दिल्ली-मुंबई विमानप्रवास महागला, तिकीट दर गगनाला!

| Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM

नवी दिल्ली :  दिल्ली – मुंबई विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला मोठा चाट बसला आहे. कारण दिल्ली मुंबई प्रवास भाडे तब्बल 86 टक्क्यांनी वाढले आहे.  एरव्ही ७-८ हजाराचे तिकीट आता तब्बल 40 हजाराच्या घरात गेलं आहे. दिल्ली विमानतळावरील तीनपैकी एक धावपट्टी बंद असल्याने ही तिकीटवाढ झाली आहे. दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडने (डायल) तीनपैकी एक रन वे दुरुस्तीच्या कारणास्तव 15 नोव्हेंबरपासून 13 दिवसांसाठी […]

दिल्ली-मुंबई विमानप्रवास महागला, तिकीट दर गगनाला!
Follow us on

नवी दिल्ली :  दिल्ली – मुंबई विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला मोठा चाट बसला आहे. कारण दिल्ली मुंबई प्रवास भाडे तब्बल 86 टक्क्यांनी वाढले आहे.  एरव्ही ७-८ हजाराचे तिकीट आता तब्बल 40 हजाराच्या घरात गेलं आहे. दिल्ली विमानतळावरील तीनपैकी एक धावपट्टी बंद असल्याने ही तिकीटवाढ झाली आहे.

दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडने (डायल) तीनपैकी एक रन वे दुरुस्तीच्या कारणास्तव 15 नोव्हेंबरपासून 13 दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचं याच महिन्यात जाहीर केलं होतं. या एका रनवेवरुन दिवसाला 50 उड्डाणं व्हायची, जी आता दुरुस्तीच्या कारणास्तव होऊ शकणार नाहीत.

एअरलाईन कंपन्यांना याची माहिती देण्यात आली असून त्यांना विमान उड्डाणाच्या वेळापत्रकात बदल करण्याचे सांगितले होते. शुक्रवारी संध्याकाळपासून अनेक वेबसाईट्सवर तात्काळ  विमान तिकीट विक्री होत असलेल्या तिकिटांच्या भाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ बघायला मिळत आहे.

आईजिगो (आईएक्सआईजीओ) च्या आकड्यांनुसार दिल्ली ते बंगळुरुदरम्यानचे सामान्य तिकीट  11,044  रुपयांचं असतं , जे आज   13,702 रुपये आहे. तर मुंबई ते दिल्ली जाण्यासाठी सामान्यपणे  9,228 रुपये खर्च करावे लागायचे, पण शनिवारी मुंबई ते दिल्ली हे तिकीट 11,060 रुपयांवर पोहोचलं आहे.

आईजिगोचे मुख्य कार्यकारी आणि सह-संस्थापक अलोक वाजपेयी यांनी सांगितले की, रनवे  09-27 बंद असल्याने पुढील एक आठवड्यासाठी तिकिटांच्या भाड्यात वाढ होऊ शकते. येत्या आठवड्यात तिकिटांची जास्त मागणी होत असल्याने विमान प्रवास भाड्यात इतकी वाढ झाली.

दिल्ली ते मुंबई, बंगळुरु, हैदराबाद, कोलकाता, चेन्नई इत्यादी ठिकाणी जाण्यासाठी आता प्रवाशांना अव्वाच्या सव्वा भाडं द्यावं लागू शकतं.  हे भाडं उकळणाऱ्या विमान कंपन्यांवर नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाने निर्बंध घालण्याची गरज आहे.