परवानगीनंतर मुंबईतील 4 रुग्णालयांमध्ये लसीकरणाला सुरुवात होणार

| Updated on: Jan 03, 2021 | 2:10 PM

डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय, सफाई कर्मचारी, पोलिस यांना पहिल्या टप्प्यात ही लस दिली जाणार आहे. त्यानंतर ज्यांना कोमॉर्बिड कंडिशन आहे त्यांना ही लस दिली जाणार असल्याची माहिती डॉक्टर संजय ओक यांनी दिली आहे.

परवानगीनंतर मुंबईतील 4 रुग्णालयांमध्ये लसीकरणाला सुरुवात होणार
Follow us on

मुंबई: केंद्र सरकारनं 3 कोरोना लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. आता राज्य सरकारकडून मुंबई महापालिकेला परवानगी मिळताच मुंबईतील 4 प्रमुख रुग्णालयांमध्ये लसीकरणाला सुरुवात होणार आहे. तशी माहिती कोविड टास्क फोर्सचे (Covid Task force) प्रमुख डॉक्टर संजय ओक (Sanjay Oak) यांनी दिली आहे. DGCIचा निर्णय हा आत्मनिर्भर होण्याकडे महत्वाचं पाऊस असल्याचंही ओक म्हणाले. (Corona Vaccination will start in Mumbai after getting permission)

कोरोना लस ही टप्प्याटप्प्यानं दिली जाणार आहे. डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय, सफाई कर्मचारी, पोलिस यांना पहिल्या टप्प्यात ही लस दिली जाणार आहे. त्यानंतर ज्यांना कोमॉर्बिड कंडिशन आहे त्यांना ही लस दिली जाणार असल्याची माहिती डॉक्टर संजय ओक यांनी दिली आहे. 50 वर्षे वयाच्या पुढील लोकांना ही लस दिली जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

कोणतीही लस 100 टक्के सुरक्षित नसते. मात्र, जो अभ्यास झाला त्यात या लस सुरक्षित असल्याचं दिसतं. मनपा रुग्णालयांना मेडिकलचा प्रचंड अभ्यास आहे. या पूर्वीही लसीकरणाचे कार्यक्रम राबवण्यात आल्याची माहितीही ओक यांनी दिली आहे. ज्यांना कोरोना होऊन गेला. ज्यांना झाला नाही. त्या सगळ्यांना या लसीची गरज आहे. ही लस अॅन्टी बॉडिज निर्माण करते, इम्युनिटी वाढवते, असंही ओक यांनी सांगितलं.

डॉ. संजय ओक यांचं आवाहन

DGCI ने अप्रुव्हल दिलं आहे. आता राज्य सरकारने गाईडलाईन देणं गरजेचं आहे. मनपा रुग्णालयांमध्ये डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्यासाठी तयारी दाखवावी, असं आवाहन ओक यांनी केलं आहे. अनेक शस्त्रक्रिया खोळंबल्या आहेत. 100 टक्के सगळी रुग्णालयं पूर्ववत करणं सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. सर्व डॉक्टरांनी आणि रुग्णांनी विश्वासाने इलाजासाठी पुढे येणं गरजेचं असल्याचंही ओक म्हणाले.

कोरोनावरच्या तिसऱ्या लसीला मंजुरी

अहमदाबादच्या कॅडिला हेल्थकेअर लिमिटेडच्या कॅडीला लसीला (Cadila Vaccine) मंजुरी देण्यात आलीय. कोरोना साथीच्या विरोधातील लढ्यात देशाला तिसरं मोठं यश मिळालंय. सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO)च्या कोरोनावरच्या तज्ज्ञ समितीने भारत बायोटेकची ( Bharat Biotech) देशी कोविड लस कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन वापरास मान्यता देण्याची शिफारस केली होती, अखेर त्या लसीला मंजुरी देण्यात आलीय. वृत्तसंस्था पीटीआयने सूत्रांच्या हवाल्यानं ही माहिती दिली आहे. यापूर्वी सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) च्या तज्ज्ञ समितीने सीरम संस्थेच्या कोविशिल्डच्या (covishield) आपत्कालीन वापरास मान्यता देण्याची शिफारस केली होती.

संबंधित बातम्या:

कोरोनाची लस घेतल्यावर तब्येत बिघडली तर, जबाबदारी सरकार घेणार की कंपनी?

51 लाख लोकांना लस, 48 सरकारी, 100 खासगी रुग्णालयं सज्ज, केजरीवालांचा लसीकरणाचा मेगाप्लॅन

Corona Vaccination will start in Mumbai after getting permission