धारावीत अन्नवाटप करणाऱ्या महापालिका अधिकाऱ्याचा कोरोनाने मृत्यू

| Updated on: Apr 29, 2020 | 9:09 PM

धारावीत बेघरांना अन्न पुरवण्याची जबाबदारी (BMC Officer Died) पार पाडणाऱ्या महापालिका अधिकाऱ्याचा कोरोनाने बळी घेतला आहे.

धारावीत अन्नवाटप करणाऱ्या महापालिका अधिकाऱ्याचा कोरोनाने मृत्यू
Follow us on

मुंबई : धारावीत बेघरांना अन्न पुरवण्याची जबाबदारी (BMC Officer Died) पार पाडणाऱ्या महापालिका अधिकाऱ्याचा कोरोनाने (Corona Virus) बळी घेतला आहे. हा कर्मचारी जी-नॉर्थ विभागात निरीक्षक म्हणून कार्यरत होता. त्यांच्याकडे धारावीतील बेघरांना अन्न पुरवण्याची (BMC Officer Died) जबाबदारी होती.

राज्यात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होत चालला आहे. राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या ही मुंबईत आहे. मुंबईतील धारावी झोपडपट्टी हा कोरोनाचा हॉट स्पॉट बनला आहे. याच धारावीत बेघरांना अन्नवाटप/शिधावाटप करणाऱ्या एका महापालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हा अधिकारी जी-नॉर्थ विभागात निरीक्षक म्हणून कार्यरत होता. त्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे (BMC Officer Died).

गेल्या 22 एप्रिलपासून हा अधिकारी आजारी होता. तेव्हापासून तो कर्तव्यावरही नव्हता. त्याचा खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होता. त्याला निमोनिया झाल्याचं निष्पन्न झालं होतं. आज सकाळपासून या अधिकाऱ्याला अस्वस्थ वाटत होतं. त्यानंतर त्याला मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात भरती करण्यासाठी नेत असताना रस्त्यात त्याचा मृत्यू झाला.

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या 6 हजार 169 पार 

मुंबईत काल (28 एप्रिल) एका दिवसात 393 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यासह मुंबईतील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 6 हजार 169 वर पोहचली आहे. आज दिवसभरात 25 कोरोना रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आता कोरोनामुळे झालेल्या एकूण मृतांची संख्या 244 झाली आहे (BMC Officer Died).

संबंधित बातम्या :

मुंबईतील वडाळ्यात 12 जणांना कोरोना, फक्त एकावर रुग्णालयात उपचार, 11 जण घरीच

मुंबईत आज 393 कोरोना रुग्णांची भर, एकूण आकडा 6 हजार 169 वर

115 दिवस पुरेल इतका धान्यपुरवठा, देहविक्रीतील महिलांच्या मदतीसाठी मंत्री यशोमती ठाकूर धावल्या

55 वर्षापेक्षा वयस्क पोलिसांना घरीच थांबण्याचे निर्देश, मुंबई पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय