
आजकाल आपण अनेक गोष्टी ऑनलाइन मागवत असतो. मग ते घरातील राशन असू देत वा गोळ्या औषधे असू देत किंवा जेवण असू देत. आपला ऑनलाइन मागवण्याकडे जास्त कल असतो. पण मुबंईतील एक धक्कादायक प्रकरण नुकताच समोर आले आहे. एका डिलिव्हरी बॉयने महिलेला पार्सल देताना चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला आहे. ही घटना CCTVमध्ये कैद झाली आहे. या महिलेने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत घडलेला प्रकार सांगितला आहे.
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ब्लिंकिट डिलिव्हरी बॉय एका महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. हा व्हिडीओ स्वतः पीडित महिलेने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ही घटना मुंबईतील असून ३ ऑक्टोबरला संध्याकाळी सुमारे ५:३० वाजता घडली आहे. महिलेने ब्लिंकिटवरून काही वस्तू ऑर्डर केल्या होत्या. जेव्हा डिलिव्हरी बॉय वस्तू घेऊन पोहोचला आणि महिला त्याला पैसे देत होती, तेव्हा त्याने महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला.
वाचा: खराब झालेली दारू कशी ओळखावी? तज्ज्ञाने सांगितल्या सोप्या 3 पद्धती, नक्की तापासून पाहा
This is what happened with me today while ordering from Blinkit. The delivery guy asked for my address again and then touched me inappropriately. This is NOT acceptable. @letsblinkit please take strict action. #Harassment #Safety @letsblinkit …is women safety is joke in India? pic.twitter.com/aAsjcT3mnO
— S🪐 (@eternalxflames_) October 3, 2025
चुकीच्या पद्धतीने ब्रेस्टला स्पर्श केला
महिलेने घटनेचा व्हिडीओ एक्स अकाऊंटवर शेअर करताना ब्लिंकिटच्या अधिकृत अकाउंटला टॅग केले. तिच्या पोस्टमध्ये तिने सांगितले की, डिलिव्हरी बॉयने तिच्यासोबत चुकीचे कृत्य केले. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर लोकांमध्ये चांगलाच संताप पाहायला मिळत आहे. व्हिडीओ शेअर करताना महिलेने लिहिले की, आज ब्लिंकिटवरून ऑर्डर घेताना माझ्यासोबत हे घडले. डिलिव्हरी बॉयने पुन्हा माझा पत्ता विचारला आणि मग मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. हे सहन केले जाऊ शकत नाही. कृपया कठोर कारवाई करा. एवढंच नव्हे, तिने तिच्या पोस्टमध्ये ब्लिंकिट आणि मुंबई पोलिसांना टॅग केले. तिने पुढे भारतातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला आहे.
मुंबई पोलिसांनी केली कारवाई
मुंबई पोलिसांनी त्यांच्या ट्विटरवर प्रतिक्रिया देत लिहिले, ‘आम्ही तुम्हाला फॉलो केले आहे. कृपया डीएममध्ये तुमची संपर्क माहिती शेअर करा.’ दुसरीकडे, ब्लिंकिटने प्रकरणावर कारवाई करत डिलिव्हरी बॉयचा करार संपवला आहे. सध्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.