आखाती युद्धामुळे पालिका विद्यार्थ्यांना छत्री पुरविल्या नाहीत, कंत्राटदाराचं अजब उत्तर

पालीकेच्या शाळांना अनेक वस्तू यंदा शैक्षणिक वर्षे सुरु होऊन तीन महिने झाले तरी मिळालेल्या नाहीत. पावसाळा संपायला आला तरी अद्याप छत्री मिळालेल्या नाहीत. त्यातच कंत्राटदाराने आखाती युद्धाने छत्री पुरवता न आल्याचे उत्तर दिल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत.

आखाती युद्धामुळे पालिका विद्यार्थ्यांना छत्री पुरविल्या नाहीत, कंत्राटदाराचं अजब उत्तर
bmc building
| Edited By: | Updated on: Aug 27, 2026 | 4:45 PM

जून महिन्यात शाळा सुरु होऊनही अजूनही मुंबई महानगर पालिकेच्या शाळांमध्ये अनेक शालोपयोगी वस्तू विद्यार्थ्यांना मिळालेल्या नाहीत. पावसाळा सुरु होऊ संपत आला तरी विद्यार्थ्यांना छत्री दिल्या गेल्या नाहीत. या वरुन आखाती देशातील युद्धस्थितीमुळे छत्र्या पुरविण्यासाठी उशीर झाला असे मासलेवाईक उत्तर कंत्राटदाराने दिल्याने आता पालिका या कंत्राटदारावर कारवाई करणार आहे. असे उत्तर देणाऱ्या आणि पुरविण्यासाठी दिरंगाई करणाऱ्या या कंत्राटीदारावर पालिका कारवाई करणार असे शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांनी स्पष्ट केले आहे.

जून महिन्यात शाळा सुरु होऊन अजूनही महानगर पालिकांच्या शाळांमध्ये अनेक शालेय वस्तू विद्यार्थ्यांना मिळाल्या नाहीत. हा विषय पालिकेतील सभागृहात चर्चेला आला तेव्हा कंत्राटदारांनी आखाती देशात युद्ध सुरु असल्याने छत्री पुरवण्यास उशीर झाल्याचे उत्तर दिले. त्यामुळे शिक्षण समितीच्या बैठकीत विरोधक आक्रमक झाले.

मुंबई महापालिका शाळेच्या विद्यार्थ्यांना शाळा सुरु होऊन पहिले सत्र संपायला आले तरी अनेक वस्तू मिळालेल्या नाहीत. पावसाळा संपत आला तरी पालिकेच्या विद्यार्थ्यांना छत्री पुरवण्यात आल्या नसल्याची माहिती उघडकीस आल्याने विरोधकांनी पालिकेच्या बैठकीत जाब विचारला. त्यावेळी आखाती युद्धामुळे छत्री पुरवण्यास विलंब झाल्याची अजब उत्तर कंत्राटदाराने दिल्याची माहीती प्रशासनाने पटलावर ठेवली. यावर विरोधकांनी जाब विचारत असा कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी केली.

कंत्राटदारावर पालिकेची कारवाई

यावेळी आंतरराष्ट्रीय युद्धाचा आणि मुंबई महापालिकेच्या विद्यार्थ्यांना द्यायच्या छत्र्यांचा काय संबंध? असा सवाल यावेळी विरोधकांनी करीत जाब विचारला. छत्र्यांसोबतच मुंबई महापालिकेच्या विद्यार्थ्यांना शाळा सुरु होऊन ४ महिने होत आले तरी शैक्षणिक साहित्याच्या २७ वस्तू मिळालेल्या नाहीत अशी बाब उघडकीस आली आहे. शिक्षण समितीत विचारलेल्या प्रश्नांवर प्रशासनाने आखाती युद्धामुळे छत्री पुरवता आल्या नाहीत या दिलेल्या अजब खुलाशावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. असं उत्तर देणाऱ्या कंत्राटदारावर आणि वस्तू पुरवण्यात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारावर पालिकेकडून कारवाई करण्यात येईल असे शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांनी स्पष्ट केले आहे.

Follow Us