AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत 113 टक्के नालेसफाई नव्हे, ही तर हातसफाई, देवेंद्र फडणवीसांचा हल्ला

देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत (Devendra Fadnavis criticize BMC for water logging).

मुंबईत 113 टक्के नालेसफाई नव्हे, ही तर हातसफाई, देवेंद्र फडणवीसांचा हल्ला
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Aug 06, 2020 | 5:49 PM
Share

मुंबई : मुसळधार पावसाने मुंबईची अगदी तुंबई केली. याच परिस्थितीवर बोट ठेवत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत (Devendra Fadnavis criticize BMC for water logging). “बीएमसी कायमच नालेसफाई झाल्याचा दावा करते. यावेळी तर पालिका प्रशासनाने 113 टक्के नालेसफाई झाल्याचा दावा केला होता. मात्र ही हात सफाई आहे,” असा टोला फडणवीस यांनी लगावला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “नालेसफाई पूर्ण झाली म्हणून सांगितलं जातं, पण ती पूर्ण झालेली नाहीत. यात हातसफाई झाली का? अशी शंका उपस्थित होते. दक्षिण मुंबईतही या वेळेला पाणी साठले आहे. आमच्या नेत्यांनीही महापालिकेला सांगितलं होतं की नालेसफाई पूर्णपणे झालेली नाही. ब्रिमस्टोवॅड प्रकल्प आणि पंम्पिंग स्टेशनचे प्रकल्प धीम्या गतीने चालू आहेत याला टॉप मोस्ट प्रायॉरिटी दिली नाही, तर मुंबईची परिस्थिती अशीच राहील. मी म्हणेन की 113 टक्के नालेसफाई ही फक्त सफाई आहे. ती कुठली सफाई हे तुमच्या लक्षात येते.”

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“नालेसफाईचं काम किती झालं? मध्यंतरीच्या काळात मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार यांच्यासह आमचे सर्व नेत्यांनी पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी प्रशासनाला सतर्क करत नालेसफाई झाली नसल्याचं सांगितलं होतं. पम्पिंग स्टेशनचे प्रकल्प अत्यंत धीम्या गतीने सुरु आहेत. याला आपलं पहिलं प्राधान्य बनवायला हवं. असं समजून जोपर्यंत बीएमसी काम करणार नाही तोपर्यंत मुंबईची परिस्थिती हीच राहिल,” असं फडणवीस म्हणाले.

“मुंबईत एनडीआरएफला लोकांना बाहेर काढावं लागलं ही गंभीर परिस्थिती”

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “दरवर्षी मुंबईमध्ये पाऊस पडल्यानंतर जी परिस्थिती निर्माण होते ती सुधारलेली कुठेही दिसत नाही. काल ज्याप्रकारे मुंबईमध्ये पाणी जमा झालं आणि एनडीआरएफला (NDRF) लोकांना बाहेर काढावं लागलं. ही अतिशय गंभीर परिस्थिती आहे. सातत्याने बीएमसीकडून आम्ही पम्पिंग स्टेशन बांधत असल्याचं सांगितलं जातं. हे होताना दिसत नाही. त्याला गती मिळत नाही.”

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

“आता आपण पाहिलं की भिंत पडल्यामुळे कुठल्या प्रकारची जीवितहानी झाली नाही. परंतु मागच्या वेळेला भिंत पडल्यामुळे जीवितहानी झाली होती. मुंबई महापालिकेने अशा धोकादायक ठिकाणांची यादी तयार केली होती. त्या यादीपैकी किती ठिकाणी काम झालं ते कोणालाही माहिती नाही. म्हणून मला वाटतं की याकडे अधिक गांभीर्याने पाहिले पाहिजे. पंम्पिंग स्टेशनची कामं वेळेत पूर्ण केली पाहिजे,” असं फडणवीसांनी सांगितलं.

“क्लायमेट चेंज हे सत्य, मुंबईतील स्थिती हा जगाला इशारा”

आदित्य ठाकरे म्हणाले, मुंबईत एकूणच जो वादळी पाऊस झाला असं मी कधीच पाहिलं नाही. मुंबईत मागील 48 तासात 500 मिमी पाऊस झाला आहे. वादळं मोठ्या प्रमाणात होतं, झाडं कोसळली, इमारती हालत होत्या, अनेक ठिकाणी पत्रे उडाले आहेत. हे वेगळं चित्र आहे. मी मागील 2-3 वर्षांपासून बोलत आलो आहे की जागतिक हवामान बदल (क्लायमेट चेंज) होत आहे. 48 तासात 500 मिमी पाऊस पडला हे आपण आधी कधी ऐकलं असेल असं वाटत नाही. या गोष्टींवर कसं काम करायचं यावर चर्चा करुन नियोजन होईलच.

मुंबईतील स्थितीवरुन विरोधकांनी केलेले आरोप हास्यास्पद : आदित्य ठाकरे

“सध्यातरी इथं काही मदत करता येईल का याची पाहणी सुरु आहे. जागतिक हवामान बदल हे सत्य आहे आणि हा जगाला इशारा आहे. आता आपण ते स्वीकारुनच पुढील नियोजन करायला हवे. विरोधकांचे जे आरोप आहेत ते हास्यास्पद आहेत. आत्ता मला राजकारणात जायचं नाही. सध्या कामावर लक्ष केंद्रित करायचं आहे. काल जो वादळी पाऊस झाला त्याच्यासमोर जगात कुणीही उभं राहू शकत नाही. असं असतानाही मुंबई पुन्हा रस्त्यावर आली आहे. आपण काम करतो आहे,” असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

संबंधित व्हिडीओ :

हेही वाचा :

मुंबईत मुसळधार पावसाने इमारतीचे 2 मजले कोसळले, घरांतील माणसं धावतपळत बाहेर

मुंबईतील पाऊस आणि वारं याला चक्रीवादळच म्हणावे लागेल : आयुक्त इक्बाल चहल

Devendra Fadnavis criticize BMC for water logging

Follow Us
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...