धारावीसाठी बीएमसीचा अॅक्शन प्लॅन, 350 खासगी दवाखाने सोमवारपासून सुरु होणार

मुंबईतील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारवीसाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नवी योजना तयार करण्यात आली (clinic open in dharavi for normal and corona suspect patient) आहे.

धारावीसाठी बीएमसीचा अॅक्शन प्लॅन, 350 खासगी दवाखाने सोमवारपासून सुरु होणार
Follow us
| Updated on: Apr 26, 2020 | 6:35 PM

मुंबई : मुंबईतील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारवीसाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नवी योजना तयार करण्यात आली (clinic open in dharavi for normal and corona suspect patient) आहे. खासदार राहुल शेवाळे यांच्या पुढाकाराने आणि खासगी डॉक्टरांच्या साहाय्याने, धारावीतील 350 खासगी दवाखाने सोमवारपासून (27 एप्रिल) सुरू करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या दवाखान्यांमध्ये नॉन कोविड उपचारांसोबतच, कोरोना संशयितांचीही प्राथमिक चाचणी करण्यात येणार (clinic open in dharavi for normal and corona suspect patient) आहे.

धारावीतील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत, धारावीतील खासगी दवाखाने सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावाला ‘इंडियन मेडिकल कौन्सिल’ आणि ‘माहीम-धारावी मेडिकल प्रॅक्टीश्नर असोसिएशन’ यांच्या पदाधिकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

खासगी दवाखान्यात आलेल्या नॉन-कोविड नागरिकांवर उपचार केले जातील. तसेच, संशयित रुग्णांना कोरोनाची लक्षणे, कोरोनाची विनामूल्य चाचणी, त्यावरील विनामुल्य उपचार, कोरोनाबाधितांच्या कुटुंबियांना पालिकेकडून देण्यात येणाऱ्या मोफत सुविधा यांबाबतची माहितीही खासगी डॉक्टरांच्या माध्यमातून रुग्णांना दिली जाणार आहे.

संशयित रुग्णांचा तपशील पालिका प्रशासनाला कळवून पुढील कारवाई केली जाणार आहे. या खासगी डॉक्टरांना पीपीई किट, सॅनिटायझर आणि दवाखान्याचे सॅनिटायझेशन या सुविधा महानगरपालिकेकडून पुरविण्यात येणार आहेत. याआधीच धारावीतील सुमारे 50 हजार नागरिकांची घरोघरी जाऊन स्क्रिनिंग केल्याबद्दल मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांच्या हस्ते या डॉक्टरांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.

“धारावीतील खासगी दवाखाने सुरू झाल्यामुळे नजीकच्या लोकमान्य टिळक रुग्णालयावरील ताण काही प्रमाणात कमी होईल. तसेच, खासगी डॉक्टर नागरिकांच्या परिचयातील असल्याने, कोणतीही माहिती रुग्णांकडून लपवली जाणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांची स्क्रिनिंग करणे प्रशासनाला शक्य होईल”, असं खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितले.
दरम्यान, दिवसेंदिवस देशासह राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आतापर्यंत राज्यात 7 हजारपेक्षा अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर देशात 19 हजार पेक्षा अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे.

संबंधित बातम्या :

मुंबईतील धोका वाढला, आधी कोळीवाडा, मग धारावी, आता पवई झोपडपट्टीत ‘कोरोना’ रुग्ण

मुंबई मनपाचं मिशन धारावी, प्रत्येक नागरिकाची कोरोना चाचणी करणार, तब्बल साडेसात लाख लोकांच्या चाचण्या

Non Stop LIVE Update
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.