मुंबईकरांची डोकेदुखी, कचकच वाढणार, ट्राफिक आणखी जाम वाढणार, नेमकं कारण काय?

महिन्याच्या अखेरीस 2,200 कोटी रूपयांचं हे कॉन्ट्रॅक्ट निश्चित केलं जाण्याची शक्यता आहे. ज्यानंतर कामाला सुरूवात केली जाईल. प्रस्तावित रस्ते दुरुस्तीचे काम संपूर्ण मुंबई शहरात, पश्चिम आणि पूर्व उपनगरांसह लहान आणि मोठे रस्ते मिळून एकूण 808 रस्त्याावर केलं जाणार आहे.

मुंबईकरांची डोकेदुखी, कचकच वाढणार, ट्राफिक आणखी जाम वाढणार, नेमकं कारण काय?
Mumbai road repairs work file photo
| Edited By: | Updated on: Nov 17, 2021 | 1:45 PM

पुन्हा एकदा मुंबईतील रस्त्यांची डागडुजी होणार आहे. आणि यावेळी ते पेव्हर ब्लॉक्सपासून सिमेंट काँक्रीटमध्ये बदलले जातील. गेल्या काही वर्षांपासून मुंबईत अनेक रस्ते पेव्हर ब्लॉकने दुरुस्त करण्यात आले होते. त्यामूळे काही दिवसांसाठी मुंबईकरांना आधिक ट्रॅफिकला सामोरं जावं लागणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका लवकरच शहरातील 808 रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू करत आहे. ज्यासाठी मुंबईत काही रस्त्यांची वाहतूक वळवण्यात येणाची शक्यता आहे.

हिंदुस्थान टाइम्सच्या वृत्तानुसार या महिन्याच्या अखेरीस 2,200 कोटी रूपयांचं हे कॉन्ट्रॅक्ट निश्चित केलं जाण्याची शक्यता आहे. ज्यानंतर कामाला सुरूवात केली जाईल. प्रस्तावित रस्ते दुरुस्तीचे काम संपूर्ण मुंबई शहरात, पश्चिम आणि पूर्व उपनगरांसह लहान आणि मोठे रस्ते मिळून एकूण 808 रस्त्याावर केलं जाणार आहे. यामध्ये दक्षिण मुंबईतील कुंबाला हिल लेन, कामाठीपुरा 10वी लेन, कामराज नगर रोड, पूर्व उपनगरातील रमाबाई रोड आणि मिलिटरी कॅम्प जंक्शन, कलिना नवपाडा रोड, वांद्रे पूर्व, शास्त्री नगर रोड, पश्चिम उपनगरातील सांताक्रूझ पूर्व आरे कॉलनी रोड यांचा समावेश आहे.

बीएमसी शहरातील सर्व पेव्हर ब्लॉक/डांबरापासूनचे रस्ते सिमेंट-काँक्रीटमध्ये करणार आहे. महिनाअखेरीस स्थायी समितीकडे या प्रस्ताव मंजुरीसाठी सादर कराण्यात येण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा

मुंबईकरांसाठी खुशखबर, ईस्टर्न फ्री वे चेंबुरहून ठाण्यापर्यंत जाणार, खड्ड्यातल्या प्रवासातूनही सुटका होणार?

VIDEO: संजय राऊतांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट; राजकीय तर्कवितर्कांना उधाण