मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, पाणीपुरवठा बंद राहणार, कधी-कोठे? वाचा…

| Updated on: Jul 09, 2021 | 9:35 PM

पाणी पुरवठा यंत्रणेत दुरुस्ती करुन पुरवठा सुरळीत करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून काही काळासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येईल.

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, पाणीपुरवठा बंद राहणार, कधी-कोठे? वाचा...
tap water-supply
Follow us on

मुंबई : पावसाळा सुरू झाला असला तरी मुंबईकरांना काही दिवस आपला पाणी वापर जपून करावा लागेल. पाणी पुरवठा यंत्रणेत काही तांत्रिक अडचणी येत असल्यानं मुंबईतील पाणी पुरवठ्यात खंड पडणार आहे. पाणी पुरवठा यंत्रणेत दुरुस्ती करुन पुरवठा सुरळीत करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून काही काळासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येईल. पश्चिम उपनगरातील एच पश्चिम, के पूर्व व के पश्चिम या 3 विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत होण्यास तांत्रिक अडचणी उद्भवल्या. त्यामुळे हा पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी तांत्रिक उपाययोजना करण्यात येत आहेत (BMC will cut water supply for repairing work in Mumbai appeal to careful use).

या पाणीपुरवठ्याशी संबंधित झडप (बटरफ्लाय व्हॉल्व) येत्या 13 जुलै 2021 रोजी बदलविण्यात येणार आहे. यामुळे एच पश्चिम, के पूर्व व के पश्चिम या 3 विभागातील जुहू, विलेपार्ले, सांताक्रुज व खार (पश्चिम), अंधेरी (पूर्व व पश्चिम) इत्यादी परिसरातील पाणीपुरवठा 13 जुलैला बंद राहिल किंवा कमी दाबाने होईल.

मुंबई महानगरपालिकेचं नागरिकांना आवाहन

पाणीपुरवठा एक दिवस बंद राहणार असल्यानं संबंधित परिसरातील नागरिकांना बीएमसीने पाण्याचा साठा करुन पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलंय. बीएमसीने म्हटलं, “बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला विविध नागरी सेवा-सुविधा देणारी बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबईकरांना पिण्याचे स्वच्छ व शुद्ध पाणी मिळावे, यासाठी देखील अव्याहतपणे कार्यरत असते. मुंबईकरांना करण्यात येणारा दैनंदिन पाणीपुरवठा हा सुरळीतपणे व्हावा, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे पाणीपुरवठा विषयक परिरक्षणाची विविध कामे वेळोवेळी आवश्यकतेनुसार हाती घेतली जातात. याच कामांचा भाग म्हणून पश्चिम उपनगरातील एच पश्चिम, के पूर्व व के पश्चिम या 3 विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत होण्यास तांत्रिक अडचणी उद्भवल्या होत्या.

“या अनुषंगाने सुरळीत पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीने सदर अडचणींबाबत आवश्यक ती तांत्रिक उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत. वेरावली जलाशय क्र 3 चे भाग क्र 2 चे वांद्रे आऊटलेटवर असलेल्या 1200 मिली मीटर व्यासाची झडप बदली करण्याचे करण्याचे काम मंगळवारी (13 जुलै) सकाळी 10 वाजेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. या काळात एच पश्चिम, के पश्चिम व के पूर्व विभागात काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्याचप्रमाणे के पश्चिम व के पूर्व विभागातील काही ठिकाणी पाणीपुरवठा खंडित होणार आहे,” अशी माहिती बीएमसीने दिली.

कोणत्या भागात कमी दाबाने पाणी आणि कुठे पाणी पुरवठा खंडीत होणार?

1. के पश्चिम विभाग

गिलबर्ट हिल – दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी 08.30 ते 11.15 वाजेपर्यंत असणाऱ्या परिसरात पाणीपुरवठा कमी दाबाने राहील. जुहू-कोळीवाडा (उर्वरित पुरवठा) – दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी 10 ते दुपारी 12.15 वाजेपर्यंत असणाऱ्या परिसरात सकाळी 8 ते 9.15 वाजता या कालावधी दरम्यान कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

चार बंगला – दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी 12.15 ते 2.10 वाजेपर्यंत असणाऱ्या परिसरात पाणीपुरवठा कमी दाबाने राहील.

विलेपार्ले (पश्चिम), जे. व्ही. पी. डी., नेहरु नगर – दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी 2.30 ते सायंकाळी 4.55 वाजेपर्यंत असणाऱ्या परिसरात पाणीपुरवठा खंडित राहील.

2. के पूर्व विभाग

विलेपार्ले (पूर्व) (संपूर्ण विलेपार्ले पूर्व डोमेस्टिक एअरपोर्ट) – दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी 5.30 ते रात्री 8 वाजेपर्यंत असणाऱ्या परिसरात पाणीपुरवठा कमी दाबाने राहील.

सहार मार्ग, ना. सी. फडके मार्ग, ए. के. मार्ग, गुंदवली गावठाण, तेली गल्ली, साईवाडी, जिवा महाले मार्ग – दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी 5.30 ते रात्री 8 वाजेपर्यंत असणाऱ्या परिसरात पाणीपुरवठा कमी दाबाने राहील.

मोगरपाडा, नवीन नागरदास मार्ग, जुना नागरदास मार्ग – दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ रात्री 8 ते 10.30 वाजेपर्यंत असणाऱ्या परिसरात पाणीपुरवठा कमी दाबाने राहील.

3. एच पश्चिम विभाग

खोतवाडी, गझदरबंध, एस. व्ही. मार्ग (खार), लिंकींग रोड (खार), सांताक्रुझ (पश्चिम), खार (पश्चिम) – दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी 6.30 ते 9 वाजेपर्यंत असणाऱ्या परिसरात सकाळी 6.30 ते 9 या कालावधी दरम्यान पाणीपुरवठा होईल.

हेही वाचा :

कोरोनाच्या लस संपल्या, मुंबईत शनिवारी, रविवारी शासकीय, महापालिका केंद्रांवर लसीकरण बंद

अग्निशमन सेवा वार्षिक शुल्क आकारण्याचा प्रस्ताव अखेर पालिकेकडून मागे, मुंबईकरांना दिलासा

बीएमसी सफाई कामगारांचा मोठा विजय, न्यायालयाकडून 580 जणांना पालिकेत कायम करण्याचा निर्णय

व्हिडीओ पाहा :

BMC will cut water supply for repairing work in Mumbai appeal to careful use