आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात मालमत्ता कर वसुलीत 100 कोटींची तफावत; काँग्रेसचा घरचा आहेर

| Updated on: Mar 24, 2021 | 3:21 PM

राज्यातील सत्तेत शिवसेना आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकदिलानं काम करत असले तरी मुंबई महापालिकेत या दोन्ही पक्षांमधून विस्तव जाताना दिसत नाही. (congress in bmc demands probe into ‘malpractices’ in property tax collection)

आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात मालमत्ता कर वसुलीत 100 कोटींची तफावत; काँग्रेसचा घरचा आहेर
रवी राजा, विरोधी पक्षनेते, मुंबई महापालिका
Follow us on

मुंबई: राज्यातील सत्तेत शिवसेना आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकदिलानं काम करत असले तरी मुंबई महापालिकेत या दोन्ही पक्षांमधून विस्तव जाताना दिसत नाही. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघात मालमत्ता कर वसुलीत 100 कोटींची तफावत असून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पालिकेतील काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे. (congress in bmc demands probe into ‘malpractices’ in property tax collection)

रवी राजा यांनी टीव्ही9 मराठीशी बोलताना शिवसेनेला हा घरचा आहेर दिला आहे. तसेच महापालिकेत 700-800 कोटींचा मालमत्ता कर वसूली घोटाळा झाल्याचा आरोपही केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. जागा मालक, पालिका अधिकारी यांच्या संगनमताने हा 700-800 कोटींचा मालमत्ता कर वसूली घोटाळा झाला असून कोट्यवधी रुपयांची मालमत्ता, कर प्रत्यक्षात फक्त काही लाखात वसूल झाला असल्याचा आरोप रवी राजा यांनी केला आहे.

अधिकाऱ्यांच्या संगनमताने घोटाळा

सध्या राज्यात 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा मुद्दा चांगलाच गाजत असताना मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी, मुंबई महापालिकेतील कर निर्धारण व संकलन विभागातील काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. एकट्या जी/ दक्षिण विभागातील वरळी भागातील मालमत्ता कर वसुलीत 100 कोटींचा तर संपूर्ण मुंबईत 700 ते 800 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप रवी राजा यांनी केला आहे. या प्रकरणी पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी सखोल चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. तसेच याबाबत आयुक्तांना पत्र लिहिणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

मालमत्ता मोजमाप कमी दाखवून आकारला जातोय कर

वरळी, परळ यांसारख्या भागात अनेक ठिकाणी मिलच्या मोक्याच्या व कमर्शियल जागा आहेत. यामध्ये कमला मिल, रघुवंशी मिल, मॉल्स, पब, इंडस्ट्री आदी कोट्यवधी रुपये किमतीच्या जागा आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून पालिकेला मालमत्ता करापोटी काही कोटी रुपये येणे अपेक्षित असते. मात्र कर निर्धारण व संकलन विभागातील अधिकारी मालमत्ता कर आकारणी करताना व त्यांची देयके संबंधित जागा मालकांना पाठवताना त्यांच्या जागेचे आकारमान व त्यांचे मूल्य कमी दाखवतात. त्यामुळे त्या मालमत्तेचा मालमत्ता कर हा काही कोटींऐवजी काही लाखात आकारला जातो. त्यामुळे पालिकेला कोट्यवधी रुपयांच्या महसुली उत्पन्नाला मुकावे लागते. मात्र संबंधित खात्याचे अधिकारी हे संबंधित मालकांकडून चिरीमिरी घेऊन गब्बर होतात आणि त्यामध्ये त्या कोट्यधीश लोकांनाही चांगलाच आर्थिक लाभ होतो, असे रवी राजा म्हणाले.

असा झाला घोटाळा

जी / दक्षिण वार्डात वरळी, डॉ. आंबेडकर रोड, शिवसागर इस्टेट, सी जय रेसिडेंसी येथील शहा हाऊस ही मालमत्ता असून तिचे मालक ‘प्राईम रियालिटी’ हे आहेत. या मालमत्तेचे क्षेत्रफळ हे 12,422.02 चौरस मीटर आहे. या मालमत्तेचे अंदाजे मूल्य 250 कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे. मात्र पालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागतील अधिकाऱ्यांनी मालकाशी संगनमत करून या मालमत्तेचे क्षेत्रफळ फक्त 1,912.08 चौरस मीटर इतके दाखवून त्याचे अंदाजे मूल्य 23 कोटी 48 लाख 20 हजार 870 रुपये दाखवले असून त्यांना फक्त 14 लाख 88 हजार 764 रुपये इतकाच मालमत्ता कर आकारल्याचे देयक देण्यात आले आहे.

त्यामुळे मुळात 250 कोटी रुपयांच्या मालमत्तेला काही कोटींचा मालमत्ता कर आकारणे अपेक्षित असताना फक्त काही लाख रुपये मालमत्ता कर आकारणी केल्याने अधिकाऱ्यांचे खिसे गरम झाले असून कोट्यधीश मालकाचे कोट्यवधी रुपयांची बचत झाली आहे. मात्र पालिकेचे काही कोटींचे आर्थिक नुकसान झाले आहे. अशा प्रकारे एका जी/ दक्षिण विभागात मालमत्ता कर वसुलीत तब्बल 100 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून संपूर्ण मुंबईत अशा प्रकारे मालमत्ता कर वसुलीमध्ये किमान 700 ते 800 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. त्यामुळे पालिकेचे मालमत्ता कर वसुलीत कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान होत असल्याचा गंभीर आरोप रवी राजा यांनी केला आहे. (congress in bmc demands probe into ‘malpractices’ in property tax collection)

 

संबंधित बातम्या:

Holi 2021 | मुंबईत होळी साजरी करण्यावर बंदी, पालिकेकडून नियमावली जारी

सिंधुदुर्ग ZP अध्यक्षपदासाठी राणेंकडून याचना, शपथा, आमिषं आणि धमक्या, वैभव नाईकांचा आरोप

LIVE: | नाशिकच्या ऐतिहासिक रामकुंड भागात असलेल्या गांधी तलावातील चार बोटी अज्ञातांनी जाळल्या

(congress in bmc demands probe into ‘malpractices’ in property tax collection)