मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टी झालेल्या भागांचा प्रत्यक्ष दौरा करावा, लोकांना दिलासा मिळेल- प्रकाश आंबेडकर

| Updated on: Oct 17, 2020 | 10:33 AM

प्रकाश आंबेडकरांच्या या मागणीनंतर उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल. | CM Uddhav Thackeray should visit heavy rain places in Maharashtra

मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टी झालेल्या भागांचा प्रत्यक्ष दौरा करावा, लोकांना दिलासा मिळेल- प्रकाश आंबेडकर
Follow us on

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील अतिवृष्टी झालेल्या भागाचा प्रत्यक्ष दौरा करावा. त्यामुळे लोकांना मोठा दिलासा मिळेल, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केले. वादळी पावसाने महाराष्ट्राला झोडून काढल्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक भागांतील वस्त्यांमध्ये पाणी शिरले असून त्यामुळे साठवलेले अन्नधान्य भिजले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या पिकाचेही मोठे नुकसान झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापैकी काही भागांचा दौरा करावा. जेणेकरून येथील लोकांना दिलासा मिळेल. तसेच आपातकालीन व्यवस्थापनासोबत तातडीने बैठक घेऊन काय मदत करणार, हेदेखील जाहीर करावे, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. CM (Uddhav Thackeray should visit heavy rain places in Maharashtra)

कोरोना संकटाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर न पडत असल्याची टीका सातत्याने विरोधकांकडून केली जाते. त्यामुळे आता प्रकाश आंबेडकरांच्या या मागणीनंतर उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.


दरम्यान, परतीच्या पावसामुळे राज्यभरात झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे 18 आणि 19 ऑक्टोबरला मराठवाड्याचा दौरा करतील. या दोन दिवसीय दौऱ्यात शरद पवार तुळजापूर, उमरगा,औसा, परंडा ,उस्मानाबादमधील भागांना भेटी देऊन नुकसानीचा आढावा घेतील.

यापूर्वी शरद पवार यांनी निसर्ग चक्रीवादळानंतर कोकण दौरा केला होता. पवार यांनी तेथील परिस्थितीची आढावा घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती. यानंतर राज्य सरकारकडून नुकसान भरपाईसंबंधी निर्णय घेण्यात आले होते. त्यामुळे आतादेखील शरद पवार यांच्या मराठवाडा दौऱ्यानंतर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी महत्वपूर्ण निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या:

प्राणहानी होता कामा नये, सतर्क राहून लोकांना विश्वासात घेऊन काम करा; मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

गेल्यावर्षी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन 25 हजार मदतीची मागणी, आता मुख्यमंत्री आहात, तातडीने मदत करा : राजू शेट्टी

(Uddhav Thackeray should visit heavy rain places in Maharashtra)