मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray address the State) यांनी आज पुन्हा एक सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 1100 च्या दिशेने वाटचाल करत (CM Uddhav Thackeray address the State) आहे. त्यादृष्टीने राज्य सरकार काय काय पावलं उचलत आहे, त्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
केंद्राने जे दिलंय ते वाटतोय, पण केंद्राने सगळंच दिलंय असा गैरसमज करु नका. सर्वांवर भार आहे, केंद्रावर आहे, राज्यांवर आहेच, पण प्रत्येक माणसावर भार आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. सध्या जे युद्ध आहे त्यातून बाहेर पडायचं आहेच, पण येणाऱ्या काळात आर्थिक युद्धाचाही सामना करायचा आहे. त्यासाठी मला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.
मुख्यमंत्री काय म्हणाले?
या युद्धा जे जे कोणी उतरुन काम करत आहेत त्या सर्वांना धन्यवाद देतो. या सर्वांच्या सोबतीने आपण हे युद्ध लढत आहोत.
काल मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्याचे काही फोटो आले, सर्वजण मास्क लावून, अंतर ठेवून बसले होते. कदाचित व्हिडीओ कॉन्फरन्सने घेतलेली ही पहिली मंत्रिमंडळ बैठक होती. सर्व मंत्री त्या त्या जिल्ह्यात होते, त्या सर्वांचे धन्यवाद. सर्वांच्या सूचना येत आहेत, सर्वजण टीमवर्क करत आहेत, त्या सर्वांना धन्यवाद द्यायचे आहे.
काल ४ आठवडे झाले, मुंबई-पुण्यात पहिला रुग्ण सापडून. रुग्णात वाढ होत आहे, मला ती नको आहे. ती खाली आणायची आहे.
कोरोना जगाच्या मागे लागला आहे, पण आपणही कोरोनाच्या मागे हात धुवून लागला आहे.
आपण घरी बसून आहात, गैरसोय होतेय मला माहिताय… त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.. पण घरी राहणंच योग्य आहे…
कोरोना आपल्या मागे हात धुवून लागला आहे, तुम्ही घरी बसून गैरसोय होत आहे, त्याबद्दल दिलगीर, पण नाईलाज आहे, बातम्या देत राहा, मात्र प्रेक्षक तणावमुक्त कसे राहतील, असे कार्यक्रम दाखवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाइव्ह https://t.co/ImprYhMJl7pic.twitter.com/pfGKPKOevK
घरात राहूनही आपली जनता आनंदी कशी राहील, हे वृत्तवाहिन्या आणि इतर वाहिन्यांनी पाहावं. जुन्या मालिका, चांगल्या सीरियल्स दाखवाव्या…
मी खाण्यावर निर्बंध आणू इच्छित नाही, मधुमेह, रक्तदाब यासारख्या आजारांसाठी खाण्यावर बंधनं ठेवावी.. ६० पेक्षा जास्त वय असलेले आणि व्याधी असणारे हायरिस्कमध्ये आहेत.. त्यांनी खाण्यावर निर्बंध ठेवावे..
ज्यांना योगा शक्य नाही त्यांनी हलका फुलका व्यायाम घरच्या घरी करावा… हे युद्ध जिंकायचं आहे. हे जिंकल्यानंतर मोठं युद्ध असेल अर्थव्यवस्थेचं.. त्यासाठी आपल्याला तयार राहावं लागेल. त्यासाठी ताकद, हिंमत असायला हवी. त्यासाठी तयार राहावं.
जगभरातून बातम्या येत आहेत, माझ्या कानात कोणी बातम्या सांगत नाहीत, मीडियातूनच कळतं.. जपानमध्ये आणीबाणी, अमेरिकेत काय सुरुय माहिताय… चीनमधील वुहानमध्ये सर्व निर्बंध उठवले ही दिलासादायक बातमी आहे..
साधारण ७५-७६ दिवसांनी वुहानमध्ये निर्बंध हटले.. जर ताणलं गेलं तर किती असू शकतं त्याची ही चुणूक आहे..
हे दिवस असेच राहणार नाहीत, याच्याशी युद्ध करु… हे दिवस गेल्यानंतर तुमचा पाठिंबा मला हवा
ज्यांच्याकडेे रेशन कार्ड नाही, त्यांच्यासाठी शिवभोजन आहे. जेवणाची चिंता करु नका.
केंद्राने दिलेल्या योजनेत फक्त तांदूळ, यात केशरी शिधापत्रिका धारक नाहीत, मध्यमवर्गीय जनतेसाठी योजना आणा, अशी विनंती पंतप्रधान मोदींना फोन करून दिली – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाइव्ह https://t.co/ImprYhMJl7pic.twitter.com/iByo4Xy60D
केंद्राची उत्तम सहकार्य आहे. केंद्राने आपल्याला फक्त तांदूळ दिलं आहे. पण हे फक्त काही ठराविक लोकांसाठी आहे. ज्यांचे उत्पन्न हे 50 हजारच्या आसपास आहे. त्यांनाही काही योजना केली पाहिजे.
भार सर्वांवर आहे. राज्य आणि केंद्र सरकरावर आहे. जनतेवरही भार आहे.
केशरी रेशनकार्ड धारकांना ३ रुपये दराने तांदूळ आणि ८ रुपये दराने गहू देत आहोत
अमेरिका भारताकडे औषध मागते. महाराष्ट्रात गुजरात इतर काही कंपन्या ज्या व्हेंटिलेटर बनवत नाही त्या ते बनवतात.
तुमच्या खाण्यावर बंधन आणत नाही, पण ज्यांना स्थूलता किंवा इतर विकार आहेत, त्यांनी खाताना काळजी घ्या, घरच्या घरी व्यायाम करा, हे युद्ध जिंकल्यावर आर्थिक युद्ध लढण्यासाठी आपली शारीरिक क्षमता राखायची आहे
वुहानमधील सर्व निर्बंध ७६ दिवसांनी हटले ही मोठी बातमी, जर हे ताणलं गेलं तर किती दिवस लागतील, याची ही चुणूक आहे, हे दिवसही निघून जातील
केशरी शिधापत्रिका धारकांना गहू आणि तांदूळ माफक किमतीत उपलब्ध करून देणार
पीपीई कीटची कमतरता आहे, अमेरिका भारताकडे मदत मागत आहे, हे संकट अख्ख्या जगभरात, औषधांचा मुबलक साठा
मास्क घरच्या घरी बनवता येतील, मात्र ते स्वच्छ धुवा, आपला मास्क आपणच टाका, ते टाकताना खबरदारी घ्या, सुरक्षित जागा पाहून मास्क जाळा, त्याची राख नीट टाका
फीवर क्लिनिक प्रत्येक विभागात करणार, सर्दी खोकला ताप असलेल्या व्यक्तींनी तिथेच जावे, सौम्य, मध्यम आणि तीव्र अशा विविध स्वरूपाच्या रुग्णांसाठी विभागवार रुग्णालय, अशा चार प्रकारात आरोग्यसेवा
२१ हजार विलगीकरण, १७ हजार जणांच्या चाचण्या, १०१८ जणांना लागण, त्यापैकी ६१० रुग्णांना सौम्य लक्षणं, ११० जणांना लक्षणं, त्यापैकी २६ जण गंभीर, ८० रुग्ण उपचार होऊन बरे, ६४ जणांचा मृत्यू, आज पहिला रुग्ण सापडून चार आठवडे पूर्ण- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाइव्ह
माजी सैनिकांना आवाहन
ज्यांनी मेडिकल क्षेत्रात काम केलं आहे, अशा निवृत्त सैनिकांनी,अशा माजी अधिकाऱ्यांनी पुढे यावं तुमची महाराष्ट्राला गरज आहे.
हा काळ विषाणूंच्या गुणाकारांचा आहे
१०४८ पैकी ६०० लोकांना सौम्य लक्षण आहे
८० लोक बरी होऊन घरी गेले आहेत.
६४ लोक मृत झाले
आपण घरोघरी जाऊन टेस्ट करतो.
मुंबईत भितीदायक आहेत. पण मुंबई पुण्यात चाचण्या वाढवल्या आहेत. पीपीई किट आहे.
सर्व गोष्टी प्रमाणित करुन घेतो. ज्या क्षणी ते उपलब्ध होतील, तेव्हा ते महाराष्ट्रात आणू
चौथा आठवडा असला तरी त्याचे आकडे हे तज्ज्ञांनी परीक्षण करा
आपण आपले वीर, आपणच आपले शत्रू आपण आपले रक्षक हे लक्षात ठेवा
निवृत्त सैनिक ज्यांना आरोग्य सेवेचा अनुभव आहे, निवृत्त सिस्टर किंवा वॉर्डबॉय किंवा भरतीची संधी न मिळालेल्या प्रशिक्षित व्यक्तींनी या युद्धात सामील व्हावे, असे आवाहन करतो, Covidyoddha@gmail.com यावर नाव-नंबरने संपर्क साधा