लोखंडवाला तलावाचं नैसर्गिक सौंदर्य अबाधित ठेवा; पाहणीनंतर महापौरांचे आदेश

| Updated on: May 28, 2021 | 4:27 PM

महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी आज अंधेरी पश्चिमेकडील लोखंडवाला तलावाची पाहणी केली.

लोखंडवाला तलावाचं नैसर्गिक सौंदर्य अबाधित ठेवा; पाहणीनंतर महापौरांचे आदेश
Mayor Kishori Pednekar
Follow us on

मुंबई : महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी आज अंधेरी पश्चिमेकडील लोखंडवाला तलावाची पाहणी केली. या तलावातील गाळ काढून तलावाचे नैसर्गिकरित्या जतन करावे, त्याचे नैसर्गिक सौंदर्य अबाधित ठेवावे, असे निर्देश त्यांनी यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. (Conserve Lokhandwala Lake, Orders of Mayor Kishori Pednekar)

यावेळी बाजार आणि उद्यान समिती अध्यक्षा श्रीमती प्रतिमा खोपडे, माजी नगरसेवक श्री. शैलेश फणसे, के/पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री.विश्वास मोटे तसेच संबंधित महापालिका अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

महापौर किशोरी पेडणेकर महापालिका अधिकाऱ्यांशी संवाद साधताना म्हणाल्या की, नैसर्गिकरित्या हा तलाव तयार झाला असून हा तलाव जसा आहे त्याचपद्धतीने त्याचे संवर्धन झाले पाहिजे, अशी येथील पर्यावरणप्रेमी नागरिकांची मागणी असून त्याप्रमाणेच बृहन्मुंबई महानगरपालिकेने आवश्यक त्या भागातील गाळ काढून या तलावाचे संवर्धन करावे, असे निर्देश महापौरांनी यावेळी दिले.

या ठिकाणी विदेशातून शंभरपेक्षा अधिक स्थलांतरित पक्षी येत असून त्यांचा अधिवास सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात यावे, असे निर्देशही महापौरांनी यावेळी दिले.

संबंधित विभागांची संयुक्त बैठक

तलावाच्या या सर्व कामांना ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी, पश्चिम उपनगरे, खारफुटी संवर्धन सेल यांची संयुक्त बैठक महापौर दालनात घेण्याचे निर्देश महापौरांनी यावेळी दिले. पाण्यातील जलचर तसेच निसर्ग सौंदर्य अबधित ठेवण्यासाठी स्वतंत्र बजेट हेड मधून ही सर्व काम करण्याचे निर्देश महापौरांनी यावेळी दिले.

कामात पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांचा सहभाग

या संपूर्ण कामांमध्ये स्थानिक पर्यावरण प्रेमी नागरिकांना सहभागी करुन घ्या आणि त्यांच्या सूचनांप्रमाणे येथील कामाला गती देण्याचे निर्देशही महापौरांनी यावेळी दिले.

इतर बातम्या

BMC Election 2021 | मुंबई महापालिका निवडणूक पुढे ढकलणार? निवडणूक आयोगासोबत बैठक

मुंबई महापालिकेची लस मिळवण्यासाठी धडपड, थेट जगातील 6 शहरांच्या महापौरांना पत्र

(Conserve Lokhandwala Lake, Orders of Mayor Kishori Pednekar)