आर्यन खानपाठोपाठ अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचाचीही तुरुंगातून सुटका; अरबाजचे वडील म्हणतात…

| Updated on: Oct 31, 2021 | 4:56 PM

आर्यन खान पाठोपाठ अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचीही तुरुंगातून सुटका झाली आहे. (drugs cruise ship case arbaaz merchant released from arthur road jail in mumbai)

आर्यन खानपाठोपाठ अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचाचीही तुरुंगातून सुटका; अरबाजचे वडील म्हणतात...
arbaaz merchant
Follow us on

मुंबई: आर्यन खान पाठोपाठ अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचीही तुरुंगातून सुटका झाली आहे. ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या या दोघांचीही तब्बल 28 दिवसानंतर तुरुंगातून सुटका झाली आहे. या दोघांनाही परवाच जामीन मंजूर करण्यात आला होता.

अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांची आज सकाळी आर्थर रोड तुरुंगातून सुटका करण्यात आली. अरबाजची सुटका होणार असल्याने त्याला घेण्यासाठी त्याचे वडील सकाळीच तुरुंगात गेले होते. अरबाजची अखेर सुटका झाली. त्यामुळे मी खूप आनंदी आहे. त्याची आईही खूप खूश आहे. त्याची सुटका व्हावी म्हणून आम्ही प्रार्थना करत होतो. त्याचचं हे फळ आहे, असं अरबाजच्या वडिलांनी सांगितलं. तर, अरबाज जामीनाच्या सर्व अटी आणि शर्तींचं पालन करणार असल्याचं त्याचा भाऊ असलम मर्चंट यांनी सांगितलं.

म्हणून एक रात्रं तुरुंगात

अरबाज आणि मुनमुनला आर्यनसोबत 29 ऑक्टोबर रोजी जामीन मिळाला होता. त्यानंतर आर्यन खानची काल 30 ऑक्टोबर रोजी सुटका करण्यात आली होती. मात्र, कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने अरबाज आणि मुनमुन यांना एक दिवस तुरुंगातच राहावं लागलं होतं. एनसीबीने 2 ऑक्टोबर रोजी ड्रग्ज पार्टीवर धाड मारली होती. यावेळी आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना अटक करण्यात आली होती.

मुनमुनचे वकील काय म्हणाले?

अरबाज मर्चंट आणि मुनमुनला उच्च न्यायालयाने जामीन दिला होता. मात्र, दोघेही शनिवारी तुरुंगातून मुक्त होऊ शकले नव्हते. कारण त्यांच्या दस्ताऐवजांची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नव्हती, असं मुनमुन धमेचाचे वकील काशिफ खान देशमुख यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं.

आर्यनची सुटका आणि जल्लोष

दरम्यान, काल आर्यन खानची तुरुंगातून सुटका झाली. काल सकाळी 11 वाजून 2 मिनिटांनी त्याची सुटका झाली. त्यावेळी त्याला पाहण्यासाठी आर्थर रोड तुरुंगाबाहेर बघ्यांनी आणि शाहरुख खानच्या फॅन्सची प्रचंड गर्दी केली होती. मात्र, आर्यन तुरुंगातून येताच थेट गाडीत बसला आणि मन्नतच्या दिशेने रवाना झाला. मन्नतबाहेरही बघ्यांची आणि शाहरुखच्या फॅन्सची प्रचंड गर्दी झाली होती. शाहरुखच्या फॅन्सने ढोलताशे वाजवून आर्यनचं स्वागत केलं. तर मन्नतवर विद्यूत रोषणाई करण्यात आली होती. मात्र, आर्यनने मन्नत बाहेर जमलेल्या फॅन्सचीही भेट घेतली नाही. तो थेट घरी गेला. त्यामुळे शाहरुखच्या फॅन्सचा चांगलाच हिरमोड झाला होता.

 

संबंधित बातम्या:

समीर वानखेडे जन्माने मुस्लिमच, बोगस दाखल्यावरून नोकरी मिळवली; नवाब मलिक ठाम

Aryan Khan Bail Conditions | तुरुंगाबाहेर पण ‘आझाद’ नाही,… तर आर्यन खानचा पासपोर्टही जप्त होणार

तो मी नव्हेच! आणखी एका किरण गोसावीचा खुलासा; नवाब मलिक यांचा ‘तो’ दावा खोटा ठरणार?

(drugs cruise ship case arbaaz merchant released from arthur road jail in mumbai)