AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईकरांसाठी खुशखबर, ईस्टर्न फ्री वे चेंबुरहून ठाण्यापर्यंत जाणार, खड्ड्यातल्या प्रवासातूनही सुटका होणार?

छेडा नगर ते आनंद नगरपर्यंत फ्रीवेचा विस्तार करण्याची योजना आहे. तेथून पुढे आनंद नगर ते साकेत दरम्यान एलिवेटेड रस्त्याचे नियोजन करण्यात आले आहे. घोडबंदर रोडला बायपास करणासाठीपण मार्ग असेल.

मुंबईकरांसाठी खुशखबर, ईस्टर्न फ्री वे चेंबुरहून ठाण्यापर्यंत जाणार, खड्ड्यातल्या प्रवासातूनही सुटका होणार?
Eastern Freeway File photo
| Edited By: Devashri Bhujbal | Updated on: Nov 17, 2021 | 1:06 PM
Share

मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने (MMRDA) ईस्टर्न फ्रीवे (Eastern Freeway) ठाणेपर्यंत पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई ते ठाणे प्रवास करणाऱ्यांना याचा चांगलाच फायदा होईल. सध्या ईस्टर्न फ्रीवे चेंबूरला संपतो. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा औपचारिक निर्णय घेण्यात आला.

दक्षिण मुंबईपासून सुरू होणारा फ्रीवे शिवाजी नगर, चेंबूर येथे संपतो. पण ठाण्याच्या दिशेच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. दक्षिण मुंबई ते चेंबूर आणि घाटकोपर या मध्य उपनगरांमध्ये वाहतूक जलद होण्यासाठी फ्रीवेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. मात्र, पुर्व उपनगरांमध्ये पुढे जाणाऱ्या वाहनांना चेंबूर जंक्शनजवळ वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.

काय आहे योजना

एकनाथ शिंदे ठाण्याचे पालकमंत्री देखील आहेत. त्यांनी ईस्टर्न फ्रीवे ठाणेपर्यंत नेण्याचा योजनेचं पहिल्यापासून समर्थन करत होते. छेडा नगर ते आनंद नगरपर्यंत फ्रीवेचा विस्तार करण्याची योजना आहे. तेथून पुढे आनंद नगर ते साकेत दरम्यान एलिवेटेड रस्त्याचे नियोजन करण्यात आले आहे. घोडबंदर रोडला बायपास करणासाठीपण मार्ग असेल.

कोपरी-पाटणी पूल आणि खारेगाव बायपास रस्त्यालाही बैठकीत तत्वत: मान्यता देण्यात आली. खारेगाव बायपासमूळे कळवा, विटावा, खारेगाव या भागातील वाहतूक कोंडी कमी होईल.

इतर बातम्या-

Salman Khan:”सलमान खानसारख्या अभिनेत्यांनी मुस्लिमांना लसीकरणसाठी प्रोत्साहन दिले पाहिजे”- महापौर किशोरी पेडणेकर

मारहाण, कौटुंबिक हिंसाचार, अभिनेता अनिकेत विश्वासराव विरोधात पत्नी स्नेहाने दाखल केला गुन्हा

Follow Us
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल