Uddhav Thackeray: मला तो खेळच खेळायचा नाहीय, उद्धव ठाकरेंची भावना, शिवसेना प्रमुखाच्या पुत्राला खाली उतरवलं याचं पुण्या त्यांच्या पदरात पडू द्या

| Updated on: Jun 29, 2022 | 10:28 PM

ज्या साध्या साध्या शिवसैनिकांना मोठं केले त्या शिवसैनिकांनीच शिवसेना प्रमुखाच्या पुत्रालाच मुख्यमंत्री पदावरून खाली खेचण्याचं पुण्य त्यांच्या पदरात पाडून घेतले आहे. ते पुण्य त्यांच्या पदरात पडलं तर पडू द्या

Uddhav Thackeray: मला तो खेळच खेळायचा नाहीय, उद्धव ठाकरेंची भावना, शिवसेना प्रमुखाच्या पुत्राला खाली उतरवलं याचं पुण्या त्यांच्या पदरात पडू द्या
उद्धव ठाकरे आज राजीनामा
Follow us on

मुंबईः महाराष्ट्रातील बंडखोरीनाट्याचा (Rebel MLA) पडदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याने पडला. मुख्यमंत्री व शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजीनामा (Chief Minister Uddhav Thackeray Resign) दिल्याची घोषणा करण्याआधी त्यांनी भाषण करताना तुमच्या सहकार्यामुळे वाटचाल चांगली झाल्याचे सांगितले. सत्तेत आल्यानंतर सरकार म्हणून काय केले याबद्दलची माहिती सांगत त्यांनी घटक पक्षाचे आभार मानले. यावेली त्यांनी सोनिया गांधी, शरद पवार यांचेही आभार मानले.

या गोष्टी सांगताना बंडखोरी केलेल्या बंडखोर आमदारांबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, ज्या साध्या साध्या शिवसैनिकांना मोठं केले त्या शिवसैनिकांनीच शिवसेना प्रमुखाच्या पुत्रालाच मुख्यमंत्री पदावरून खाली खेचण्याचं पुण्य त्यांच्या पदरात पाडून घेतले आहे. ते पुण्य त्यांच्या पदरात पडलं  तर पडू द्या अशी भावनिक मत व्यक्त करत त्यांच्यावर  विश्वास ठेवला हे मी पाप केल्याचं त्यांनी सांगितले.

त्यात मला रस नाही

यावेळी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांबद्दल बोलताना त्यांनी सांगितल की, बंडखोर आमदार उद्या तुम्ही बहुमत सिद्ध कराल, आणि ते ही इतरांना सोबत घेऊन त्यामध्ये मला रस नाही असंही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी वर्षा बंगला सोडतानाची आठवणही त्यांनी सांगितली.

त्यांच्यावर विश्वास ठेवला हे पाप माझं

बहुमताचा मला खेळच खेळायचा नाही असं सांगत त्यांनी मुख्यमंत्री होण्याचा आपला मानस नव्हता, तरीही मला मुख्यमंत्री केला, तुमच्यासोबत काम करण्याची संधी दिली त्याबद्दलही त्यांनी आभार मानले. शिवसेनेन कोणाला मोठं केलं हे सांगताना त्यांनी नगरसेवकांपासून ते अगदी हातभट्टीवाल्यापर्यंतच्या लोकांना शिवसेनेने कशी संधी दिली हेही सांगितले.

शिवसेनेच्या बंडखोरांना टोला

उद्या ते अभिमानाने सांगितली बघा शिवसेना प्रमुखांनी मला इथपर्यंत आणलं. पण त्याच्या पुत्राला आम्ही उतरवला की नाही हे पुण्य घेऊन ते गावागावात हिंडतील हा त्यांचे पुण्य आहे असा टोला शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना मारला.