AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: संजय राऊतांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट; कन्येच्या लग्नाचं दिलं निमंत्रण

शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नव्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी संजय राऊत यांनी राज यांना कन्येच्या लग्नाची पत्रिका दिली.

VIDEO: संजय राऊतांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट; कन्येच्या लग्नाचं दिलं निमंत्रण
raj Thackery
| Edited By: | Updated on: Nov 17, 2021 | 1:17 PM
Share

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नव्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी संजय राऊत यांनी राज यांना कन्येच्या लग्नाची पत्रिका दिली. कौटुंबीक सोहळ्याच्या निमित्ताने राऊत यांनी राज यांची भेट घेतली. राज हे नव्या घरात राहायला आल्यानंतर त्यांच्या घरी भेट देणारे संजय राऊत हे पहिले शिवसेना नेते आहेत.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतीदिन होता. त्यामुळे संजय राऊत आज शिवतीर्थावर सपत्नीक आले होते. शिवसेना प्रमुखांना अभिवादन केल्यानंतर राऊत यांनी थेट राज ठाकरे यांचं नवं घर गाठलं. राऊत यांच्या मुलीचं 29 नोव्हेंबर रोजी लग्न आहे. या लग्नाची पत्रिका देण्यासाठी राऊत सपत्नीक राज यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी आले होते. यावेळी राज आणि राऊत यांच्यात मनमोकळ्या गप्पा झाल्या. ही कौटुंबीक भेट होती. यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं सांगितलं जातं.

राज दारापर्यंत सोडायला आले

यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास गप्पा झाल्या. राऊत आणि राज ठाकरे यांच्यात राजकारणापलिकडे कौटुंबीक संबंध आहेत. तब्बल वर्षभरानंतर या दोन्ही नेत्यांची भेट होत आहे. राज ठाकरेंनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र्’ केल्यानंतर जवळपास 16 वर्षांनी संजय राऊत त्यांच्या निवासस्थानी आले होते.

राऊतांच्या भेटीगाठी

दरम्यान, राऊत यांनी राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना कन्येच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका दिली आहे. काही दिवसांपूर्वी राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओकवर भेट घेतली. त्यावेळी त्यांनी शरद पवारांसह संपूर्ण कुटुंबाला मुलीच्या लग्नाचं निमंत्रण देत लग्नाची पत्रिका दिली होती. त्यानंतर राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचीही भेट घेऊन त्यांना कन्येच्या लग्नाचं निमंत्रण दिलं.

व्याही जिल्हाधिकारी, तर जावई इंजीनियर

राऊत यांच्या कन्येचं येत्या 29 नोव्हेंबर रोजी लग्न आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी राऊत यांची कन्या पूर्वशी यांचा विवाह होणार आहे. राऊत यांचे व्याही जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर हे अत्यंत अभ्यासू, मितभाषी आणि कर्तव्यदक्ष अधिकारी समजले जातात. राऊत हे राजकारणातील पॉवरफूल राजकारणी असले तरी त्यांचे व्याही नार्वेकरही धडाडीचे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. तर नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार हे आयटी इंजीनियर आहेत. तसेच त्यांचा स्वतंत्र व्यवसाय असल्याचं सूत्रांनी सांगितलं. तर, पूर्वशी राऊत या उच्चशिक्षित असून ‘ठाकरे’ चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. सायन इथे त्यांचं ऑफिस आहे.

संबंधित बातम्या:

VIDEO: वेडे लोक बरळत असतात, ते कोणत्या नशेत बरळतात याचा एनसीबीने तपास करावा; राऊतांचा कंगनाला टोला

VIDEO: राज्यात प्रत्येकजण मुख्यमंत्री, मोदी सरकारमध्ये मात्र कुणालाच मंत्री आहोत असं वाटत नाही, राऊतांचा फडणीसांना टोला

Osmanabad: खासदार ओमराजेंनी काढली SBI अधिकाऱ्याची खरडपट्टी; शेतकरी कर्जासाठी गेले की, तोंडावर कागदं फेकायचे!

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...