संजय राऊतांच्या लेकीच्या साखरपुड्यात राज ठाकरेंची अनुपस्थिती! चर्चा तर होणारच

| Updated on: Jan 31, 2021 | 11:26 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अनुपस्थिती मात्र जाणवली आणि त्याचीच चर्चा या कार्यक्रमातही सुरु असल्याचं पाहायला मिळालं.

संजय राऊतांच्या लेकीच्या साखरपुड्यात राज ठाकरेंची अनुपस्थिती! चर्चा तर होणारच
Follow us on

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची कन्या पूर्वशी आणि ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांचा साखरपुडा आज पार पडला. या सोहळ्याला राज्यातील विविध राजकीय पक्षांच्या नेतेमंडळींनी हजेरी लावली होती. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक राजकीय पक्षाच्या नेतेमंडळींचा समावेश होता. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अनुपस्थिती मात्र जाणवली आणि त्याचीच चर्चा या कार्यक्रमातही सुरु असल्याचं पाहायला मिळालं.(Discussion of Raj Thackeray’s absence in Sanjay Raut’s daughter’s Engagement)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, साताराचे खासदार श्रीनिवास पाटील, डॉक्टर तात्याराव लहाने, खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत गप्पा मारत बसले होते. त्यावेळी राज ठाकरे यांच्या अनुपस्थितीबाबत विषय निघाला. तेव्हा संजय राऊत यांनी राज ठाकरे यांचा हात दुखत असल्याचं आणि तो सुजल्यामुळे ते कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नसल्याचं सांगितलं. राज ठाकरे यांची उणीव भासत असल्याचंही संजय राऊत म्हणाले. त्यामुळे अन्य सर्व नेते उपस्थित असताना राज ठाकरे यांच्या अनुपस्थितीची चर्चा राऊतांच्या लेकीच्या साखरपुड्यात रंगल्याचं दिसून आलं.

राऊत-फडणवीस गळाभेट

देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे एकत्रच कार्यक्रमस्थळी पोहोचले. त्यावेळी मल्हार आणि पूर्वशी यांच्यासोबत नार्वेकर कुटुंबीय आणि संजय राऊत यांच्या पत्नी उपस्थित होत्या. फडणवीस आणि दरेकर यांचं आगमन झाल्यानंतर राजेश नार्वेकर यांनी फडणवीसांना नमस्कार केला. फडणवीसांनी पुढे होऊन मल्हार आणि पूर्वशी यांना पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या. त्यावेळी दुसरीकडे असलेल्या संजय राऊत यांनी फडणवीसांना पाहिलं आणि ते फडणवीसांकडे आले. दोघेही समोरासमोर आल्यानंतर राऊत यांनी फडणवीसांची गळाभेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावर हास्य पाहायला मिळालं. त्यानंतर नव्या जोडप्यासह नार्वेकर आणि राऊत कुटुंबियांसोबत फडणवीसांनी फोटो काढले. त्यानंतर दरेकर यांनी पुढे होत नव्या जोडप्याला पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या. तेव्हा राऊतांनीही पुढे होत दरेकरांच्या हातात हात दिला.

संबंधित बातम्या :

संजय राऊतांच्या लेकीच्या साखरपुड्यात फडणवीस-राऊत गळाभेट! अनेकांच्या भुवया उंचावल्या

Photos : राऊतांच्या लेकीच्या साखरपुड्यात राजकीय नेत्यांची मांदियाळी

Discussion of Raj Thackeray’s absence in Sanjay Raut’s daughter’s Engagement