मुंबईतील कॉलेजांसह विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरा, समाजकल्याणचे आवाहन

| Updated on: Feb 23, 2021 | 7:56 PM

यासाठी महाडिबीटी पोर्टल 3 डिसेंबरपासून सुरू झालेले आहे. (Colleges apply for scholarships)

मुंबईतील कॉलेजांसह विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरा, समाजकल्याणचे आवाहन
Follow us on

मुंबई : मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांना आणि विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी MAHADBT संकेतस्थळावर अर्ज भरा, असे आवाहन मुंबई शहराचे समाजकल्याण सहाय्यक आयुक्त समाधान इंगळे यांनी केले आहे.

मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थी प्रवेश घेत असतात. यंदा 2020-21या शैक्षणिक वर्षाकरीता शिष्यवृत्ती, शिक्षण फी आणि परीक्षा फी, राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, निर्वाह भत्ता इत्यादी योजनांचे अर्ज ऑनलाईन भरले जातात. यासाठी महाडिबीटी पोर्टल 3 डिसेंबरपासून सुरू झालेले आहे.

त्या अनुषंगाने सर्व महाविद्यालयांनी अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील नवीन प्रवेशित (Fresh) आणि नुतनीकरण (Renewal) महाडिबीटी प्रणालीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याकरीता विद्यार्थ्यांना आपल्या स्तरावरुन सूचना द्याव्यात.

महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर प्राप्त अर्जाची पडताळणी करावी. तसेच परिपूर्ण पात्र अर्ज जिल्हा समाज कल्याण लॉगिनला दिलेल्या मुदतीत ऑनलाईन पध्दतीने पाठवावेत. सन 2011-12 ते 2017-18 या कालावधीमधील अन्वेषण प्रस्तावामधील आवश्यक प्रपत्र ‘ क ‘ महाविद्यालयांनी येत्या 26 फेब्रुवारी 2021 पर्यंत सादर करावेत. ही अंतिम मुदत असून त्यानंतर प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत.

सन 2018-19 आणि 2019-20 या वर्षामधील महाडीबीटी पोर्टलवरील बऱ्याच विद्यार्थ्यांचे आधार नंबर बँकेमधील विद्यार्थ्यांच्या खात्याशी NPCI लिंक नसलेले आहे. विद्यार्थ्यांचे अनुदान त्यांचे खातेवर वर्ग झालेले नाही, अशा विद्यार्थ्यांनी तात्काळ त्यांचा आधार नंबर त्यांच्या बँकेमधील खात्यासोबत NPCI लिंक करावे. त्यानंतर महाडीबीटी प्रणाली मधील त्यांचे खाते अपडेट करावे, असे आवाहन समाधान इंगळे यानी केले आहे.

संबंधित बातम्या : 

आरोग्य विभागाच्या भरतीत परीक्षेआधीच सावळा गोंधळ, लाखो उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

आता ग्रामस्थांना भूकंप, वादळातही तग धरणारी घरे मिळणार; आयआयटीच्या मदतीने घर बांधणी; मुश्रीफांची मोठी घोषणा