Booster Dose: लागा कामाला ! आजपासून बुस्टर डोस, फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांसह व्याधीग्रस्त असणाऱ्या ज्येष्ठांसाठी मोठं पाऊल

त्यामुळेच बुस्टर डोसची सुरुवात ही चांगली बाब मानली जातेय. एवढच नाही तर एकदा फ्रंटलाईन वर्कर्स तसेच ज्येष्ठांना बुस्टर डोस दिला तर सामान्यांनाही बुस्टर डोस देण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

Booster Dose: लागा कामाला ! आजपासून बुस्टर डोस, फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांसह व्याधीग्रस्त असणाऱ्या ज्येष्ठांसाठी मोठं पाऊल
Covid boosters
| Edited By: | Updated on: Jan 10, 2022 | 8:42 AM

ज्या बुस्टर डोसची मागणी गेल्या काही काळापासून केली जात होती, तो देण्याचा मुहूर्त अखेर उजाडला आहे. आजपासून म्हणजे सोमवारपासून मुंबईसह महाराष्ट्रात बुस्टर डोस दिला जाणार आहे. याचा फायदा फ्रंटलाईन वर्कर्स, व्याधी असलेले साठ वर्षाच्या पुढचे नागरिक तसत आरोग्य कर्मचाऱ्यांना होणार आहे. नेमका किती लोकांना याचा फायदा होईल याचा सध्या तरी आकडा उपलब्ध नाही. पण ओमिक्रॉनचं वाढतं सकंट पहाता बुस्टर डोसची मात्रा जालिम उपाय ठरेल अशी जाणकारांना आशा आहे. त्यामुळेच बुस्टर डोसची सुरुवात ही चांगली बाब मानली जातेय. एवढच नाही तर एकदा फ्रंटलाईन वर्कर्स तसेच ज्येष्ठांना बुस्टर डोस दिला तर सामान्यांनाही बुस्टर डोस देण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

नेमका कुणाला मिळणार बुस्टर डोस?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केल्याप्रमाणे बुस्टर डोस तसा मोफत मिळणार आहे. ज्यांना खासगी ठिकाणाहून हा डोस घ्यायचा असेल त्यांच्यासाठी आधी जी डोसची किंमत ठरवलेली आहे, त्याच किंमतीत हा बुस्टर डोस मिळेल. सर्व सरकारी, महापालिका तसच खासगी लसीकरण केंद्रावर हा बुस्टर डोस उपलब्ध आहे. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स, तसच व्याधीग्रस्त 60 वर्षावरील नागरिकांना बुस्टर डोस दिला जातोय.


काय आहेत अटी, नियम?
सर्व शासकिय, महापालिका तसच खासगी लसीकरण केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करत किंवा थेट येऊन नोंदणी केली तरी बुस्टर डोस मिळणार आहे. ज्यांना दुसरा डोस घेऊन 9 महिने उलटले आहेत किंवा 39 आठवडे झालेत, त्यांनाच हा बुस्टर डोस मिळेल. नोकरीचे ओळखपत्र दाखवणे आवश्यक आहे तसच खासगी केंद्रात जरी लस घ्यायची असेल तरीसुद्धा सरकारी केंद्रावर येऊन वर्गवारी नोंदवावी लागेल. त्यानंतरच खासगी केंद्रावर लस घेण्याची मुभा आहे. विशेष म्हणजे सहव्याधी असलेल्या नागरिकांना बुस्टर डोस घेण्यासाठी कुठल्याही प्रमाणपत्राची गरज नाही. तसच ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांची, फ्रंटलाईन वर्कर्सची, 60 वर्षापेक्षा कमी वय असलेल्यांची नोंद कोविण अॅपमध्ये कर्मचाऱ्यांऐवजी नागरिक म्हणून नोंद झालीय, त्यांनाही शासकीय तसच महापालिका केंद्रात थेट नोंदणी करुन लस मिळेल.

हे सुद्धा वाचा:
Bigg Boss 15 Shocking | बिग बॉसच्या घरातून धक्कादायक एक्सिट, उमर रियाझ शोमधून बाहेर, रश्मी देसाईला आश्रू अनावर

बॉयलरची सफाई करताना हलगर्जी, पुण्यात उकळतं पाणी पडून चौघे भाजले, एकाचा मृत्यू

75 हजारांचा Samsung 5G स्मार्टफोन अवघ्या 39 हजारात, जाणून घ्या कुठे मिळतेय शानदार डील?