कोरोनाच्या लस संपल्या, मुंबईत शनिवारी, रविवारी शासकीय, महापालिका केंद्रांवर लसीकरण बंद

पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे मुंबई मनपा क्षेत्रातील शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर 10 जुलैला लसीकरण बंद राहणार आहे.

कोरोनाच्या लस संपल्या, मुंबईत शनिवारी, रविवारी शासकीय, महापालिका केंद्रांवर लसीकरण बंद

मुंबई : कोविड-19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर उद्या (शनिवार, 10 जुलै)लसीकरण बंद राहणार आहे. तसेच रविवारी साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी लसीकरण कार्यक्रम नियमित सुट्टी म्हणून बंद राहील. (Corona Vaccination closed at government and municipal centers in Mumbai on Saturday and Sunday)

लशींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरूप योग्य निर्णय घेऊन मुंबईकर नागरिकांना सातत्याने अवगत करण्यात येते. लशींचा साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येईल. मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

जी-उत्तर विभागात 1 लाख नागरिकांचे लसीकरण

मुंबई महापालिकेच्या जी-उत्तर वॉर्डातील 7 लसीकरण केंद्रांतून आतापर्यंत 1 लाख नागरिकांचे लसीकरण यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याची महिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

आता गर्भवती महिलाही कोरोना लस घेऊ शकणार

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण (Vaccination) करणे खूप महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत एक चांगली बातमी समोर आली आहे. आता गर्भवती महिलादेखील कोरोनाची लस घेऊ शकतात. आरोग्य मंत्रालयाने गर्भवती महिलांना लस देण्याच्या नॅशनल टेक्निकल अ‍ॅडव्हायझरी ग्रुप ऑफ इम्यूनायजेशनच्या (NTAGI​) प्रस्तावाला मंजुरी दिली आहे

आरोग्य मंत्रालयाच्या मंजुरीनंतर आता कोणतीही गर्भवती महिला कोव्हिन अ‍ॅपवर लसीकरणासाठी नोंदणी करू शकते, किंवा जवळच्या लसीकरण केंद्रावर थेट जाऊन लस देखील घेऊ शकते. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गर्भवती महिला गरोदरपणाच्या कोणत्याही टप्प्यावर लस घेऊ शकतात. गर्भवती महिलांना लस देण्यासाठी परिचालन मार्गदर्शक सूचना (ऑपरेशनल गाइडलाइन) जारी करण्यात आली आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांना आणि FLWs साठी समुपदेशन किट आणि सामान्य लोकांना दिले जाणारे IEC साहित्य सर्व राज्यांना पुरविण्यात आले आहे.

इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) नुकताच एक अभ्यास जाहीर केला आहे. त्यानुसार, कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेचा गर्भवती महिला आणि नुकतीच प्रसुती झालेल्या मातांवर अधिक परिणाम दिसून आला आहे. गंभीर लक्षणे आणि मृत्यूची प्रकरणे देखील या लाटेत जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे.

संबंधित बातम्या

लस न घेतलेल्यांचा पगार वाढणार नाही; कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी कंपन्यांची कठोर पावलं

लसीकरणात महाराष्ट्राची रेकॉर्डब्रेक कामगिरी सुरुच, दिवसभरात आठ लाख नागरिकांचे लसीकरण

(Corona Vaccination closed at government and municipal centers in Mumbai on Saturday and Sunday)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI