
राज्यातील महानगरपालिका निवडणुकींसाठी गुरुवारी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या मतदानाचा निकाल 16 जानेवारी लागणार आहे. त्यामुळे निवडूक आयोगाकडून निवडणूकीची चांगलीच तयारी करण्यात आली आहे. मुंबईत एकूण 23 ठिकाणी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे तुमच्या भागातील मतदान कक्ष कुठे आहे? हे तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या सविस्तर…
१. आर उत्तर विभाग : प्रभाग क्रमांक १ ते ८ करिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीमती शीतल देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे निवडणूक मतमोजणी कक्ष बृहन्मुंबई महानगरपालिका मंडई तळघर, रूस्तमजी संकूल, जयवंत सावंत मार्ग, दहिसर (पश्चिम) मुंबई – ४०० ०६८ येथे आहे.
२. आर मध्य विभाग : प्रभाग क्रमांक ९ ते १८ करिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीमती गीतांजली शिर्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे निवडणूक मतमोजणी कक्ष नागरी प्रशिक्षण संस्था व संशोधन केंद्र, अभिनव नगर, नॅशनल पार्कजवळ, बोरिवली (पूर्व), मुंबई – ४०० ०६६ येथे आहे.
३. आर दक्षिण विभाग : प्रभाग क्रमांक १९ ते ३१ करिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. सचिन गिरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे निवडणूक मतमोजणी कक्ष बजाज महानगरपालिका शाळा, बजाज मार्ग, कांदिवली (पश्चिम) मुंबई – ४०० ०६७ येथे आहे.
४. पी उत्तर विभाग : प्रभाग क्रमांक ३२ ते ३५ व प्रभाग क्रमांक ४६ ते ४९ करिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. विकास सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे निवडणूक मतमोजणी कक्ष मुंबई पब्लिक स्कूल (सीबीएसई), मालवणी टाऊनशीप मालाड – मार्वे रस्ता, अस्मिता ज्योती हौसिंग सोसायटी समोर, मालाड (पश्चिम) मुंबई – ४०० ०९५ येथे आहे.
५. पी पूर्व विभाग : प्रभाग क्रमांक ३६ ते ४५ करिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. दयालसिंह ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे निवडणूक मतमोजणी कक्ष कुरार गाव, मुंबई पब्लिक स्कूल संकुल, शांताराम तलावाजवळ, कुरार गाव, मालाड (पूर्व) मुंबई – ४०० ०९७ येथे आहे.
६. पी दक्षिण विभाग : प्रभाग क्रमांक ५० ते ५८ करिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. जयराम पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे निवडणूक मतमोजणी कक्ष उन्नत नगर महानगरपालिका शाळा, उन्नत नगर. क्रमांक २, वाहतूक पोलिस विभागाजवळ, गोरेगाव (पश्चिम) मुंबई – ४०० १०४ येथे आहे.
७. के पश्चिम विभाग : प्रभाग क्रमांक ५९ ते ७१ करिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. प्रशांत ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे निवडणूक मतमोजणी कक्ष शहाजी राजे भोसले क्रीडा संकुल, तळमजला, बॅडमिंटन हॉल, अंधेरी (पश्चिम) मुंबई – ४०० ०५३ येथे आहे.
८. के उत्तर विभाग : प्रभाग क्रमांक ७२ ते ७९ तसेच के पूर्व विभाग : प्रभाग क्रमांक ८०,८१,८६ करिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. राजीव शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे निवडणूक मतमोजणी कक्ष गुंदवली महानगरपालिका शाळा, बिमा नगर, नटराज स्टुडिओच्या मागे, अंधेरी कुर्ला मार्ग, अंधेरी (पूर्व) मुंबई – ४०० ०६९ येथे आहे.
९. के पूर्व विभाग : प्रभाग क्रमांक ८२ ते ८५, एच पश्चिम विभाग : प्रभाग क्रमांक ९७ ते १०२ करिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. प्रशांत ढगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे निवडणूक मतमोजणी कक्ष प्रशासकीय इमारत, तळमजला, एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ, जुहूतारा मार्ग, सांताक्रुझ (पश्चिम), मुंबई – ४०० ०४९ येथे आहे.
१०. एच पूर्व विभाग : प्रभाग क्रमांक ८७ ते ९६ करिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. गजेंद्रकुमार पाटोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे निवडणूक मतमोजणी कक्ष प्रभात कविवर्य कुसुमाग्रज मराठी भाषा आणि साहित्य भवन इमारत, मुंबई विद्यापीठ, कलिना, विद्यानगरी, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई – ४०० ०९८ येथे आहे.
११. टी विभाग : प्रभाग क्रमांक १०३ ते १०८, एस विभाग : प्रभाग क्रमांक १०९, ११०, ११३ आणि ११४ करिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीमती उज्वला भगत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे निवडणूक मतमोजणी कक्ष बॅडमिंटन कोर्ट, प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकूल, महाकवी कालिदास नाट्यगृहाच्या मागे, पु. खे. मार्ग, मुलुंड (पश्चिम), मुंबई – ४०० ०८० येथे आहे.
१२. एस विभाग : प्रभाग क्रमांक १११, ११२, ११५ ते १२२ करिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीमती वैशाली ठाकूर परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे निवडणूक मतमोजणी कक्ष सेंट झेवियर हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, लाल बहादूर शास्त्री मार्ग, कांजूरमार्ग (पश्चिम), मुंबई – ४०० ०७८ येथे आहे.
१३. एन विभाग : प्रभाग क्रमांक १२३ ते १३३ करिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. बाळासाहेब खांडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे निवडणूक मतमोजणी कक्ष पंतनगर महापालिका शाळा क्रमांक ०३, पंतनगर, घाटकोपर (पूर्व), मुंबई – ४०० ०७५ येथे आहे.
१४. एम पूर्व विभाग : प्रभाग क्रमांक १४५ ते १४८, एम पश्चिम विभाग : प्रभाग क्रमांक १४९ ते १५५ करिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीमती प्रियंका पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे निवडणूक मतमोजणी कक्ष बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग, कलेक्टर कॉलनी, महानगरपालिका शाळा संकुल, शिवशक्ती नगर, आर. सी. मार्ग, चेंबूर, मुंबई – ४०० ०७४ येथे आहे.
१५. एम पूर्व विभाग : प्रभाग क्रमांक १३४ ते १४४ करिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीमती स्नेहा उबाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे निवडणूक मतमोजणी कक्ष तळमजला, महानगरपालिका प्रसुतीगृह व रुग्णालय (नवीन इमारत), लल्लुभाई कंपाऊंड, हिरानंदानी आकृती इमारत क्रमांक २६ बी च्या समोर, मानखुर्द, मुंबई – ४०० ०४३ येथे आहे.
१६. एल विभाग : प्रभाग क्रमांक १५६ ते १६२ आणि १६४ करिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. रविंद्र बोंबले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे निवडणूक मतमोजणी कक्ष नेहरु नगर महानगरपालिका शाळा, नेहरु नगर, केदारनाथ मंदिर मार्ग, कुर्ला (पूर्व), मुंबई – ४०० ०२४ येथे आहे.
१७. एल विभाग : प्रभाग क्रमांक १६३, १६५ ते १७१ करिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीमती रोहिणी फडतरे आखाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे निवडणूक मतमोजणी कक्ष शिवसृष्टि कुर्ला कामगार, महानगरपालिका शाळा संकुल, एस.टी. आगारासमोर, नेहरु नगर, कुर्ला (पूर्व), मुंबई – ४०० ०२४ येथे आहे.
१८. एफ उत्तर विभाग : प्रभाग क्रमांक १७२ ते १८१ करिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. प्रशांत पानवेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे निवडणूक मतमोजणी कक्ष नवीन महानगरपालिका शाळा, जैन सोसायटी, प्लॉट क्रमांक १६० / १६१, वल्लभदास मार्ग, सायन (पूर्व), मुंबई – ४०० ०२२ येथे आहे.
१९. जी उत्तर विभाग : प्रभाग क्रमांक १८२ ते १९२ करिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. अजित नैराले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे निवडणूक मतमोजणी कक्ष डॉ. ऍन्टोनियो दा सिल्वा हायस्कूल ऍन्ड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स, एस. के. बोले मार्ग, कबुतरखाना जवळ, दादर (पश्चिम) मुंबई – ४०० ०२८ येथे आहे.
२०. जी दक्षिण विभाग : प्रभाग क्रमांक १९३ ते १९९ करिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीमती वर्षाराणी भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे निवडणूक मतमोजणी कक्ष बृहन्मुंबई महानगरपालिका वरळी अभियांत्रिकी संकुल, तळमजला, डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई – ४०० ०१८ येथे आहे.
२१. एफ दक्षिण विभाग : प्रभाग क्रमांक २०० ते २०६ करिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. अभिजीत भांडे – पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे निवडणूक मतमोजणी कक्ष पहिला मजला, पोलीस संकुल हॉल, दादर नायगाव, मुंबई – ४०० ०१२ येथे आहे.
२२. डी विभाग : प्रभाग क्रमांक २१४ ते २१९ व सी विभाग : प्रभाग क्रमांक २२० ते २२२ करिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. बाळासाहेब वाकचौरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे निवडणूक मतमोजणी कक्ष विल्सन महाविद्यालय, नेताजी सुभाषचंद्र मार्ग, स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) जवळ, मुंबई – ४०० ००७ येथे आहे.
२३. ई विभाग : प्रभाग क्रमांक २०७ ते २१३, बी विभाग : प्रभाग क्रमांक २२३,२२४ आणि ए विभाग : प्रभाग क्रमांक २२५ ते २२७ करिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. कृष्णा जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे निवडणूक मतमोजणी कक्ष रिचर्डसन ऍन्ड क्रुडास कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, सर जे. जे. रोड, व्ह्युम हायस्कूल शेजारी, भायखळा, मुंबई – ४०० ००८ येथे आहे.