CM Uddhav Thackerey : रावणाचा जीव बेंबीत होता, काहींचा जीव मुंबईत, मुख्यमंत्र्यांचं देवेंद्र फडणवीसांना थेट उत्तर

| Updated on: Mar 25, 2022 | 5:52 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी फडणवीसांना तसेच खोच उत्तर दिलंय. रावणाचा जीव बेंबीत होता तसा काहींचा जीव मुंबईत अडकला आहे म्हणत त्यांनी फडणवीसांना थेट उत्तर दिलंय.

CM Uddhav Thackerey : रावणाचा जीव बेंबीत होता, काहींचा जीव मुंबईत, मुख्यमंत्र्यांचं देवेंद्र फडणवीसांना थेट उत्तर
मुख्यमंत्र्यांचं फडणवीसांना थेट उत्तर
Image Credit source: Vidhansabha
Follow us on

मुंबई : गुरूवारी विधानसभेत बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) भ्रष्टाचाराचे आरोप करत जोरदार बॅटिंग केली. मुंबई महानगपालिकेची (Bmc) तर यादीच फडणवीसांनी वाचली. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी फडणवीसांना तसेच खोच उत्तर दिलंय. रावणाचा जीव बेंबीत होता तसा काहींचा जीव मुंबईत अडकला आहे म्हणत त्यांनी फडणवीसांना थेट उत्तर दिलंय. काही दिवसात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत भाजप तीन दशकापासून ठाण मांडूण बसलेल्या शिवसेनेला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर मुंबई महानगरपालिका पुन्हा जिंकण्यासाठी शिवसेनेकडून आणि सरकारकडून रोज नव्या घोषणा करण्यात येत आहे. यावरून या अधिवेशनातही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडजंगी सुरू आहे. अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषण करताना फडणवीसांच्या कालच्या टीकेचा समाचार घेतला आहे.

मुंबईतल्या कामचा पाढा वाचला

मुंबईत केलेल्या कामांचा पाडा मुख्यमंत्र्यांनी आज वाचून दाखवला आहे. यावेळी 500 स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून पूर्ण सूट दिली आहे. 139 प्रकारच्या मोफत तर काही नाममात्रं दरात चाचण्या करून देत आहोत. मुंबई मॉडल जगभरात प्रसिद्ध झालं आहे. सर्वांनी त्याचं कौतुक केलं. कोविडमधून बरे होतात. पण द्वेषाच्या कावीळ जरी झाली असेल तर त्याचा उपचार कोणत्या दवाखान्यात करता येत नाही. कावीळ झालीय. पण द्वेषाची कावीळ बरीच होऊ शकत नाही. त्याला काय करणार, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी फटकेबाजी केली.

धारावीचा पुनर्विकास होणार

तसेच मेट्रोचं काम आपण बंद केलं नाही. अजून वाढत आहोत. मेट्रोच्या काळात 10 हजार कोटीच्या वाढीचा प्रस्ताव हा आमच्या काळात नाही. तुमच्या काळातला आहे. मुंबईत मराठी भाषा भवन उभारणार, 2 एप्रिलपासून कामाला सुरुवात करतोय असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसेच धारावी पुनर्विकास प्रकल्प करायचा आहे. रेल्वेची 45 एकर जमीन आहे. अर्धे पैसे भरले. पण केंद्र काही दर्जा देत नाही, असे म्हणतानाच मराठी भाषा अभिजात दर्जा काही होत नाही. बॉम्बेचं मुंबई उच्च न्यायालय काही होत नाही. सीमाप्रश्न सोडवलं जात नाही. केंद्र सरकार कुणाची बाजू घेतं हे पाहिलं तर दिसून येईल, असे म्हणत त्यांनी केंद्रावर आरोप केले आहेत.

दहिसर भूखंडावरूनही टोलेबाजी

दहिसरचा भुखंडांचा पाठपुरावा कोणी केला. 211 पासून महापालिकेत त्याचा पाठपुरावा सुरू होता. त्यात फडणवीसांची सही आहे. एक्झामिन आणि डू द नीडफूल, असा रिमार्क असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यावेळचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, त्यांचा उल्लेख केला तर चालेल ना? असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी खोचक सवाल केला आहे. केरळाचं उत्तर तामिळनाडूला दिल्यासारखं नाही होणार ना? मी विचारतो, मला माहीत नाही या गोष्टी, असे म्हणत त्यांनी चिमटे काढले. हॉस्पिटल व्हावं ही सर्वांची भूमिका आहे. भूखंड ताब्यात घेण्याचा प्रस्ताव सुधार समितीत भालचंद्र शिरसाटने ठेवला होता. दर ठरवण्याचं काम पालिका करत नाही. महसूल खातं करतं. पालिकेने ज्यादा दराला आक्षेप घेतला होता, असेही त्यांनी सांगितलं.

कोरोनाकाळात पालिकेने चांगलं काम केलं

पालिकेने कोविड काळात चांगलं काम केलं. कोविड काळात मोदींना पक्षभेद विसरून सर्वांना समान मदत केली. मी कबूल करेल. त्याबाबत मी कद्रूपण करत नाही. केंद्राने सेक्रेटरीचा गट तयार केला होता. त्यांनी पीपीई किट्स ऑक्सिजन दिले. ज्यावेळी गरज होती, त्यावेळी त्यांनी पुरवल्या. टेंडर काढल्या होत्या. वाटाघाटी करून किंमती ठरवल्या होत्या. कोणी तरी बुडत असेल तर पोहता येत नसेल तर टायर आणि लाकूड देऊन वाचवणार की टायरचं टेंडर काढणार. काही तरी करतो ना. पालिकेने शॉर्ट टेंडर काढून काम केलं. धारावी वाचवली. सर्वांनी कौतुक केलं. केंद्राचं पथक यायचं ते थरथरायचं. ते म्हणायेच काही करा पण धारावी वाचवा. पालिकेची यंत्रणा धारावीत उतरली. त्याचं कौतुक करू नका, पण घरच्या म्हातारीचा काळ होऊ नका, असा टोलाही त्यांनी लगावला.

सरकार एसटीच्या संपावर तोडगा काढण्यात अपयशी ठरलं, परबांनी भर विधानसभेत मान्य केलं

Santosh Bangar यांचा प्रकाश आंबेडकरांवर घणाघात, गेल्या निवडणुकीत पैसे घेतल्याचा आरोप

विवेक अग्निहोत्री पुन्हा वादात, म्हणतात “भोपाळी” म्हणजे समलैंगिक, तर दिग्विजय सिंह म्हणतात हा संगतीचा परिणाम…