कोरोना वाढत असला तरी काळजी करण्याचे कारण नाही; पावसाळ्यात नागरिकांनी काळजी घ्यावी; राजेश टोपे

| Updated on: Jun 01, 2022 | 3:45 PM

रुग्णसंख्या वाढत असली तर त्याची चिंता करण्याचं कारण नाही असेही त्यांनी सांगितले. कोरोनाची माहिती देताना राजेश टोपे यांनी मंकीपॉक्सबद्दलही हा रोग आला असला तरी मुंबई, पुणे आणि ठाणे परिरसरातील नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही असंही त्यांनी सांगितले.

कोरोना वाढत असला तरी काळजी करण्याचे कारण नाही; पावसाळ्यात नागरिकांनी काळजी घ्यावी; राजेश टोपे
आरोग्यमंत्री राजेश टोपे
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबईः मुंबई आणि आसपासच्या उपनगरात कोरोनाची संख्या वाढत असताना दिसत जरी असली तरी चिंता करण्याचे कारण नाही असा दावा आज आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केला. पावसाळ्यात डायरियासारखे (Diarrhea) आजार होण्याची भीती जास्त असते म्हणून ग्रामीण तसेच झोपडपट्टी (Rural and slums) भागातल्या लोकांनी पाणी उकळून पिण्याच्या सूचना आरोग्य मंत्र्यांनी यावेळी केल्या. पावसाळयात ज्या ठिकाणी दुषित पाणी येते त्या भागातील नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. पावसाळ्यात अनेक ठिकाणी दूषित पाण्यामुळे साथीचे रोग आणि इतर आजाराचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते त्यामुळे नागरिकांनी खबरदारी म्हणून पाणी उखळून पिणे गरजेचे आहे असेही मत त्यांनी यावेळी मांडले.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले की, आज जी कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे ती मुंबई, पुणे, ठाणे यासारख्या एक दोन जिल्ह्यातच दिसून येत आहे.

शासनस्तरावर आम्ही काळजी घेत आहोत

या परिसरात रुग्णसंख्या वाढत असली तर त्याची चिंता करण्याचं कारण नाही असेही त्यांनी सांगितले. कोरोनाची माहिती देताना राजेश टोपे यांनी मंकीपॉक्सबद्दलही हा रोग आला असला तरी मुंबई, पुणे आणि ठाणे परिरसरातील नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही असंही त्यांनी सांगितले. हा रोग आपल्याकडे आला नसून आणि तो येऊ नये यासाठी शासनस्तरावर आम्ही काळजी घेत आहोत असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

विमानतळावरच येणाऱ्या प्रवाशांची तपासणी

मंकीपॉक्सबद्दल सांगताना त्यांनी खबरदारी म्हणून विमानतळावरच आम्ही येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करुनच त्यांना प्रवश देत आहोत अशी माहितीही त्यांनी दिली.

परिचारिकांच्या मागण्यांचा विचार करणार

सध्या परिचारिका संपावर आहेत त्याबाबत आपण आयुक्त आणि उपायुक्त यांच्याबरोबर मी लगेचच बोलणार आहे. त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचा संप सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी अश्वासन दिले. यावेळी त्यांनी त्यांच्या रास्त मागण्यांचा आम्ही विचार करणार असून मागण्या मान्य करु असे अश्वासनही त्यांनी यावेळी दिले. पावसाळा तोंडावर आहे आणि अश्या वेळेला रुग्णसंख्येत वाढ होते त्यामुळे परिचारिका रुग्णालयात असणे फार महत्वाचे आहे.