पैनगंगा नदीकाठच्या शेतात घुसले पाणी

    दिवठाणा, सोमठाणा, पेठ , सवणासह अनेक गावातील शेतकऱ्यांचे नुकसान

  • 28 Sep 2021 04:16 PM (IST)

    Nashik Rain | गंगापूर धरणातून सकाळपासून 3 हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग 

    नाशिक - गंगापूर धरणातून आज सकाळपासून 3 हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग

    धरणातून पाणी सोडल्यानंतर गोदा घाट परिसरात पाण्याच्या पातळीत वाढ

    रामकुंडावरचा दुतोंड्या मारुती अर्धा पाण्याखाली

    संध्याकाळी आणखी पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता

    परिसरातील दुकानदारांना दुकान हटवण्याच्या सूचना

  • 28 Sep 2021 04:14 PM (IST)

    latur rain | लातूर जिल्ह्यात शेतात अडकलेल्या 22 जणांना रेस्क्यू करण्यात यश

    लातूर : जिल्ह्यातील डिगोळ-देशमुख येथे पुरात अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलं आहे.
    कळंब तालुक्यातील वाकडी येथील शेतातील घरात अडकलेल्या  17 जणांना  सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे
    घनसरगाव येथील अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत
    लातुर तालुक्यातील शेतावर पुरात अडकलेल्या 22 जणांना बोटीच्या सहाय्याने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे
  • 28 Sep 2021 03:58 PM (IST)

    Aurangabad rains | औरंगाबादेतील शिवना टाकळी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

    औरंगाबाद : शिवना टाकळी धरणातून पाण्याचा मुसळधार विसर्ग सुरू

    शिवना नदीला पूर आल्यामुळे धरणाचे उघडले चार दरवाजे

    चार दरवाजातून 16 हजार क्यूसेक्स वेगाने विसर्ग सुरू

    मुसळधार पाणी नदीत कोसळत असल्यामुळे अनेक गावांना पुराचा फटका

    कोसळणाऱ्या पाण्याचं चित्र पाहून चुकतोय काळजाचा ठोका

  • 28 Sep 2021 03:26 PM (IST)

    Hingoli Rain : हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस

    हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे नदी नाले ओढ्यांना जोरदार पुर आला आहे. हिंगोली शहरातील बावन्न खोली, रेल्वे फाटक पूल परिसरातील सखल भागात मोठ्या प्रमाणात रस्त्यावरून पाणी वाहत आहे. वसमत औंढा कळमनुरी सेनगाव तालुक्यात पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. वसमत तालुक्यातील टेम्भुर्णी, किन्होळा गावात पाणी शिरले आहे. काही नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने घरांची पडझड झाली आहे. संसार उपयोगी वस्तूंचे नुकसान झालं आहे.

  • 28 Sep 2021 03:17 PM (IST)

    Nashik Rain : नाशिकमधील गंगापूर धरण 100 टक्के भरलं

    नाशिकला (Nashik) पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण (Gangapur dam) शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे आज मंगळवारी (28 सप्टेंबर) दुपारी बारापासून पुन्हा एकदा धरणातून एकूण 3000 क्यूसेकचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांनी दिली आहे.

  • 28 Sep 2021 03:14 PM (IST)

    Mumbai Rains : मुंबईसह उपनगरात तुफान पाऊस

    मुंबईच्या पश्चिम उपनगरात गेला अर्धा तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे, पश्चिम उपनगरात मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर या परिसरात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. याशिवाय दक्षिण मुंबईतही तुफान पाऊस कोसळत आहे.

  • 28 Sep 2021 03:04 PM (IST)

    Gulab cyclone : येत्या 24 तासात राज्यभरात पावसाचा अलर्ट

    येत्या 24 तासात,मराठवाडा ,मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार आणि अतीवृष्टीची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, विदर्भात पावसाचा प्रभाव कमी जाणवेल. तर उद्या उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात प्रभाव राहील, असा अंदाज आहे.  पुढील 3 ते 4 तासात मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा आहे. धुळे , पालघर , ठाणे , मुंबई , रायगड , नाशिक , अहमदनगर , पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना पावसाचा इशारा आहे.

Published On - Sep 28,2021 3:02 PM

Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.