AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदे यांनी बोलवली आमदारांची बैठक, काय मोठा निर्णय घेणार?

राज्यात अजूनही राजकीय हालचाली सुरु आहेत. मुख्यमंत्रीपदाबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही. एकनाथ शिंदे यांच शिवसेना गृहमंत्रीपदासाठी आग्रही आहे. आजारी असलेले एकनाथ शिंदे पुन्हा कामाला लागले आहेत. आज त्यांनी आपल्या आमदारांची बैठक बोलवली आहे. त्यामुळे आता ते काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे,

एकनाथ शिंदे यांनी बोलवली आमदारांची बैठक, काय मोठा निर्णय घेणार?
eknath shinde
shailesh musale
shailesh musale | Updated on: Dec 03, 2024 | 5:56 PM
Share

राज्यात नव्या सरकारचा शपथविधी होण्यासाठी फक्त १ दिवस बाकी आहे. ५ डिसेंबरला आझाद मैदानात नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी जय्यत तयारी सुरु आहे. पण अजूनही भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचं नाव घोषित करण्यात आलेलं नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होतील असं भाजपचे नेते म्हणत असले तरी त्यांच्या नावाची घोषणा अजून झालेली नाही. दुसरीकडे काळजावाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काहीसे नाराज असल्याची शक्यता आहे. गेल्या २ दिवसांपासून ते आपल्या गावी गेले होते. पण नंतर तब्येत खराब झाल्याने ते ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात पोहोचले. तेथे त्यांनी काही चाचण्या केल्यानंतर वर्षा बंगल्यावर पोहोचले.

राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी येताच बैठकां सुरु केल्या आहेत. आता अशी ही बातमी आहे की, त्यांनी आपल्या सर्व आमदारांची बैठक बोलवली आहे. एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. गेल्या काही दिवसात त्यांनी कोणाचीही भेट घेतली नाही. काल भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी त्यांची भेट घेतली होती. दोघांमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं महाजन यांनी सांगितलं. त्यानंतर आज ते पुन्हा एकदा शिंदे यांना भेटण्यासाठी वर्षा बंगल्यावर पोहोचले आहेत.

गेले काही  दिवस शिंदे आपल्या गावी होते. त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. पण आज पुन्हा एकदा ते सक्रीय झाले आहेत. त्यांनी कामाला सुरुवात केली आहे. आता आमदारांच्या बैठकीत ते नेमकं काय बोलतात. काय भूमिका मांडतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. एकनाथ शिंदे हे गृहमंत्रीपदासाठी आग्रही असल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शिंदे हे गृहमंत्री होण्यासाठी इच्छूक आहेत पण भाजप गृहमंत्रीपद सोडायला तयार नाही.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) वर्षा बंगल्यावर पोहोचल्यानंतर आता नेते त्यांना भेटण्यासाठी पोहोचत आहेत. जागावाटपाचा पेच अजून कायम आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या पुढच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची...
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची भीती, धमक्यांचा दावा...
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
पप्या शिंदे खंडणी विरोधी पथकात, आईची पहिली प्रतिक्रिया समोर; पुरणेकर..
Pradeep Purnekar Case | अटकेत असलेला आरोपी पप्या शिंदेला खंडणी विरोधी पथकात आणलं, आता...
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन नंतर 7 ऑक्टोंबरला थेट..
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन आणि 7 ऑक्टोंबरला थेट...
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा!
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर...पुर्णेकर प्रकरणात
Pradip Purnekar | माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर... प्रदीप पुर्णेकर प्रकरणात पप्या शिंदेंच्या आईचा मोठा दावा
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane : वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
Amravati : अमरावतीत दुष्काळाचा कहर; 1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...