बाल्कनीतून उडी मारणार तोच… जीव देणाऱ्या तरूणासोबत काय घडलं? थरारक व्हिडिओ व्हायरल

Mumbai News : दहिसर पूर्व येथील जनकल्याण बिल्डिंगच्या ओपन एरियातून एक तरुण खाली उडी घेऊन आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होता. मात्र एका व्यक्तीने त्याला वाचवले आहे.

बाल्कनीतून उडी मारणार तोच... जीव देणाऱ्या तरूणासोबत काय घडलं? थरारक व्हिडिओ व्हायरल
dahisar youth try to end life
Image Credit source: Google
| Updated on: Jul 01, 2026 | 4:29 PM

मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. दहिसर पूर्व येथील जनकल्याण बिल्डिंगच्या ओपन एरियातून एक तरुण खाली उडी घेऊन आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होता. मात्र एका व्यक्तीने प्रसंगावधान साधत या तरूणाचा जीव वाचवला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. लोक जीव वाचवणाऱ्या व्यक्तीचे कौतुक करत आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

तरूण बाल्कनीतून उडी मारणार तोच…

मुंबईतील दहिसर येथे एक तरुण इमारतीच्या बाल्कनीतून उडी घेण्याचा प्रयत्न करत होता. याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की, तो बाल्कनीच्या बाहेरील कडेवर उडी मारण्याच्या तयारीत उभा आहे. खाली उभे असलेले लोक फक्त व्हिडिओ काढत होते. तेवढ्यात एका व्यक्तीने धाव घेऊन त्या तरुणाला वाचवले. त्यावेळी इमारतीतील इतर लोक व्हिडिओ काढण्यात व्यस्त होते.

थोडक्यात वाचला जीव

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण बराच वेळ इमारतीच्या कडेला बसून होता. हे पाहून तिथे उपस्थित लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. प्रसंगावधान राखत एका व्यक्तीने त्याच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर तो बाल्कनीत गेला आणि त्याने त्या तरूणाशी चर्चा केली. मात्र तरीही तो तरूण जीव देण्याच्या प्रयत्नात होता. मात्र दुसऱ्या व्यक्तीने त्याचा हात पकडला आणि त्याला बाल्कनीच्या आतमध्ये ओढले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पोलिसांकडून चौकशीला सुरुवात

दहिसरमधील या तरुणाने हे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण समजू शकलेले नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून आवश्यक ती कारवाई केली जात आहे. सध्याच्या काळात वेगवेगळ्या कारणांमुळे तरुण चिंतेत आहेत. अनेकजण नोकरी, बेरोजगारी, पर्सनल आयुष्य, आर्थिक अडचणी किंवा इतर कारणांमुळे संकटात आहेत. अशा कारणांमुळे अनेकजण जीव देण्याचा टोकाचा निर्णय घेत असल्याचेही समोर आलेले आहे. आता दहिसरमधील या तरूणाने हा टोकाचा निर्णय का घेतला हे चौकशीनंतर समोर येणार आहे.

Follow Us