दोन्ही शिवसेना आणि मनसेने एकत्र यायला हवे, गजानन कीर्तिकर यांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण
यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आपल्या अनुभवाचा काही उपयोग झाला नाही असे वक्तव्य करुन गजानन कीर्तिकर यांनी लक्ष वेधले होते. आता शिवसेनेचा वर्धापन दिनाच्या दिवशीच पुन्हा एकदा कीर्तिकर यांनी नवे वक्तव्य करीत खळबळ उडवून दिली आहे.

एकीकडे दोन्ही शिवसेनेचे मेळावे सुरु असताना शिवसेनेचे बुजुर्ग नेते गजानन कीर्तिकर यांनी पुन्हा मोठं वक्तव्य केले आहे. गजानन कीर्तिकर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नाराज असल्याचे चर्चा असताना आज त्यांनी पुन्हा एकदा दोन्ही शिवसेनेने आणि मनसेने एकत्र यायला हवे असे वक्तव्य केल्याने चर्चेला उधान आले आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षात फूट पाडल्यानंतर शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाणे पसंद केले होते. परंतू आता महानगर पालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे असे जुने जाणते शिवसैनिक म्हणत आहेत. आता शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र आल्यास शिवसैनिक त्यांना पाठींबा देतील असे म्हटले होते. आता पुन्हा दोन्ही शिवसेनेचा वर्धापन दिन सुरु असताना गजानन कीर्तिकर यांनी पु्न्हा एकदा दोन्ही शिवसेना आणि मनसेने एकत्र यावे असे म्हटले आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
