डॉक्टर म्हणाले इंजेक्शन घेऊन या, पण रुग्णालयात जागाच नाही, मनसे आमदाराकडून तेच इंजेक्शन आयुक्तांना भेट

| Updated on: Aug 14, 2020 | 7:21 PM

आमदार राजू पाटील यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांना आज भेट देऊन केडीएमसीचा सावळा गोंधळ समोर आणला आहे

डॉक्टर म्हणाले इंजेक्शन घेऊन या, पण रुग्णालयात जागाच नाही, मनसे आमदाराकडून तेच इंजेक्शन आयुक्तांना भेट
Follow us on

डोंबिवली : महापालिकेच्या कोव्हिड रुग्णालयामध्ये (Dombivali MLA Raju Patil) दाखल रुग्णांसाठी डॉक्टरांनी रेमीडिसीवीर इंजेक्शन मागून घेतलं. मात्र, रुग्णालयामध्ये फ्रीज नसल्याने रुग्णाच्या नातेवाईकांना हे इंजेक्शन रुग्णाच्या घरी ठेवावे लागले. आता तेच इंजेक्शन मनसे आमदार राजू पाटील यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांना आज भेट देऊन केडीएमसीचा सावळा गोंधळ समोर आणला आहे (Dombivali MLA Raju Patil).

याबाबत पालिका आयुक्त विजय सुर्यवंशी यांनी याप्रकरणी चौकशी करुन कारवाई करणार असल्याचे सांगितले.

नेमकं प्रकरण काय?

काही दिवसांपूर्वी केडीएसमीच्या पाटीदार कोव्हिड सेंटरमध्ये एक रुग्ण दाखल झाला होता. उपचारादरम्यान त्या रुग्णासाठी रेमीडिसीवीर इंजेक्शन लागेल, यासाठी डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाईकांकडून मागून घेतले. नातेवाईकांनी केडीएमसी रुग्णलायतून हे इंजेक्शन आणून दिले. मात्र, कोव्हिड रुग्णालयात फ्रीज नसल्याने ते इंजेक्शन रुग्णाच्या घरी ठेवावे लागले.

यादरम्यान या रुग्णाला डिस्चार्ज देण्यात येणार आहे. मात्र, ते इंजेक्शन वापरात आले नाहीत. तसेच, रुग्णांच्या घरी असलेले इंजेक्शन ही पुन्हा मागवून घेतले नाही. मनसे आमदार राजू पाटील यांनी पालिका आयुक्तांची तोच इंजेक्शन भेट देत पालिकेच्या कोव्हिड सेंटरमधील सावळा गोंधळ उजेडात आणला. तसेच, यासाठी जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली.

याबाबत पालिका आयुक्त काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर, याबाबत पालिका आयुक्त विजय सुर्यवंशी यांनी याप्रकरणी चौकशी करुन कारवाई करणार असल्याचे सांगितले.

Dombivali MLA Raju Patil

संबंधित बातम्या :

Pune Corona | कोरोना रुग्णांना वेळेवर उपचार द्या, संसर्ग रोखण्यासाठी काटेकोर नियोजन करा, अजित पवारांच्या अधिकाऱ्यांना सूचना

औरंगाबादेत कोरोना योद्ध्यांचा संपाचा इशारा, पगार थकल्याने डॉक्टर आक्रमक