
प्रभाग क्रमांक 200 ते 206 च्या मतमोजणीला 10 वाजल्यापासून सुरूवात होणार आहे. त्यापुर्वी या भागात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि उमेदवारांचे प्रतिनिधी जमण्यास सुरुवात झाली आहे. शिवडी विधानसभेतील हा भाग ठाकरेंचा बालेकिल्ला मानला जातो. या भागाने नेहमीच ठाकरेंना साथ दिली आहे. परंतु, तिकीट न मिळाल्याने नाराज झालेले स्थानिक नेते, त्यातून झालेली बंडखोरी याचा फटका ठाकरेंना बसणार का? याचं चित्र थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.
मालाडच्या पश्चिम भागातील प्रभाग क्रमांक 32 ते 35 आणि 36 ते 49 यांची मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी प्रशासनाकडून संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. मुंबईच्या मालाड पश्चिम विभागातील ठाकरेंचे शिलेदार विरुद्ध महायुतीतील उमेदवारांच्या थेट सामना होत आहे. प्रत्येक प्रभागाच्या ईव्हीएम मतमोजणी सोबतच पोस्टल मतमोजणी देखील होणार आहे. मतमोजणीसाठी 18 टेबलांवर ईव्हीएमची मतमोजणी होणार आहे तर दोन टेबलांवर पोस्टल मतांची मतमोजणी होणार आहे. एकूण २१ राऊंड होणार आहेत. या मतमोजणी प्रक्रियेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलीस दलातील जवान तैनात करण्यात आलेले आहेत. काल मतदार राजाने उमेदवारांचं भविष्य मतपेटीत बंद केलं आहे.
प्रभाग क्रमांक १८२
ठाकरे गट – मिलिंद वैद्य
भाजप – राजन पारकर
प्रभाग क्रमांक -१८३
मनसे- पारूबाई कटके
शिंदे गट – वैशाली शेवाळे
राष्ट्रवादी अजित पवार – राजेश्री खाडे
काँग्रेस – आशा काळे
प्रभाग क्रमांक – १८४
ठाकरे गट- वर्षा नकाशे
शिंदे गट – कोमल जैन
काँग्रेस – साजिदा बब्बू खान
प्रभाग क्रमांक – १८५
ठाकरे गट – जगदीश मकुनी थेवलपील
भाजप – रवी राजा
काँग्रेस – कमलेश लालजी चित्रोडा
प्रभाग क्रमांक – १८६
ठाकरे गट – अर्चना शिंदे
भाजप – निला सोनवणे
राष्ट्रवादी दादा गट- अरुणा खंडारे
काँग्रेस – सदिच्छा शिंदे
प्रभाग क्रमांक – १८७
ठाकरे गट – जोसेफ कोळी
शिंदे गट – वकील शेख
दादा गट- मुस्कान शेख
काँग्रेस – आयशा खान
प्रभाग क्रमांक – १८८
मनसे- आरिफ शेख
शिंदे गट – भास्कर शेट्टी
दादा गट – खुशी नंदपल्ली
काँग्रेस – मरियममल थेवर
प्रभाग क्रमांक – १८९
ठाकरे गट – हर्षला मोरे
भाजप – मंगला गायकवाड
दादा गट – आशा भालेकर
काँग्रेस – वैशाली वाघमारे
प्रभाग क्रमांक – १९०
ठाकरे गट – वैशाली पाटणकर
भाजप – शीतल गंभीर
काँग्रेस – दयाशंकर यादव
प्रभाग क्रमांक – १९१
ठाकरे गट – विशाखा राऊत
शिंदे गट – प्रिया सरवणकर
प्रभात क्रमांक – १९२
मनसे – यशवंत किल्लेदार
शिंदे गट – प्रीती पाटणकर
दादा गट – साराह डेरे
काँग्रेस – दीपक वाघमारे
प्रभाग क्रमांक 1 मध्ये
ठाकरे शिवसेनेचे फोरम परमार,
शिंदे शिवसेनेच्या रेखा राम यादव आणि काँग्रेसच्या शीतल म्हात्रे यांच्यात लढत आहे.
रेखा राम यादव आणि फोरम परमार यांच्यात लढत
वॉर्ड क्रमांक २ मध्ये
ठाकरे शिवसेनेच्या धनश्री कोळगे, भाजपच्या तेजस्वी घोसाळकर आणि काँग्रेसच्या मनेका सिंह यांच्यात लढत आहे.
तेजस्वी घोसाळकर जिंकू शकतात
प्रभाग क्रमांक ३ मध्ये
ठाकरे शिवसेनेच्या रोशनी गायकवाड, भाजपचे प्रकाश दरेकर आणि काँग्रेसचे प्रदीप चौबे यांच्यात लढत आहे.
प्रकाश दरेकर जिंकू शकतात
वॉर्ड क्रमांक ४ मध्ये
ठाकरे शिवसेनेचे इब्राहिम मल्ला आणि शिंदे शिवसेनेचे मंगेश पांगारे यांच्यात लढत आहे.
मंगेश पांगरे जिंकू शकतात
प्रभाग क्रमांक ५ मध्ये
शिवसेनेच्या सुजाता पाटेकर ठाकरे आणि शिवसेनेचे संजय घाडी यांच्यात लढत आहे.
कांटे की टक्कर
प्रभाग क्रमांक 6 मध्ये
ठाकरे शिवसेनेच्या संजना वेंगुर्लेकर आणि शिंदे शिवसेनेच्या दिक्षा कारकर यांच्यात लढत आहे.
दिक्षा कारकर जिंकू शकतात
प्रभाग क्रमांक ७ मध्ये
ठाकरे शिवसेनेचे सौरभ घोसाळकर आणि भाजपचे गणेश खणकर यांच्यात लढत आहे.
कांटे की टक्कर
प्रभाग क्रमांक ८ मध्ये
मनसेच्या कस्तुरी रोहेकर आणि भाजपच्या योगिता पाटील यांच्यात लढत आहे.
योगिता पाटील जिंकू शकतात
मुंबईतील प्रभाग क्रमांक 145 ते 155 मध्ये मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात. मतमोजणी केंद्रापासून 200 मीटर अंतरावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त. सकाळी 10 नंतर प्रत्येकी दोन प्रभागांची मतमोजणी होणार सुरू. सगळ्यात आधी प्रभाग 145-146 ची 10 वाजल्यानंतर होणार मतमोजणी. यानंतर प्रत्येक 1 तासानंतर पुढील दोन प्रभागांची होणार मोजणी.
मुंबई महापालिका निवडणुकीचे निकाल काही वेळात येणार आहेत. मतमोजणीला 10 वाजल्यापासून शुरुवात होणार आहे. कांदिवली पश्चिम मुंबई पब्लिक स्कूल येथे प्रभाग क्रमांक 19 ते 31 पर्यंतचा निवडणूक परिणाम काही वेळात यायला सुरुवात होणार आहे. मुंबई महापालिका कोणाची? महापौर कोण होणार? हे सर्व काही वेळात समोर येणार आहे.
मुंबई महापालिकेच्या मतमोजणी प्रक्रियेला सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. मुंबईमध्ये 23 मतदान केंद्रांवर ही मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. आणि यंदा मतमोजणी प्रक्रिया ही थोडी वेगळी असणार आहे. यंदा 2 वॉर्ड ची मतमोजणी प्रक्रिया संपल्यावर दुसऱ्या 2 वॉर्डची मतमोजणी प्रक्रिया होणार आहे. सध्या मुंबई मधील सायन परिसरातील एफ नॉर्थ या मतमोजणी केंद्रावर मतमोजणी प्रक्रियेची पूर्ण तयारी झाली आहे.
वरळी विधानसभा मतदार संघात मतमोजणी कक्ष सज्ज आहे. जी दक्षिण प्रभागात एकूण 7 प्रभागांची मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.
मुंबईसह 29 महापालिकांच्या निवडणुकीची मतमोजणी आज 16 जानेवारीला होणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरु होईल. मतमोजणीची प्रक्रिया पारदर्शक असावी यासाठी एकाचवेळी दोन मतदारसंघांची मोजणी होईल.
Axix My India एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा? जाणून घ्या
BMC – Exit Poll – Seat Share – Vote Share (%)#BMCElections2026#ExitPoll2026#AxisMyIndia pic.twitter.com/xE535uMm3B
— Axis My India (@AxisMyIndia) January 15, 2026
जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत
महायुतीला 138 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
ठाकरे बंधुंना 59 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
काँग्रेसला 23 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
इतरांना फक्त 7 जागा मिळतील असा अंदाज आहे.
मुंबई महापालिकेवर अनेक वर्षांपासून शिवसेनेची म्हणजे ठाकरे कुटुंबाची सत्ता आहे. कालच्या मतदानानंतर आलेल्या बहुतांश एक्झिट पोल्समधून भाजप-शिवसेना महायुतीच्या विजयाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शिवसेनेत आता दोन गट असून अधिकृत शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. ते भाजपसोबत आहेत.
मुंबईत काल 9 वर्षांनी मतदान झालं. 25 वर्षांचा रेकॉर्ड या मतदानाने मोडला आहे. 55 टक्क्यांच्या घरात मतदान झालं. मतदारांना काही ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागला. पण मतदानाच्या टक्केवारीतून उत्साह दिसून येतोय.
राज्यात काल 29 महापालिकांसाठी मतदान झालं. आज त्या महापालिका निवडणुकीचा निकाल येणार आहे. सगळ्या देशाचं लक्ष मुंबई महानगरपालिकेच्या निकालाकडे लागलं आहे. कारण गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे. शिवसेना म्हणजे ठाकरे. पण 2022 साली शिवसेनेत दोन गट पडले. आज अधिकृत शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे, तर उद्धव ठाकरे गट मशाल चिन्हावर निवडणूक लढवत आहे. काही वर्षांपूर्वी मुंबईवर ठाकरे कुटुंबाचं एकहाती वर्चस्व होतं. पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. मुंबईमध्ये आज ठाकरे बंधू अस्तित्वाची लढाई लढतायत. म्हणूनच परस्परांचे कट्टर विरोधक असलेले उद्धव आणि राज ठाकरे यांनी युतीमध्ये निवडणूक लढवली. दुसऱ्याबाजूला त्यांच्यासमोर बलाढ्य भाजप आणि एकनाथ शिंदे यांचं आव्हान आहे. मुंबई महापालिकेवर कोणाचा झेंडा फडणार ते आज स्पष्ट होईल.