Corona | सिंगापूरमध्ये अडकलेले 50 भारतीय विद्यार्थी मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांनी मायदेशी

| Updated on: Mar 20, 2020 | 9:32 AM

भारतात येण्यासाठी निघालेल्या या विद्यार्थ्यांना सिंगापूर विमानतळावर रोखण्यात आले.

Corona | सिंगापूरमध्ये अडकलेले 50 भारतीय विद्यार्थी मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांनी मायदेशी
Follow us on

मुंबई : कोरोनाचा भारतात वाढता संसर्ग पाहता (Corona Effect Philippines Indian Student) केंद्र सरकारने परदेशातील प्रवाशांवरही निर्बंध घातले आहेत. त्याचा फटका फिलिपीन्समध्ये शिकणाऱ्या 50 भारतीय विद्यार्थ्यांना बसला आहे. भारतात येण्यासाठी निघालेल्या (Corona Effect Philippines Indian Student) या विद्यार्थ्यांना सिंगापूर विमानतळावर रोखण्यात आले. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठपुराव्यानंतर अखेर ते 50 विद्यार्थी भारतात परतले आहेत.

सध्या त्यापैकी मुंबईच्या बाहेरील विद्यार्थ्यांना सेव्हन हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, तर मुंबईतील विद्यार्थ्यांना पुढील 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

हेही वाचा : संपूर्ण वेतन मतदारसंघाला, ‘कोरोना’बचावासाठी महाराष्ट्रातील सर्वात तरुण आमदाराचा प्लॅन

नेमकं प्रकरण काय?

या विद्यार्थ्यांनी फिलिपीन्सवरुन भारताच्या दिशेने प्रवास सुरु केला. मात्र, सिंगापूर विमानतळावर आल्यावर त्यांना भारताच्या दिशेने जाणाऱ्या विमानात प्रवेश बंदी करण्यात आली. त्यामुळे हे विद्यार्थी सिंगापूर विमानतळावर अडकले होते. सिंगापूरहून एअर इंडियाच्या विमानाने (Corona Effect Philippines Indian Student) ते भारतात दाखल होणार होते. मात्र, सिंगापूर सरकारच्या आदेशानुसार, या विद्यार्थ्यांना सिंगापूरहून भारतात पाठविता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आलं.

सिंगापूरमध्ये अडकलेल्या 50 विद्यार्थ्यांना मुंबईत सुखरुप आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः सिंगापूर मधील भारतीय वाणिज्य दूतावासाशी संपर्कात होते. हे 50 विध्यार्थी मायदेशी परतले.

या 50 विद्यार्थ्यांपैकी जे मुंबईत राहातात, त्यांना त्यांच्या घरी क्वारंटाईन करण्यात आलं आहे. पुढील 14 दिवसांसाठी या विद्यार्थ्यांनी कुणाच्या संपर्कात येऊ नये असे सांगण्यात आलं आहे. तर इतर विद्यार्थी जे सुरत, कोल्हापूर आणि मुंबईच्या बाहेर राहाणारे आहेत, त्यांना सेव्हन हिल रुग्णालयात ठेवण्यात आलं आहे. सध्या त्यांना एका दिवसासाठी क्वारंटाईन करण्यात आलं आहे. त्यांचा आरोग्य अहवाल येईपर्यंत त्यांना इथेच ठेवलं जाईल.

कोरोनाचा हाहा:कार, देशात चौथा बळी

देशातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा 4 वर पोहोचला आहे. पंजाबमध्ये गुरुवारी एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला. यापूर्वी कर्नाटक, दिल्ली आणि महाराष्ट्रात प्रत्येकी एक रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.

भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 167 वर पोहोचली आहे. तर महाराष्ट्रात सध्या कोरोनाबाधितांची संख्या 49 वर येऊन पोहोचली आहे.

देशात कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

  • आंध्रप्रदेश – 1
  • दिल्ली – 12
  • हरियाणा – 17
  • कर्नाटक – 14
  • केरळ – 27
  • महाराष्ट्र – 49
  • ओडिशा -1
  • पुद्दुचेरी – 1
  • पंजाब – 2
  • राजस्थान 7
  • तामिळनाडू – 2
  • तेलंगाणा – 6
  • चंदीगढमधील केंद्रशासित प्रदेश – 1
  • जम्मू -काश्मीरमधील केंद्रशासित प्रदेश – 4
  • लडाख – 8
  • उत्तरप्रदेश -17
  • उत्तराखंड – 1
  • पश्चिम बंगाल – 1

कोरोनामुळे आतापर्यंत कुठे किती मृत्यू?

  • कर्नाटक – 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 11 मार्च
  • दिल्ली – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू (1) – 13 मार्च
  • मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 17 मार्च
  • पंजाब – एका रुग्णाचा मृत्यू (1) – 19 मार्च
  • एकूण – 4 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

Corona Effect Philippines Indian Student

संबंधित बातम्या :

‘कोरोना’च्या जनजागृतीसाठी बॉलिवूड गाण्याचे मॅशअॅप, रोहित पवारांकडून व्हिडीओ शेअर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील दहा महत्त्वाचे मुद्दे

PM MODI : 22 मार्चला ‘जनता कर्फ्यू’, सकाळी 7 ते रात्री 9 कोणीही घराबाहेर पडू नका : पंतप्रधान मोदी

Corona virus | आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द, मुले आणि वृद्धांना घरी राहण्याचा सल्ला, मोदी सरकारचे मोठे निर्णय