AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईतून पालघर ठाण्यात पसरतोय कोरोना! धास्तावणारी आकडेवारी चिंताजनक आहे, काळजी घ्या!

यासंदर्भात बोलताना आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, राज्यातील वाढती कोरोना रूग्णांची संख्या बघता आपण चाचण्या वाढवल्या आहेत. मुंबईतील साप्ताहिक सकारात्मकता दर राज्याच्या सरासरीपेक्षा जवळपास दुप्पट आहे. आम्ही जिल्हा प्रशासनाला काटेकोरपणे चाचणी वाढविण्यास सांगितले आहे. राज्यात दररोज सुमारे 25,000 चाचण्या होत आहेत.

मुंबईतून पालघर ठाण्यात पसरतोय कोरोना! धास्तावणारी आकडेवारी चिंताजनक आहे, काळजी घ्या!
कोरोनाImage Credit source: pixabay.com
| Updated on: Jun 07, 2022 | 10:35 AM
Share

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये सातत्याने कोरोनाच्या (Corona) रूग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. त्यामध्येही पालघर आणि ठाण्यामध्ये तर कहरच झालाय. तेथील  कोरोनाच्या रूग्ण संख्येत सतत वाढ आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून रूग्ण संख्या 136 टक्कांपेक्षा जास्त झालीये. सोमवारी राज्यामध्ये 1,036 लोकांना कोरोनाची लागण झाली असून यामध्ये मुंबईतील (Mumbai) 676 रूग्ण आहेत. यामध्ये एक सकारात्मक गोष्ट म्हणजे एकाही कोरोना रूग्णाचा मृत्यू झाला नाहीये. आता सध्याच्या परिस्थितीत राज्यामध्ये एकूण सक्रिय रूग्ण हे 7,429 आहेत. यामुळे ही अत्यंत धोक्याची घंटा आहे. राज्यामध्ये गेल्या आठवड्यापासून सतत रूग्णसंख्येमध्ये (Patient) वाढ होते. राज्यात कोरोनाचे निर्बंध हटवल्यापासून कोरोनाच्या रूग्णांमध्ये मोठी वाढ होताना दिसते आहे.

यासंदर्भात बोलताना आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की…

यासंदर्भात बोलताना आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, राज्यातील वाढती कोरोना रूग्णांची संख्या बघता आपण चाचण्या वाढवल्या आहेत. मुंबईतील साप्ताहिक सकारात्मकता दर राज्याच्या सरासरीपेक्षा जवळपास दुप्पट आहे. आम्ही जिल्हा प्रशासनाला काटेकोरपणे चाचणी वाढविण्यास सांगितले आहे. राज्यात दररोज सुमारे 25,000 चाचण्या होत आहेत, असेही बोलताना टोपे म्हणाले. मुंबईमधील विविध कोरोना हाॅस्पीटलमध्ये 54 रुग्णांना दाखल करण्यात आले. त्यामुळेच सध्याची हाॅस्पीटलमध्ये दाखल रुग्णांची संख्या 219 वर गेलीये. संपूर्ण राज्यात तीन रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तसेच जवळपास 96 टक्के रूग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत.

निर्बंध लादण्याची अजिबात इच्छा नाहीये…

राज्यातील कोरोनाची वाढती रूग्ण संख्या बघता निर्बंध लावण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, याबद्दल स्वत: आरोग्य मंत्री टोपे म्हणाले की, सध्याच कोणते निर्बंध लावण्याचा राज्य सरकारचा विचार नाहीये. आम्हाला जनतेवर निर्बंध लादण्याची अजिबात इच्छा नाही. यामुळेच नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन केले पाहिजे. तसेच सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क लावायला हवे. इतकेच नाहीतर गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. तसेच कोणतेही मोठे कार्यक्रम घेताना खबरदारी घ्यायला हवी. म्हणजे सध्याच राज्यामध्ये कोरोना संदर्भातील कोणतेही निर्बंध लावण्यात येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Follow Us
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ