कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसमोर ‘धारावी पॅटर्न’ही फोल?; मुख्यमंत्र्यांनी केलं ‘हे’ विधान

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसमोर 'धारावी पॅटर्न'ही फोल?; मुख्यमंत्र्यांनी केलं 'हे' विधान
CM Uddhav Thackeray

देशभरात कोरोनाची दुसरी लाट आली असून ही लाट अत्यंत भयंकर आहे. (Dharavi pattern will fail in front of second corona wave?)

भीमराव गवळी

|

Apr 07, 2021 | 6:31 PM

मुंबई: देशभरात कोरोनाची दुसरी लाट आली असून ही लाट अत्यंत भयंकर आहे. ही लाट एवढी भयंकर आहे की तिच्यासमोर धारावी पॅटर्नही फोल आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही तसे सुतोवाच केलं आहे. त्यामुळे प्रचंड चिंता व्यक्त केली जात आहे. (Dharavi pattern will fail in front of second corona wave?)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यापाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही भीती व्यक्त केली. यापूर्वी आपण सामाजिक अंतराचे चौकोन आखले होते. त्यातून परिश्रमाने, मेहनतीने पहिल्या लाटेवर मात केले होते. यात धारावी पॅटर्नचे जगभर कौतूक केले होते. पण आता परिस्थितीच विचित्र झाली आहे. कोरोनाचे हे संकट दुर्देवी आहे. ही लाट प्रचंड मोठी आहे. कोणत्याही गोष्टी बंद करण्याची भूमिका नाही, हे यापुर्वीच स्पष्ट केले आहे. कुणाच्याही रोजी-रोटीवर निर्बंध आणावेत किंवा लॉकडाऊन करावे अशी इच्छा नव्हती. याआधीपासून सर्व जनतेला सावध करत होतो. फेब्रुवारी-मार्चमध्ये काही शेकड्यांमध्ये रुग्णसंख्या खाली आणली होती. पण आता रुग्णसंख्या वेगाने वाढते आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

व्यापाऱ्यांना कळकळीची विनंती

यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यापाऱ्यांना रस्त्यावर न उतरण्याची कळकळीची विनंती केली. रस्त्यावर उतरण्याची भाषा करू नका. हा लढा सरकारशी नाही. विषाणूशी लढा आहे. तुम्ही महाराष्ट्राचे भूमीपूत्र आहात. तुमचे नुकसान होऊ देणार नाही. कुणाच्याही चिथावणीला बळी पडू नका. संकटाच्या काळातच शत्रू आणि मित्र कोण यांची ओळख होते. हे समजून घ्या. न डगमगता यातून बाहेर पडायचे आहे. कोरोनावर मात करायची आहे, हे लक्षात घ्या, असं आवानह मुख्यमंत्र्यांनी व्यापाऱ्यांना केलं.

लक्षणे नसलेल्यांमुळे अनेक बाधित होण्याची भीती

गेल्यावर्षी मार्चमध्ये बेडसची संख्या सात आठ हजार होती. ही संख्या आता पण पावणेचार लाखांपर्यंत वाढविली आहे. जंम्बो कोविड सेंटर्स काढली. कोणत्याही राज्याने केली नसेल अशा सुविधा निर्माण केल्या. पण या सुविधाही अपुऱ्या पडण्याची वेळ येईल, अशी स्थिती येण्याची शक्यता आहे. लसीकरण सुरु झाले. पण लसींचा साठाही आता संपून जाणार आहे. कारण आपली लसीकरणाची गती मोठ्याप्रमाणात वाढवली आहे. पंचवीस वर्षांवरील सर्वांना लस देण्याची मागणी केंद्राकडे केली होती. पण ती नाकारण्यात आली. आपल्या मागणीवरून आता पंचेचाळीस वर्षांवरील लोकांना लस देण्यात येत आहे. पण लसीचा साठा संपू लागला आहे. नव्या लाटेत आता तरूण वर्ग यामध्ये मोठ्या प्रमाणात बाधित होऊ लागला आहे. कारण तो रोजगार, कामांसाठी फिरतो आहे. लक्षण नसलेल्यांची संख्या सत्तर टक्क्यांहून अधिक वाढली आहे. त्यांच्यामुळे इतर अनेक बाधित होण्याची शक्यता आहे, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

रुग्णसंख्या 12 लाखांवर जाणार

राज्यात फेब्रुवारीपासून आतापर्यंत 30 पट रुग्णसंख्या वाढ झाली आहे. उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 4 लाखांवर पोहचली होती. गतवर्षीच्या सप्टेंबर 2020 मधील रुग्णसंख्येपेक्षा कित्येक पटींनी रुग्ण संख्या झाली आहे. भारत सरकारच्या अंदाजानुसार एप्रिल अखेरीस 12 लाखांवर रुग्णसंख्या पोहचू शकते, असं आरोग्य विभागाचे प्रधान सचिव व्यास यांनी सांगितलं.

नवा स्ट्रेन तरुण आणि लहान मुलांना घातक

राज्यात गंभीर परिस्थिती आहे. विषाणूचा नवा स्ट्रेन त्याचा फैलाव वेगाने करत आहे आणि तो डबल म्युटंट आहे. तो तरुण आणि मुलांना घातक आहे. त्यासाठी विषाणूची साखळी तोडणे हाच यावर उपाय आहे. ही दुसरी लाट त्सुनामीसारखे दिसते आहे. ती रोखण्यासाठी करता येतील, ते सर्व प्रयत्न करावे लागतील, असं टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांनी सांगितलं. (Dharavi pattern will fail in front of second corona wave?)

संबंधित बातम्या:

कोरोनाची दुसरी लाट त्सुनामीसारखी, एप्रिल अखेरपर्यंत रुग्णसंख्या 12 लाखांवर जाणार; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतून खुलासा

Aurangabad Corona | बेड्सची उपलब्धता ते कोरोना चाचणी केंद्र, औरंगाबादमधील कोरोनाची स्थिती काय?

पुण्यात कोरोनाचा कहर, बेड हवाय तर काय करायचं?; इतर सुविधांसाठी प्रोसेस काय?

(Dharavi pattern will fail in front of second corona wave?)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें