PM MODI : 22 मार्चला ‘जनता कर्फ्यू’, सकाळी 7 ते रात्री 9 कोणीही घराबाहेर पडू नका : पंतप्रधान मोदी

कोणीही घराबाहेर पडू नका, अत्यंत आवश्यक असेल, पर्याय नसेल तरच त्या दिवशी घराबाहेर पडा," असेही पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi Live) म्हणाले.

PM MODI : 22 मार्चला 'जनता कर्फ्यू', सकाळी 7 ते रात्री 9 कोणीही घराबाहेर पडू नका : पंतप्रधान मोदी
Follow us
| Updated on: Mar 19, 2020 | 8:51 PM

नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi Live) हे देशातील जनतेला 8 वाजता संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 22 मार्चला जनता कर्फ्यू पाळा असे आवाहन केले. यावेळी “सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत कोणीही घराबाहेर पडू नका, अत्यंत आवश्यक असेल, पर्याय नसेल तरच त्या दिवशी घराबाहेर पडा,” असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

“जनता कर्फ्यू म्हणजे जनतेसाठी, जनतेद्वारे (PM Narendra Modi Live) लावण्यात आलेला कर्फ्यू, येत्या रविवारी म्हणजे 22 मार्चला जनता कर्फ्यू करा. 22 मार्चच्या जनता कर्फ्यूबाबत जनजागृती करा, शक्य तितक्या लोकांना माहिती द्या,” असेही नरेंद्र मोदी म्हणाले.

“जे आपत्कालीन सेवेत काम करतात त्या सर्वांचे संध्याकाळी 5 वाजता धन्यवाद माना. संध्याकाळी 5 वाजता आपल्या घराच्या दरवाज्यात, खिडकीत, बाल्कनी 5 मिनिटे उभे राहून त्यांचे आभार व्यक्त करा,” असेही मोदी म्हणाले.

“या संकटाच्या वेळी माझे देशातील व्यापाऱ्यांना, उच्च वर्गातील व्यक्तींना आवाहन आहे की, तुम्ही ज्या ज्या व्यक्तींकडून सेवा घेता त्यांचे आर्थिक हित लक्षात घेता त्यांचा पगार कापू नका,” असेही नरेंद्र मोदी म्हणाले.

“दूध, खाण्या-पिण्याचे सामान, औषध किंवा जीवनावश्यक गोष्टी तूट भासू नये यासाठी आवश्यक पावलं उचलली जात आहेत. त्यामुळे त्यांचा साठा करु नका,” असेही मोदी म्हणाले.

“संपूर्ण जग मोठ्या संकटातून जात आहे. याअगोदर जेव्हा कधी कोणतं नैसर्गिक संकट आलं तेव्हा ते फक्त काही देशांपुरता मर्यादित होतं. मात्र, यावेळी संपूर्ण जगात मानव जातीवर संकट ओढावलं आहे. पहिलं आणि दुसरं महायुद्ध झालं होतं तेव्हाही एवढे देश प्रभावित झाले नव्हते जेवढे आज कोरोनामुळे झाले आहेत,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

“गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाच्या विविध बातम्या आम्ही बघत आणि एकत होतो. या दोन महिन्यात भारताच्या 130 कोटी नागरिकांनी कोरोना सारख्या महामारीचा खंबीरपणे लढा दिला आहे. सर्वांनी सावधगारी बाळगण्याचा पुरेपूर प्रयत्नही केला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून असं वातावरण निर्माण झालं आहे की, आपण संकंटपासून वाचलेलो आहोत. असं वाटतं सगळं ठिक आहे. मात्र, ते खरं नाही. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने सतर्क राहणं जरुरीचं आहे.” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

“देशवासियांकडून मी जेव्हा कधी काहीही मागितलं तेव्हा मला त्यांनी नाराज केलं नाही. ही आपल्या आशीर्वादची ताकद आहे. आपण सगळे मिळून आपल्या निर्धारित लक्षाच्या पाठीमागे चालत आहेत. प्रयत्न यशस्वीही होतो,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

“मी आज 130 करोडो नागरिकांकडून काही मागायला आलो आहे. मला आपले पुढचे काही आठवडे हवे आहेत. आपला येणारा वेळ हवा आहे. आतापर्यंत विज्ञान कोरोनावर कोणतंही योग्य उपाय शोधू शकलेलं नाही. यावर कोणकतीही लस तयार झालेलं नाही. अशा परिस्थितीत चिंता वाढणे स्वाभाविक आहे,”असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

“जगभरात कोरोनाचा प्रभाव जास्त दिसत आहे. तिथे अजून एक गोष्ट समोर आलं आहे. या देशांमध्ये सुरुवातीला कमी लोक प्रभावित झाले होते. त्यानंतर अचानक आजाराचा विस्फोट झाल्याचं समोर आलं. या देशांमध्ये कोरोनाने संक्रमित लोकांची संख्या खूप वेगाने वाढली,”असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

“भारत सरकार कोरोनाच्या पादुर्भावावर पूर्णपणे लक्ष ठेवून आहे. मात्र, काही देश असेही आहेत ज्यांनी आवश्यक निर्णयही घेतले आणि कोरोनावर नियंत्रण मिळवलं,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

LIVE UPDATE : 

[svt-event title=”संयम ठेवा, घराबाहेर पडू नका : पंतप्रधान मोदी ” date=”19/03/2020,8:12PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मी देशवासीयांनी कधीही निराश केले नाही – पंतप्रधान मोदी ” date=”19/03/2020,8:11PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”आपण संकटात सापडलो आहोत – पंतप्रधान मोदी ” date=”19/03/2020,8:10PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”प्रत्येक भारतीयाने जागरूक असणे महत्त्वाचे – पंतप्रधान ” date=”19/03/2020,8:08PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event date=”19/03/2020,8:06PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”गभर संकटात आणले आहे: पंतप्रधान” date=”19/03/2020,8:06PM” class=”svt-cd-green” ] सामान्यत: जेव्हा जेव्हा नैसर्गिक संकट येते तेव्हा ते काही देश किंवा राज्यांपुरते मर्यादित असते. पण यावेळी हे संकट असे आहे, ज्याने संपूर्ण मानवजातीला जगभर संकटात आणले आहे: पंतप्रधान [/svt-event]

[svt-event title=”भारताचे 130 कोटी नागरिक कोरोनाचा सामना करत आहे. ” date=”19/03/2020,8:05PM” class=”svt-cd-green” ] गेल्या काही महिन्यांपासून भारताचे 130 कोटी नागरिक कोरोनाचा सामना करत आहे. आपण यापासून काही दिवसांपासून सावध होतो. [/svt-event]

[svt-event title=”हे संकट जगभर पसरलं – पंतप्रधान मोदी ” date=”19/03/2020,8:09PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने मोठी पावलं उचलली आहेत. “येत्या 22 मार्चपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे एक आठवड्यासाठी रद्द केली आहेत. तर 10 वर्षावरील मुलं आणि 65 वर्षांवरील वृद्धांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला सरकारने दिला आहे.भारतात कोरोनाचा शिरकाव परदेशातूनच झाला आहे, त्यामुळे मोदी सरकारने उड्डाणं रद्द करण्याचा निर्णय घेतला.

केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाण रद्द केली आहेत. येत्या 22 मार्चपासून एका आठवड्यासाठी सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाण रद्द करण्यात येणार आहेत. या काळात भारतात एकही विमान लँड होणार (PM Narendra Modi Live) नाही.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.