लस न घेतलेल्यांचा पगार वाढणार नाही; कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी कंपन्यांची कठोर पावलं

कोरोना लसीकरणाचा (Corona Vaccination) वेग वाढवण्यासाठी सरकार बरेच प्रयत्न करीत असून या प्रयत्नांचा परिणामही आता दिसून येत आहे.

लस न घेतलेल्यांचा पगार वाढणार नाही; कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी कंपन्यांची कठोर पावलं
कोरोना लसीकरण

मुंबई : कोरोना लसीकरणाचा (Corona Vaccination) वेग वाढवण्यासाठी सरकार बरेच प्रयत्न करीत असून या प्रयत्नांचा परिणामही आता दिसून येत आहे. त्याचबरोबर कॉर्पोरेट कंपन्यांमध्येही लसीकरण वाढविण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. या उपक्रमांतर्गत कंपन्या आता बर्‍याच घोषणा करीत आहेत. कंपन्या त्यांच्या कर्मचार्‍यांनी लवकरात लवकर लसीकरण करुन घ्यावे, अशा सूचना देत आहेत, जेणेकरून ते आपल्या कर्मचार्‍यांना कार्यालयात बोलावून काम सुरु करु शकतील. दरम्यान आता कंपन्यांनी लस न घेतलेल्या कर्मचार्‍यांच्या पगाराच्या वाढीबाबत काही घोषणा देखील केल्या आहेत. (get your Corona vaccination at earliest otherwise loose your salary or increment)

देशातील सर्वात जुनी लॉ कंपनी खेतान अँड कंपनीने एक वेगळीच घोषणा केली आहे. टाईम्सच्या वृत्तानुसार, कंपनीने स्पष्ट केले आहे की, ज्या कर्मचाऱ्यांनी लस घेतली नसेल, त्यांना पगारवाढ दिली जाणार नाही. जास्तीत जास्त कर्मचार्‍यांनी लस वेळेवर घ्यावी, यासाठी कंपनीने हे पाऊल उचललं आहे.

कंपन्यांकडून पगारकपात

वेतनवाढ रोखण्याव्यतिरिक्त काही कंपन्या लस न घेतलेल्या कर्मचार्‍यांचे पगार कापत आहेत. एका वित्तीय सेवा कंपनीने स्पष्ट केले आहे की त्यांच्या ज्या कर्मचाऱ्यांनी लस घेतली नसेल, त्यांच्या पगारात 5 टक्के कपात केली जाईल. तथापि, लस घेतल्यानंतर वजा केलेले पैसे परत मिळतील.

कंपन्यांना इच्छा आहे की, त्यांच्या कंपनीतील प्रत्येक कर्मचाऱ्याने शक्य तितक्या लवकर लसीकरण करुन घ्यावे, जेणेकरुन ऑफिस सुरू झाल्यावर कोणताही धोका उद्भवू नये, तसेच कोरोनाच्या भीतीपोटी पुन्हा एकदा ऑफिस बंद करण्याची गरज भासू नये.उद्योग तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार देशातील अनेक कंपन्यांना येत्या 3-4 महिन्यांमध्ये कार्यालये सुरू करायची आहेत. म्हणूनच त्यांना काही कठोर निर्णय घ्यावे लागतील.

लसीकरण हा एकमेव उपाय

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. त्यानंतर लस हा एकमेव आधार आहे. अशा परिस्थितीत, कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण लवकर व्हावे, यासाठी प्रयत्न करत आहेत. जेणेकरून ऑफिसेस सुरु करुन, कामकाजास गती देता येईल आणि आगामी काळात कोणताही धोका निर्माण होणार नाही. त्यामुळे आपणदेखील असा विचार करीत असाल की, मी घरून काम करत आहे, मला लसीकरणाची काय गरज आहे, तर सावधगिरी बाळगा. अन्यथा तुम्ही तुमचं इन्क्रीमेंट गमावून बसाल.

संबंधित बातम्या

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये सलग दोन दिवस वाढ, कोरोनाबळीही पुन्हा हजारापार

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये 8 हजारांनी वाढ, कोरोनाबळी मात्र घटले

(get your Corona vaccination at earliest otherwise loose your salary or increment)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI