सीजेपीचं मुंबईत आंदोलन, अभिजित दीपकेंचा संघ आणि मोदींवर जोरदार हल्लाबोल, गांधी नेहरूंबद्दल काय म्हणाले?
सीजेपीचे मुंबईत आंदोलन सुरु आहे. यावेळी अभिजित दीपकेंनी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली आहे. गांधी कभी मरते नहीं. कितीही प्रयत्न का गांधी कधी मरणार नाहीत. नरेंद्र मोदी स्वतः सांगतात की मी गांधीच्या देशातून आलो आहे. निवडणुका जिंकून गांधी, आंबेडकर आणि नेहरूंपेक्षा मोठं होऊ असं वाटतं, असं दीपकेंनी म्हटलं आहे.

सीजेपीचे मुंबईत आंदोलन सुरु आहे. यावेळी अभिजित दीपकेंनी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली आहे. गांधी कभी मरते नहीं. कितीही प्रयत्न का गांधी कधी मरणार नाहीत. नरेंद्र मोदी स्वतः सांगतात की मी गांधीच्या देशातून आलो आहे. निवडणुका जिंकून गांधी, आंबेडकर आणि नेहरूंपेक्षा मोठं होऊ असं वाटतं, असं दीपकेंनी म्हटलं आहे.
इथे उपस्थित प्रत्येकजण गांधी आहे. गांधींना गोळ्या घालून मारु असं यांना वाटतं, पण जोपर्यंत या देशामध्ये आम्ही आहोत. तोपर्यंत गांधी कधी मरणार नाहीत. गोडसेंच्या विचारधारेच्या लोकांना सांगायचंय की गांधी कधीही मरणार नाहीत.
कोणीतरी महामानव येतो आणि म्हणतो की मी नॉन बायोलॉजिकल आहे. पण तुम्हाला सांगायची काय आवश्यकता आहे. आम्हाला माहितीच आहे की तुम्ही नॉन बायोलॉजिकल आहात. कारण तुम्ही म्हणता विश्वगुरु आहात, असं म्हणता. नरेंद्र मोदी तुम्ही अमेरिकेत गेला तर राष्ट्राध्यक्ष ट्रम्पदेखील म्हणतात की नरेंद्र मोदी गांधींच्या देशातून आले आहेत, अशा शब्दांत दीपकेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.
यांना वाटतं की आपण गांधी नेहरु आणि आंबेडकरांपेक्षा मोठे होऊ. पण तेवढी तुमची औकात नाही. गांधी हे देशाचा आत्मा असतील तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देशाचा कणा आहेत. तर नेहरु हे देशाचा मेंदू आहेत. त्यामुळे देशासाठी गांधी आंबेडकर आणि नेहरुच मोठे आहेत. त्यांच्यापेक्षा मोठे तुम्ही कधीही होऊ शकत नाही. त्यांनी देशासासाठी किती बलिदान दिलं. त्यांनी देशातील नागरिकांना मतदानाचा अधिकार दिली. तेव्हा कोणालाही याबद्दल माहिती नव्हती. १९५१ मध्ये किती लोकांना त्यांच्या मूलभूत अधिकारांबद्दल माहिती होती? कोणाला माहिती होतं की निवडणुका काय असतात? गांधी आंबेडकर आणि नेहरुंनी लोकांना त्यांचे हक्क अधिकार दिले आहेत. त्यामुळे ते महान आहेत. याऊलट या लोकांचं सुरु आहे. हे अधिकार काढा, ते अधिकार काढा असं सगळं सुरु आहे. अरे कधीकाही देण्याचीही भूमिका घ्या. देशाला किती लूटणार तुम्ही, असा घणाघात अभिजित दीपकेंनी केला आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
