AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईची धाकधूक वाढली, सातहून अतिगंभीर वार्डमध्ये प्रत्येकी 110 पेक्षा अधिक रुग्ण

मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा दोन हजाराच्या पार गेल्याने धाकधूक वाढली आहे (Corona Patients in Mumbai Wards). ‘जी दक्षिण’ वॉर्डमध्ये ‘कोरोना’बाधित रुग्णांची संख्या 389 वर पोहोचली आहे.

मुंबईची धाकधूक वाढली, सातहून अतिगंभीर वार्डमध्ये प्रत्येकी 110 पेक्षा अधिक रुग्ण
| Edited By: | Updated on: Apr 18, 2020 | 5:14 PM
Share

मुंबई : एकट्या मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा दोन हजाराच्या पार गेल्याने धाकधूक वाढली आहे (Corona Patients in Mumbai Wards). ‘जी दक्षिण’ वॉर्डमध्ये ‘कोरोना’बाधित रुग्णांची संख्या 389 वर पोहोचली आहे. मुंबईतील सात वॉर्डमध्ये आतापर्यंत प्रत्येकी 110 पेक्षाही जास्त ‘कोरोना’ग्रस्त आढळले आहेत. दरम्यान, 16 एप्रिलपर्यंत जी दक्षिण वार्डमधील रुग्ण संख्या 388 होती. ही संख्या 17 एप्रिलला 389 वर पोहोचली. (Corona Patients in Mumbai Wards)

जी दक्षिण, ई, जी उत्तर, डी, के पश्चिम, एल, एच पूर्व या प्रत्येक वॉर्डमध्ये किमान 110 कोरोनाबाधित आहेत. मुंबईतील ई वार्डचा आकडा कालपर्यंत 172 होता. मात्र, आज हा आकडा 194 वर पोहोचला आहे. तर जी उत्तर या वार्डमध्ये कालपर्यंत 123 रुग्ण होते. हा अकडा 142 वर पोहोचला आहे.

मुंबईत ‘कोरोना’ग्रस्त रुग्ण सापडलेल्या प्रभागाप्रमाणे 17 एप्रिलपर्यंतच्या आकडेवारीनुसार मुंबई महापालिकेने नकाशा जारी केला आहे. 2085 कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी सर्वाधिक ‘जी दक्षिण’मध्ये आहेत. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने इथली आकडेवारी सर्वाधिक राहिली आहे.

सात अतिगंभीर वॉर्ड :

जी दक्षिण – वरळी, प्रभादेवी, लोअर परळचा परिसर – 389 रुग्ण

ई – भायखळा , भायखळा फायर ब्रिगेडच्या आसपासचा भाग – 194 रुग्ण

जी उत्तर – दादर, माहिम, धारावी -142 रुग्ण

डी – नाना चौक ते मलबार हिल परिसर – 141 रुग्ण

के पूर्व – अंधेरी पश्चिमचा भाग–123 रुग्ण

एल –  कुर्ला परिसराचा समावेश- 115 रुग्ण

एच पूर्व – वांद्रे पूर्वचा भाग, वाकोला परिसर , कलानगर ते सांताक्रुझ – 113 रुग्ण

कोरोना रुग्णांची अद्ययावत आकडेवारी:

Edit
जिल्हा रुग्ण बरे मृत्यू
मुंबई 2085 30 122
पुणे (शहर+ग्रामीण) 467 19 46
पिंपरी चिंचवड 37 1
ठाणे (शहर+ग्रामीण) 125 3
नवी मुंबई 63 8 3
कल्याण डोंबिवली 68 2
उल्हासनगर 1
भिवंडी 1
मीरा भाईंदर 53 2
वसई विरार 61 1 3
पालघर 14 1
रायगड 8
पनवेल 28 1 1
नाशिक (शहर +ग्रामीण) 8
मालेगाव 45 2
अहमदनगर (शहर+ग्रामीण) 28 3 1
धुळे 1 1
जळगाव 2 1
सोलापूर 12 1
सातारा 7 2
कोल्हापूर 5 1
सांगली 26 4
सिंधुदुर्ग 1
रत्नागिरी 6 1
औरंगाबाद 28 5 2
जालना 2
हिंगोली 1
परभणी 1
लातूर 8
उस्मानाबाद 3 1
बीड 1
अकोला 14 1
अमरावती 5 1
यवतमाळ 13 3
बुलडाणा 21 1 1
वाशिम 1
नागपूर 57 5 1
गोंदिया 1
चंद्रपूर 2 1
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु) 11 2
एकूण 3320 331 201

संबंधित बातम्या :

लॉकडाऊन राहणारच, मात्र टप्प्याटप्प्याटप्याने अर्थव्यवस्थेला गती देणार : अजित पवार

भारतीय नौदलातही कोरोनाचा शिरकाव, मुंबईतील 20 सैनिकांना संसर्ग

पुण्यात 580 जणांना कोरोना संसर्ग, 47 जणांचा मृत्यू, हॉटस्पॉट ठरलेल्या भवानी पेठेसह कोठे किती रुग्ण?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.