Breaking : सीएसएमटी, दादर, भायखळा आणि बिग बींच्या बंगल्यावर बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन, मुंबई पोलीस, बॉम्बशोधक पथकाकडून शोधमोहीम

| Updated on: Aug 07, 2021 | 12:14 AM

मुंबईतील सीएसएमटी, दादर, भायखळा आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यावर बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन मुंबई पोलिसांना आलाय. त्यानुसार या सर्व ठिकाणी मुंबई पोलिस आणि बॉम्ब शोधक पथकाकडून शोधमोहीम सुरु आहे. सीएसएमटी स्टेशनवर प्रवाशांना कुठलाही त्रास न होऊ देता ही शोधमोहीम सुरु करण्यात आलीय.

Breaking : सीएसएमटी, दादर, भायखळा आणि बिग बींच्या बंगल्यावर बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन, मुंबई पोलीस, बॉम्बशोधक पथकाकडून शोधमोहीम
Follow us on

मुंबई : मुंबईतील सीएसएमटी, दादर, भायखळा आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्या जुहूमधील बंगल्याजवळ बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन मुंबई पोलिसांना आलाय. त्यानुसार या सर्व ठिकाणी मुंबई पोलिस आणि बॉम्ब शोधक पथकाकडून शोधमोहीम सुरु आहे. सीएसएमटी स्टेशनवर प्रवाशांना कुठलाही त्रास न होऊ देता ही शोधमोहीम सुरु करण्यात आलीय. महत्वाची बाब म्हणजे ज्या नंबरवरुन हा फोन कॉल आला होता त्याला परत फोन लावल्यावर माझ्याकडे असलेली माहिती तुम्हाला दिली आहे. आता मला डिस्टर्ब करु नका, असं तो व्यक्ती म्हणाला. त्यानंतर त्याने आपला फोन बंद करुन ठेवला आहे. त्यामुळे त्या व्यक्तीचा शोध घेण्यास अडचण येत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलीय. (Anonymous phone call of bomb planted in CSMT, Dadar, Byculla)

रात्री 8 वाजून 53 मिनिटांनी रेल्वे विभागाला एक निनावी फोन आला. त्या व्यक्तीने सीएसएमटी, दादर, भायखळा, आणि अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याजवळ बॉम्ब ठेवल्याची माहिती त्या व्यक्तीने दिली. त्यानंतर रेल्वे विभागाकडून ही माहिती मुंबई पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच मुंबई पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक चारही ठिकाणांवर दाखल झालं. गेल्या दीड तासापासून या चारही ठिकाणी बॉम्ब शोधक पथकाकडून तपास सुरु आहे. मात्र, अद्याप कोणतीही स्फोटक वस्तू दिसून आलेली नाही.

सीएसएमटी स्थानकावर कसून शोधमोहीम

दरम्यान, ज्या नंबरवरुन फोन आला होता त्या नंबरवर पुन्हा कॉल केला असता मला माहिती असणारी माहिती तुम्हाला दिली आहे. आता मला डिस्टर्ब करु नका, असं म्हणत त्या व्यक्तीने फोन कट केला. पुन्हा त्या व्यक्तीला फोन केला असता त्याचा फोन बंद लागत आहे. आता त्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर सीएसएमसी स्थानकावर बॉम्ब शोधक पथक तातडीने दाखल झालं. यामुळे रेल्वे स्थानकावर काही काळ खळबळ उडाली होती. मेन लाईन आणि वेटिंग हॉल रिकामा करण्यात आला. तसंच स्थानकावर सर्व स्वच्छतागृह, खानपान स्टॉल यापासून तिकीट घर अशा सर्व ठिकाणींची चौकशी केली जात आहे.

रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार काय म्हणाले?

मला जी माहिती मिळाली की जीआरपीच्या माध्यमातून मिळाली. जशी माहिती मिळाली तशी ती रेल्वे प्रोटेक्शन फोर्सला कळवण्यात आली. त्यानंतर लगेच बॉम्प स्कॉडला पाचारण करण्यात आले आहे. बॉम्ब स्कॉकडून स्टेशनचा कोपरा ना कोपरा तपासला जात आहे. मागील दीड ते पावणे दोन तासांपासून तपासणी सुरु आहे. यामध्ये प्रवाशांना असुविधा होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. तसेच या फोनमध्ये किती तथ्यता आहे, तेही तपासले जात आहे. सध्यातरी फोन कॉलमध्ये जे सांगण्यात आले आहे, त्यानुसार काहीही सापडलेले नाही.

इतर बातम्या :

मोठी बातमी ! राज्यातील शाळा 17 ऑगस्टपासून सुरु होणार, वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई विद्यापीठात पदवीसाठी प्रवेश हवाय? नावनोंदणी सुरु, संपूर्ण प्रक्रिया एका क्लिकवर

Anonymous phone call of bomb planted in CSMT, Dadar, Byculla