AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मारहाण, कौटुंबिक हिंसाचार, अभिनेता अनिकेत विश्वासराव विरोधात पत्नी स्नेहाने दाखल केला गुन्हा

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अनिकेत विश्वासरावसह सासू,सासरे पत्नी स्नेहा हिने कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्या प्रकरणी पुण्यातील अलंकार पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

मारहाण, कौटुंबिक हिंसाचार, अभिनेता अनिकेत विश्वासराव विरोधात पत्नी स्नेहाने दाखल केला गुन्हा
Sneha-Aniket
Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Updated on: Nov 17, 2021 | 11:20 AM
Share

पुणे : कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्या प्रकरणी अभिनेता अनिकेत विश्वासराव विरोधात अलंकार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अनिकेत विश्वासरावसह सासू,सासरे पत्नी स्नेहा हिने कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्या प्रकरणी पुण्यातील अलंकार पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. पती अभिनेता अनिकेत विश्वासराव,सासरे चंद्रकांत विश्वासराव आणि सासू अदिती विश्वासराव या तिघां विरोधात सून स्नेहा विश्वासराव यांनी तक्रार दाखल केली आहे.

काय आहेत स्नेहाचे आरोप?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्नेहा अनिकेत विश्वासराव यांना पती अनिकेत विश्वासराव याने 10 डिसेंबर 2018 ते 2 फेब्रुवारी 2021 या तीन वर्षाच्या काळात सिनेमा सृष्टीत आपल्यापेक्षा पत्नीच नाव मोठ होईल, या भीतीपोटी वेळोवेळी नातेवाईकांसमोर अपमानास्पद वागणूक देणे,गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला असल्याचे स्नेहाने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

या पार्श्वभूमीवर पत्नी स्नेहा दिलेल्या तक्रारीवरून पती अभिनेता अनिकेत विश्वासराव,सासरे चंद्रकांत विश्वासराव आणि सासू अदिती विश्वासराव यांच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

2018मध्ये  अभिनेता अनिकेत विश्वासराव अभिनेत्री स्नेहा चव्हाण सोबत विवाहबद्ध झाला. स्नेहा चव्हाणने सोनी मराठीवरील महाराष्ट्राचा फेव्हरेट डान्सर या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. याशिवाय ती हृदयात वाजे समथिंग या मालिकेतही भूमिका करत होती. स्नेहाने यापूर्वी स्वप्नील जोशीच्या ‘लाल इश्क’ या चित्रपटात भूमिका केली होती. अनिकेत आणि स्नेहा चव्हाण ‘हृदयात वाजे समथिंग समथिंग’ या चित्रपटात एकत्र झळकले होते.

असं जमलं होतं ‘अरेंज मॅरेज’!

स्नेहाची आई आणि अनिकेतची मावशी एकमेकींच्या मैत्रिणी आहेत. या ओळखीतून हे दोघं भेटले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. स्नेहा मूळ पुण्याची आहे, तर अनिकेतचं बालपण मुंबईतील बोरीवलीमध्ये गेलं आहे. विशेष म्हणजे दोघांचं ‘अरेंज मॅरेज’ आहे. फारसा गाजावाजा न करता पुण्याध्ये अनिकेत-स्नेहाचा विवाहसोहळा पार पडला होता. यावेळी दोघांचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्र परिवार आणि मनोरंजन विश्वातील काही कलाकार उपस्थित होते.

हेही वाचा :

Ankita Lokhande | बॉयफ्रेंडसोबत सात फेरे घेण्याआधी अंकिता लोखंडेची जबरदस्त बॅचलर पार्टी, पाहा फोटो…

Chhorii | शूटिंगच्या आधीपासूनच प्रेग्नंट बॉडी सूट घालण्यास सुरुवात, नुसरत भरुचाने ‘छोरी’ चित्रपटातील व्यक्तिरेखेसाठी अशी केली तयारी!

नाव न घेता अतुल कुलकर्णींची विक्रम गोखलेंवर टीका, अवघ्या एका ओळीचं ‘ते’ ट्वीट तुफान चर्चेत!

Follow Us
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी...अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत...
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी... अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत गोगावलेंचा थेट पटवार
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, थेट...
हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर,
मोठी बातमी! हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर, पक्ष सोडण्याआधीच म्हणाले...
डीजेच्या तालावर अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन...
डीजेच्या तालावर आमदार अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही