AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुढचा बॉम्ब टाकल्यावर मुख्यमंत्री राजीनामा देतील, संजय राऊत यांचा खळबळजनक दावा

संजय राऊत यांनी एसआरए घोटाळ्यावरून पुन्हा मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. मर्जीतील बिल्डरांना वाचवत असल्याचा आरोप करत, राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना राजीनामा देण्याचा दावा केला. 40 हजार कोटींचा हा घोटाळा असून, चौकशी थांबवण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाचा दबाव आहे. 'पुढचा बॉम्ब टाकताच मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल', असे राऊत यांनी म्हटले आहे.

पुढचा बॉम्ब टाकल्यावर मुख्यमंत्री राजीनामा देतील, संजय राऊत यांचा खळबळजनक दावा
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 18, 2026 | 10:18 AM
Share

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एसआरए घोटाळ्यावरून पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. एसआरए घोटाळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मर्जीतील बिल्डरांना वाचवत आहेत. त्यामुळेच या प्रकरणाचा तपास होत नाहीये. पण हे प्रकरण संपलेलं नाही. मी शांत बसणार नाही. मी जेव्हा पुढचा बॉम्ब टाकेल, तेव्हा मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल, असा खळबळजनक दावाच संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना केला आहे. लवकरच हा बॉम्ब टाकणार असल्याचंही राऊत म्हणाले आहे.

खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा एसआरएतील घोटाळ्यावर भाष्य केलं आहे. महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी एसआरए घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. मुख्यमंत्री या घोटाळ्याची चौकशी का करत नाही? ही चौकशी होऊ नये म्हणून मुख्यमंत्री कार्यालयाचा दबाव आहे. मुंबईतील पॉश एरियात जिथे झोपडपट्ट्या नाही, तिथे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प दाखवले आहेत. एकूण 300 प्रकल्प आहेत. 40 हजार कोटींचा हा घोटाळा आहे. हा विषय संपला नाही. मी वारंवार आठवण करून देत आहे. जेव्हा मी पुढचा बॉम्ब टाकेल तेव्हा मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल, असा दावाच संजय राऊत यांनी केला आहे.

जैसा नरेंद्र, वैसा देवेंद्र

नैतिकदृष्ट्या प्रगल्भ मुख्यमंत्री असता तर त्यांनी 300 प्रकल्पांना स्थगिती दिली असती. जे मुख्यमंत्री अजितदादांविरोधातील संशयास्पद मृत्यूची चौकशी करायला तयार नाही. त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी आहेत. जैसा नरेंद्र वैसा देवेंद्र, अशी टीका राऊत यांनी केली.

एका मफलरची किंमत किती?

केंद्राने महाराष्ट्राला दुष्काळासाठी अजून 40 हजार कोटींची मदत केलेली नाही. उलट एसआरए घोटाळा सुरू आहे. एसआरएमध्ये बसत नसतानाही प्रकल्प राबवले जात आहेत. जिथे झोपड्या नाहीत अशा जमिनी ताब्यात घेतल्या आहेत. मुंबईच्या 40 हजार कोटींचं नुकसान केलं आहे. एका मफलरची किंमत किती आहे? फार फार 10 हजार असेल. आम्ही देऊ ना? एवढा मोठा घोटाळा सुरू असताना ते काय डोळ्यावर मफलर घेऊन बसले आहेत का? एसआरए घोटाळ्याची चौकशी का होत नाही? असा सवाल त्यांनी केला.

अर्थव्यवस्थेवर मार्ग काढा

बिल्डर पैसा कमावत आहेत. पण गरीबांकडे पैसा नाही. शेतकऱ्यांना मिळत मदत नाही. हे अर्थव्यवस्था कोलमडल्याचं लक्षण आहे. मोदी फिरत आहे. तिरंगा उचलत आहेत. ही नाटकं बंद करा. हा तिरंगा कुणी रस्त्यात टाकला नव्हता. प्रत्येक राष्ट्राध्यक्षांनी कुठे उभं राहायचं ते ठरेललं असतं. ज्या लोकांनी आपल्या कार्यालयावर 50 वर्ष तिरंगा फडकवला नाही. त्यांना आता तिरंग्याचा उमाळा आला आहे. आश्चर्य वाटतं. नौटंकी बंद करा. बसा आणि अर्थव्यवस्थेवर मार्ग काढा, असा टोला त्यांनी लगावला आहे.

Follow Us
बाळासाहेबांचा वारसा हवा, पण हिंदुत्व नको? राहुल गांधींच्या मुद्द्यावरू
बाळासाहेबांचा वारसा हवा, पण हिंदुत्व नको? राहुल गांधींच्या मुद्द्यावरून नवनाथ बनांचा ठाकरे गटाला टोला!
अमित शहा अन् एकनाथ शिंदे यांच्यात महत्त्वाची बैठक; महाराष्ट्राच्या...
अमित शहा अन् एकनाथ शिंदे यांच्यात महत्त्वाची बैठक; महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण!
गोकुळ दूध महागणार! ग्राहकांना प्रति लिटर 4 रुपये अधिक मोजावे लागणार?
गोकुळ दूध महागणार! ग्राहकांना प्रति लिटर 4 रुपये अधिक मोजावे लागणार? शेतकऱ्यांनाही...
दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील वडिलोपार्जित घरावर आज बुलडोझर; BMC कडून...
दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील वडिलोपार्जित घरावर आज बुलडोझर; BMC कडून मोठी कारवाई!
मोठी बातमी! राज्यातील आणखी 4 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; पहा यादी...
मोठी बातमी! राज्यातील आणखी 4 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; पहा यादी...
लातूरमध्ये फायनान्स कंपनीच्या रिकव्हरी एजंटची मुजोरी! शेतकऱ्याच्या...
लातूरमध्ये फायनान्स कंपनीच्या रिकव्हरी एजंटची मुजोरी! शेतकऱ्याच्या कुटुंबाला शिवीगाळ, ऑडिओ क्लिप व्हायरल
शिवा संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ भिंगे यांना गोळ्या घालून संपवलं, घटने...
Rajabhau Bhinge : शिवा संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ भिंगे यांना गोळ्या घालून संपवलं, घटनेमागचं नेमकं कारण समोर?
बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी दीपक केसरकरांनाच विरोध; त्या घोषणाबाजीमुळे
बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी दीपक केसरकरांनाच विरोध; त्या घोषणाबाजीमुळे वातावरण तापलं!
हप्त्याचे पैसे ठरले जीवघेणे, आयफोनच्या EMI वरून वाद; मित्रानेच केली...
Panvel : हप्त्याचे पैसे ठरले जीवघेणे, आयफोनच्या EMI वरून वाद; मित्रानेच केली मित्राची हत्या
चकाट्या पिटणारा गृहमंत्री, उद्धव ठाकरे भडकले नेमकं काय म्हणाले?
Tv9 Marathi Special Report : चकाट्या पिटणारा गृहमंत्री, उद्धव ठाकरे भडकले नेमकं काय म्हणाले?