मुख्यमंत्री देणार विद्यार्थ्यांना संविधानाचे धडे, उद्यापासून या नव्या उपक्रमाची सुरुवात
मुलांमधून सुजाण नागरिक-सक्षम भारत घडवण्यासाठी 'सुजाण नागरिक-सक्षम भारत’ उपक्रमाची सुरुवात होत आहे. याचे उद्घाटन उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्त होणार आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता विद्यार्थ्यांना संविधानाचे धडे देणार आहेत. मुंबई महापालिकेच्या ‘सुजाण नागरिक-सक्षम भारत’ उपक्रमाचे उद्या उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विद्यार्थ्यांना पुस्तकातील धडा वाचून दाखवणार आहेत.
मुंबई महापालिकेच्या ‘सुजाण नागरिक-सक्षम भारत’ उपक्रमाचे उद्या उद्घाटन होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमात स्वत: मुख्यमंत्री विद्यार्थ्यांना पुस्तकातील धडा वाचुन दाखवणार आहेत.
‘सुजाण नागरिक-सक्षम भारत’
दादर येथील मुंबई पब्लिक स्कूलमध्ये उद्या ‘सुजाण नागरिक-सक्षम भारत’ या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये संवैधानिक मूल्ये, मूलभूत कर्तव्ये, सामाजिक न्याय आणि लोकशाही मूल्यांची जाणीव रुजविण्यासाठी ‘सुजाण नागरिक-सक्षम भारत’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. ‘स्मार्ट नागरिक’ आणि ‘विद्यार्थी प्रेरणा’ या पुस्तिकांचेही प्रकाशन होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत भारताचे माजी सर न्यायाधीश भूषण गवई, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे देखील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारीही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.