AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यपाल नियुक्त 12 जागांचं वाटप कसं होणार?; महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला समोर

Maharashtra Governor Appoints 12 Seats : राज्यपाल नियुक्त 12 जागांचा फॉर्म्युला काय आहे? कोण किती जागा लढणार आहे? याची आकडेवारी आता समोर आली आहे. महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला काय? राज्यपाल नियुक्त 12 जागांचं वाटप कसं होणार? वाचा सविस्तर बातमी...

राज्यपाल नियुक्त 12 जागांचं वाटप कसं होणार?; महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला समोर
महायुती
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Sep 05, 2024 | 2:39 PM
Share

राज्यपाल नियुक्त 12 जागा मागच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळापासून रिक्त आहे. अशातच आता या 12 जागांवर नियुक्ती केली जाण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. याचा फॉर्म्युला काय असणार आहे? यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय, शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी भाष्य केलं आहे. आधी समसमान वाटप होणार होतं. 4- 4- 4 चा फॉर्मुला ठरला होता. मात्र आता भाजपाला 6 शिवसेनेला 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 3 असा फॉर्मुला ठरला असल्याची माहिती मिळते आहे, असं चंद्रकांत रघुवंशी म्हणालेत. चंद्रकांत रघुवंशी हे विधान परिषदेवर जाण्यासाठी इच्छुक आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पूर्ण विश्वास आहे ते मला न्याय देतील, अशी मला अपेक्षा आहे, असं चंद्रकांत रघुवंशी म्हणालेत.

लवकरच 12 जागावर नियुक्तीची शक्यता

कोर्टाकडून सांगण्यात आलेला आहे की राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या विषयांमध्ये ते हस्तक्षेप करू शकत नाही. तो महाराष्ट्र शासनाचा विषय आहे सरकारचा विषय सरकारचा अधिकार आहे. त्यामुळे आता कोणत्याही क्षणी राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या विषय मार्गी लागेल अशी शक्यता बळावली आहे, असं रघुवंशी यांनी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

मी आज वर्षा बंगल्यावर जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली आहे. उद्धव ठाकरे यांनीच राज्यपाल नियुक्त 12 आमदारांमध्ये संधी देणार, असं वचन मला दिलं होतं. त्या यादीत माझं नाव टाकलं होतं. पण ज्यावेळी उठाव झाला. त्यावेळी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलो. त्यामुळे मी त्यांना विनंती केली आहे की, माझा विचार करण्यात यावा. मला संधी देण्यात यावी, असं चंद्रकांत रघुवंशी यांनी म्हटलं आहे.

माझा मतदारसंघ हा राखीव आहे. आदिवासींसाठी राखीव आहे. त्या ठिकाणी मी निवडणूक लढवू शकत नाही. पण त्या ठिकाणच्या ज्या दोन जागा आहेत. त्या निवडून देण्यामध्ये आमचा मोठा हात आहे. हेच कारण आहे की भविष्यातही शिवसेना जर वाढवायची असेल. तर माझा विचार करण्यात यावा असा आवाहन मी दोन्ही नेत्यांना केलं आहे, असं चंद्रकांत रघुवंशी यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना म्हटलं आहे.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना