बॉयलरची सफाई करताना हलगर्जी, पुण्यात उकळतं पाणी पडून चौघे भाजले, एकाचा मृत्यू

दूध डेअरी मधील बॉयलरची सफाई करताना बाळगलेली हलगर्जी कामगारांच्या जीवावर बेतली आहे. बॉयलरमधील उकळते पाणी अंगावर पडल्यामुळे चौघे कामगार भाजले होते.

बॉयलरची सफाई करताना हलगर्जी, पुण्यात उकळतं पाणी पडून चौघे भाजले, एकाचा मृत्यू
पुण्यात बॉयलरमधील उकळते पाणी पडून कामगार भाजले
Follow us
| Updated on: Jan 10, 2022 | 8:33 AM

पुणे : दूध डेअरी मधील बॉयलरची सफाई करताना बाळगलेली निष्काळजी कामगारांच्या जीवावर बेतली आहे. बॉयलरमधील उकळते पाणी कामगारांच्या अंगावर पडले. यामध्ये चार कामगार गंभीर भाजले असून त्यातील एका कामगाराचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

चौघे जण भाजले, एकाचा मृत्यू

उकळते पाणी अंगावर पडल्याने मुकेश रामलाई कश्यप (वय 30 वर्ष) या कामगाराचा मृत्यू झाला आहे. तर सोनू श्रीप्रभूदयाल कश्यप (वय 26 वर्ष), राहुल संतोष कुमार माथूर (वय 18 वर्ष), इसाक अकबर कोतवाल (वय 45 वर्ष) हे कामगार या घटनेत गंभीर जखमी आहेत.

नेमकं काय घडलं?

ही घटना खेड तालुक्यातील चिंबळी फाटा येथे असलेल्या सहारा दूध डेअरी या ठिकाणी घडली आहे. दूध डेअरी मधील बॉयलरची सफाई करताना बाळगलेली हलगर्जी कामगारांच्या जीवावर बेतली आहे. बॉयलरमधील उकळते पाणी अंगावर पडल्यामुळे चौघे कामगार भाजले होते.

ऑपरेटर-मॅनेजरवर गुन्हा

या घटने प्रकरणी सहारा दूध डेअरी येथील ऑपरेटर अब्दुल गफार अब्दुल रशीद मुल्ला आणि व्यवस्थापक मोहितकुमार राजबहादूर सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाळुंगे पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश यमगर यांनी या बाबत फिर्याद दिली आहे.

संबंधित बातम्या :

ट्रॅक्टर-कारची भीषण धडक, दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

पोलीस कर्मचाऱ्याच्या घरासमोरच होमगार्ड तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न, नागपुरात उपचार

VIDEO | न्यूयॉर्कमध्ये आगीचं तांडव 19 जण मृत्यूमुखी, 9 चिमुकल्यांचा समावेश, मृतांमध्ये बहुतांश मुस्लिम

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.