AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dawood Ibrahims Dongri Home Demolition : ‘इनके बाप का माल है क्या?’ भेंडीबाजारमधल्या मशिदीसाठी मौलानाने दिला आवाज, BMC पाडण्याची हिम्मत दाखवणार का?

Dawood Ibrahims Dongri Home Demolition : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या डोंगरी भागातील वडिलोपार्जित घर आज पाडण्यात येणार आहे. याच इमारतीच्या तळ मजल्यावर प्रार्थना हॉल आणि मशीद आहे. या मशि‍दीवरुन आता वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.

Dawood Ibrahims Dongri Home Demolition : 'इनके बाप का माल है क्या?' भेंडीबाजारमधल्या मशिदीसाठी मौलानाने दिला आवाज, BMC पाडण्याची हिम्मत दाखवणार का?
Dongri
| Updated on: Nov 18, 2026 | 10:25 AM
Share

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या डोंगरी भागातील वडिलोपार्जित घरावर आज बुलडोझर फिरणार आहे. इथे दाऊदच घर आणि ऑफिस आहे. याच घरात दाऊद लहानाचा मोठा झाला. इथल्या गल्लीबोळात दादागिरी करता, करता एक दिवस तो अंडरवर्ल्डचा बेताज बादशाह बनला. दाऊदचे हे घर पाडलं जाणार आहे. मूळात ही कारवाई एकट्या दाऊदच्या घरावर नाहीय, तर भेंडी बाजार परिसरात असलेली हाजी इस्माईल हबीब मुसाफिरखाना ही धोकादायक इमारत आहे. ती इमारतच जमीनदोस्त करण्यात येणार आहे. दाऊद आता पाकिस्तानात वास्तव्याला आहे. या इमारतीत दाऊदचं घर आहे. याच इमारतीच्या तळ मजल्यावर प्रार्थना हॉल आणि मशीद आहे. या मशि‍दीवरुन आता वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. या इमारतीच्या तळ मजल्यावर मशीद आहे. ही मशीद 100 वर्षे पूर्वीची मशीद आहे. सी वन कॅटेगिरीमध्ये ही मशीद येते.

मुसाफिरखाना परिसरातील मशिदीवर तोडक कारवाईचे सावट आहे. मुंबई महापालिकेकडून कारवाई संदर्भात आज महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर कारवाईसंदर्भात निर्णय होईल. आयुक्त अश्विनी भिडे यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. भेंडी बाजार परिसरातील हाजी इस्माईल हबीब मुसाफिरखाना इमारतीचा मुद्दा चर्चेत आहे. धोकादायक इमारत आणि प्रार्थना हॉलसंदर्भात बैठकीत चर्चा होणार. मशिदीवर तोडक कारवाईचा बैठकीत निर्णय होणार. कारवाईच्या चर्चेमुळे परिसरात तणाव आणि गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

आमच्या समोर येऊन चर्चा करावी

कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने बैठकीला विशेष महत्त्व आहे. मशिदीवरील कारवाईबाबत महापालिका प्रशासन, आयुक्त अश्विनी भिडे काय भूमिका घेणार? आणि बैठकीनंतर नेमका काय निर्णय होणार? याकडे लक्ष आहे. ऑल इंडिया सुन्नी जमिएत उलमाचे मौलाना अमानउल्लाह रजा यांनी आक्रमक वक्तव्य केलं आहे. “इथे आमची मशीद आहे आणि आमच्याकडे याचे पुरावे आहेत. आमचं प्रार्थना स्थळ विकत घेणारे हे कोण?. इनके बाप का माल है क्या?. आमच्या समोर येऊन चर्चा करावी. आम्ही आमचे कागद घेऊन येतो” असं मौलाना अमानउल्लाह रजा म्हणाले.

Follow Us
बाळासाहेबांचा वारसा हवा, पण हिंदुत्व नको? राहुल गांधींच्या मुद्द्यावरू
बाळासाहेबांचा वारसा हवा, पण हिंदुत्व नको? राहुल गांधींच्या मुद्द्यावरून नवनाथ बनांचा ठाकरे गटाला टोला!
अमित शहा अन् एकनाथ शिंदे यांच्यात महत्त्वाची बैठक; महाराष्ट्राच्या...
अमित शहा अन् एकनाथ शिंदे यांच्यात महत्त्वाची बैठक; महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण!
गोकुळ दूध महागणार! ग्राहकांना प्रति लिटर 4 रुपये अधिक मोजावे लागणार?
गोकुळ दूध महागणार! ग्राहकांना प्रति लिटर 4 रुपये अधिक मोजावे लागणार? शेतकऱ्यांनाही...
दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील वडिलोपार्जित घरावर आज बुलडोझर; BMC कडून...
दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील वडिलोपार्जित घरावर आज बुलडोझर; BMC कडून मोठी कारवाई!
मोठी बातमी! राज्यातील आणखी 4 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; पहा यादी...
मोठी बातमी! राज्यातील आणखी 4 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; पहा यादी...
लातूरमध्ये फायनान्स कंपनीच्या रिकव्हरी एजंटची मुजोरी! शेतकऱ्याच्या...
लातूरमध्ये फायनान्स कंपनीच्या रिकव्हरी एजंटची मुजोरी! शेतकऱ्याच्या कुटुंबाला शिवीगाळ, ऑडिओ क्लिप व्हायरल
शिवा संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ भिंगे यांना गोळ्या घालून संपवलं, घटने...
Rajabhau Bhinge : शिवा संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ भिंगे यांना गोळ्या घालून संपवलं, घटनेमागचं नेमकं कारण समोर?
बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी दीपक केसरकरांनाच विरोध; त्या घोषणाबाजीमुळे
बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी दीपक केसरकरांनाच विरोध; त्या घोषणाबाजीमुळे वातावरण तापलं!
हप्त्याचे पैसे ठरले जीवघेणे, आयफोनच्या EMI वरून वाद; मित्रानेच केली...
Panvel : हप्त्याचे पैसे ठरले जीवघेणे, आयफोनच्या EMI वरून वाद; मित्रानेच केली मित्राची हत्या
चकाट्या पिटणारा गृहमंत्री, उद्धव ठाकरे भडकले नेमकं काय म्हणाले?
Tv9 Marathi Special Report : चकाट्या पिटणारा गृहमंत्री, उद्धव ठाकरे भडकले नेमकं काय म्हणाले?