AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Disha Salian केसमध्ये FIR दाखल, फक्त आदित्य ठाकरेचं नाही इतर नावं सुद्धा तितकीच शॉकिंग, CBI एक अँगल सोडणार नाही हे स्पष्ट

सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियान मृत्यू प्रकरणात सीबीआयने FIR दाखल केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवल्यानंतर हा एफआयआर दाखल झाला आहे.

Disha Salian केसमध्ये FIR दाखल, फक्त आदित्य ठाकरेचं नाही इतर नावं सुद्धा तितकीच शॉकिंग, CBI एक अँगल सोडणार नाही हे स्पष्ट
Disha Salian-Aaditya Thackeray
| Updated on: Sep 14, 2026 | 4:19 PM
Share

सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियान मृत्यू प्रकरणात सीबीआयने FIR दाखल केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवल्यानंतर हा एफआयआर दाखल झाला आहे.दिशा सालियान दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर होती. जून 2020 मध्ये दिशाचा मृत्यू झाला होता. सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये काही जणांची नावं आहेत. त्यांची चौकशी होईल. दोन दिवसांपूर्वी दिशाचे वडिल सतीश सालियन यांनी सीबीआयकडे आपला जबाब नोंदवला होता. त्यानंतर हा एफआयआर दाखल झाला आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे, रोहन रॉय, अभिनेता दिनो मारियो, सूरज पांचोली यांच्यासह आदित्य ठाकरेंचे अंगरक्षक, रेहा चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, माजी पोलीस अधिकारी सचिन वझे, माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग, डीसीपी विशाल ठाकूर यांची नावं या एफआयआरमध्ये आहेत.

“दिशाचा मृत्यू झाला त्यावेळी आदित्य ठाकरेंचे वडिल उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. या कारस्थानात आणि हे प्रकरण दाबण्यासाठी अन्य लोकांचा सुद्धा सहभाग आहे. संबंधित सरकारी अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. या केसशी संबंधित कागदपत्र नष्ट करणं आणि दाबणं असे प्रकार घडले आहेत. जनतेच्या पैशांचा, पोलीस यंत्रणेचा चुकीच्या गोष्टींसाठी आरोपींना वाचवण्यासाठी वापर झाला” असं एफआयआरमध्ये म्हटलं आहे.

मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती

ज्यांची नावं या एफआयआरमध्ये आहेत, त्यांची चौकशी झाली पाहिजे. मालवणी पोलीस स्टेनशशी संबंधित अधिकाऱ्यांची नाव सुद्धा यात आहेत. पोस्टमार्टम मध्ये असलेले डॉक्टर, नर्सेस यांची सुद्धा नावं यात आहेत. दिशा सालियनचे वडिल सतीश सालियन यांनी सीबीआय समोर जबाब नोंदवताना आदित्य ठाकरेंचं नाव घेतलं. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह अनेकांनी कारस्थान रचून हे प्रकरण दाबलं असं त्यांचं म्हणणं होतं. दिशाचे वडिल सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यांच्याच याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने हे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे सोपवलं. दिशा सालियानचा जून 2020 मध्ये मृत्यू झाला. मुंबई पोलिसांनी तपासात बेजबाबदारपणा केल्याचा आरोप त्यांनी केला.

Follow Us
देवेंद्र फडणवीस यांचा राजभाषा दिनी मातृभाषा, भारतीय भाषांच्या गौरव...
देवेंद्र फडणवीस यांचा राजभाषा दिनी मातृभाषा आणि भारतीय भाषांच्या गौरवाचा संदेश
अमित शहा, फडणवीस, शिंदे अन् सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजभाषा...
अमित शहा, फडणवीस, शिंदे अन् सुनेत्रा पवार एकाच मंचावर; वाशीत राजभाषा संमेलनाचा थाट!
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत...
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत मोठी नावे
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत,
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत, खास काय?
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
Ganpati Bappa Morya | मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजीरवाडी मंडळात दर्शन
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा